बॉलीवूड मधल्या 10 प्रसिद्ध अभिनेत्यांनी/अभिनेत्रींनी या भूमिकेसाठी कुठल्याही प्रकारच मानधन न घेता केलं काम…

सेलिब्रेटीज हे भरपूर पैसा कमावणारे म्हणून ओळखले जातात.ते चित्रपटात फक्त कामच करत नाहीतर बॉलीवूड इंडस्ट्री चे दार त्यांना अमाप पैसे कमावण्यासाठी उघडेच असतात.काहीजण जाहिरातीद्वारे, ब्रँड मोहीम, मॉडेलिंग किंवा प्रॉडक्शन हाऊस चालू करतात जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात सातत्याने क्रेडिट चा भडिमार असला पाहिजे.कमावणे हा जरी त्यांचा हा व्यवसाय आणि हक्क असला तरी, बॉलीवूड सेलिब्रेटी आपले मित्रत्व व नैतिक मूल्य कधीही सोडत नाहीत.काहीवेळा,ते मित्राच्या आदरामुळे काही भूमिका करतात त्यात पैशाला कुठेही जागा नसते. चला बघूया खासरे वर असे काही सेलिब्रिटी ज्यांनी केल विनामुल्य काम…

तुम्हाला ह्या 10 बॉलिवूड सेलिब्रेटी माहीती करून घेताना आश्चर्य वाटेल की,ज्यांनी त्यांच्या भूमिकेसाठी मानधन एक रुपयाही घेतला नाही.

“भूतनाथ आणि भूतनाथ रिटर्न्स “साठी शाहरुख खान

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात महागडा अभिनेता असला तरीही त्याने भूतनाथ व भूतनाथ रिटर्न्स साठी एकही रुपया घेतला नाही. या सिनेमा मध्ये त्याने अमिताभ सोबत काम केलेले आहे. जुही चावला हि ह्या सिनेमात त्याच्या बरोबर होती.

“ओम शांती ओम” साठी सलमान खान

फराह खानच्या चित्रपटात ‘ओम शांती ओम’ या गाण्यात नाचण्यासाठी सलमान ने कुठलेही मानधन घेतले नाही.त्याने तीस मार खान, अजब प्रेम की गजब कहाणी, सन ऑफ सरदार या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका सुद्धा मोफत केली होती. शाहरुख सोबत त्याचे तेव्हा पटत नसताना सुध्दा फराह खानच्या मैत्री खातीर त्याने हे काम केले होते.

“फेविकॉल से”साठी करीना कपूर

बिल्लू बार्बर मध्ये ‘मरजाणी’ या गाण्यावर थिरकताना करीना कपूर ने नक्कीच चांगली कामगिरी केली.या अभिनेत्रीने तिच्या मित्रासाठी शाहरुख खान साठी हे गाणे मोफत केले होते.खर तर जेव्हा शूटिंग संपले तेव्हा अभिनेत्याने तिला चेक पाठवला, पण तिने तो चेक प्रामाणिकपणे परत केला.

“यू गेट मी रॉकिंग अँड रिलिंग” साठी प्रियांका चोप्रा.

बिल्लू बार्बर चित्रपटातील प्रमोशन गाण्यासाठी प्रियांकाने सुद्धा पाहुण्या कलाकाराची भूमिका केली,आणि तिची ‘यू गेट मी रॉकिंग अँड रिलिंग’ मधील कामगिरी शाहरुख खान ला त्याच्या चित्रपटासाठी भेट म्हणून केली.

“ओम शांती ओम” साठी दीपिका पदुकोण.

नम्र ,विनम्र आणि विनयशील कसं असावं असणं याच दीपिका उत्तम उदाहरण आहे! दीपिकाने आपल्या पहिल्याच चित्रपटाचा “ओम शांती ओम” बरोबर शुभारंभ केला होता आणि अभिनेत्रीने तिच्या भूमिकेसाठी एकही रुपया घेतला नाही कारण तिला बॉलीवुड मधील पहिली भूमिका हेच तिच्यासाठी खूप होत.

“चिकणी चमेली”साठी कतरीना कैफ.

या अभिनेत्रीने करण जोहर सोबतची मैत्री व्यक्त करण्यासाठी अग्निपथ मध्ये चिकणी चमेली हे आयटम सॉंग विनामूल्य केले. ह्रितिक रोशन, संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट होता. अमिताभच्या अग्निपथचा हा रिमेक करण्यात आला होता.

“भाग मिल्खा भाग” साठी सोनम कपूर.

भाग मिल्खा भाग मध्ये तिचा छोटा पण एक प्रमुख भूमिका असलेला चित्रपट होता. चित्रपटाच्या प्रचारात अभिनेत्रीने सक्रिय सहभाग घेतला असला तरी तिने या चित्रपटात अभिनयासाठी केवळ 11 रुपये घेतले. फरहान अख्तरने सुध्दा ह्या चित्रपटाकरिता फक्त एक रुपया मानधन घेतले होते.

“हैदर” साठी शाहिद कपूर.

शाहिद कपूर हैदर मधील आपल्या अभूतपूर्व अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा विशाल भारद्वाज त्याच्या भूमिकेसाठी आले होते, तेव्हा त्यांच्यापेक्षाही तो खूप आनंदित झाला होता.त्याने पुरणोणे विनामूल्य भूमिका करण्याचे ठरविले आणि त्याच्या कारकीर्द मध्ये तो एक वळणावर बिंदू समजल्या जातो.

“कभी खुशी कभी गम”साठी राणी मुखर्जी.

ही अभिनेत्री करण जोहरची शुभंकर आहे तिने या चित्रपटात नैना ची भूमिका केली होती. करन, राणी आणि शाहरुखची मैत्री फार जुनी आहे. ते नेहमी एकमेकास मदत करत असतात.

“हर किसींको नही मिलता”साठी सोनाक्षी सिन्हा.

या अभिनेत्री ने अक्षयकुमार सोबत बरेच चित्रपट केलेत राउडी राथोर,वन्स अप ऑन टाइम इन मुंबई दोबारा, आणि हॉलिडे; अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी आणि बॉस चित्रपटात पाहुनी कलाकार म्हणून अक्षयकुमार साठी विनामूल्य काम केले.

आपण ऐकलं असेल की बिझनेसमध्ये भावनांना स्थान नाही परंतु मैत्री आणि सद्भावना खात्रीने तिथे आहे!
हि खासरे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *