गनिमी काव्याचे जनक…

माझ्या ‘व्हिएतनाम आणि शिवाजी महाराज’ या लेखा मुळे काहीजण माझ्यावर नाराज झाले त्यातील काहींनी काही विषयांवर चर्चा केली, वाद देखील घातला. बऱ्याच जणांचा मुद्दा होता कि शिवाजी महाराज गनिमी काव्याचे जनक आणि तुम्ही ते कसं नाकारता. काहींचे म्हणने आले कि गनिमीकावा हा महाराजांनी शोधलेला युद्ध प्रकार आहे जो व्हिएतनाम ने अवलंबला. त्या सर्वांचं शंका निरसन करण्या साठी या लेखाचं प्रयोजन.

सर्व प्रथम गनिमीकावा किंवा गुरिला वॉरफेर म्हणजे काय हे समजून घेऊ. ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार गुरिला वॉरफेर म्हणजे ‘Engagement in or the activities involved in a war fought by small groups of irregular soldiers against typically larger regular forces.’ म्हणजे ‘छोट्या अनियमित (एका ठिकाणी एकत्र नसलेल्या) सैन्य तुकडीने मोठ्या एकत्र सैन्य बरोबर लढणे ‘.


बांबूवर लिहलेलं आर्ट ऑफ वॉर हेय पुस्तक

गनिमी कावा कोणी शोधला याचा काहीच संदर्भ इतिहासाच्या पानात मिळत नाही. माझ्या आकलनानुसार शिकार करता करता कमीत कमी मनुष्यबळात मोठ्यात मोठा प्राणी मारताना, संभवतालच्या परिस्थितीचा मानवाने उपयोग केला असेल आणि त्यातूनच निर्मिती झाली असले गनिमी काव्याची. ज्या पद्धतीने बरेचसे मार्शल आर्ट चे प्रकार मानवाने प्राण्यांकडून आत्मसात केलेत. तसेच कदाचित मानव ही कला देखील निसर्गा कडून शिकला असेल. बरेच प्राणी शिकार करताना अथवा शिकार होताना आसपास च्या निसर्गाचा, भौगोलिक परिस्थितीचा, कळपाचा उपयोग करतात. त्याच प्रमाणे मानवाने हि कला देखील आत्मसात केली असावी.

मानवी इतिहासात गनिमीकाव्याचा प्रथम लिखित उल्लेख सापडतो ख्रिस्तपूर्व ६व्या शतकात (६०० BC to ५०१ BC). तो ही बांबूच्या पट्ट्यांवर लिहलेल्या एका पुस्तका मध्ये ज्याचा नाव आहे ‘आर्ट ऑफ वॉर ‘. हे पुस्तक एका चायनीस जनरल ने लिहून ठेवलंय. त्या जनरल चा नाव होता सुंझी Sun Tzu किंवा Sunzi. एखाद्या योध्याने युद्ध जिंकण्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे सुंझी, एका वाक्यात पण समजेल अशा सोप्या पद्धतीत सांगतो . यापुस्तकांमध्ये १३ पाठ आहे प्रत्येक पाठ हा युद्धातील वेगवेगळ्या बाबींवर समर्पित आहे जसे की नियोजन, हल्ले, युक्त्या इत्यादी. त्याच्या पुस्तकातल्या बऱ्याच वाक्याचा गनीमीकाव्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काहींना काही संबंध लागतो. कोणताही सामान्य माणूस तो लावू शकेल एवढी सोपी त्याची मांडणी आहे. या पुस्तकाची जगाला सर्व प्रथम ओळखकरून दिली ती ‘Jean Joseph Marie Amiot’ या फ्रेंच माणसाने. हा माणूस १७३७ साली मिशनरी म्हणून चीनला गेला. तेथे त्याची सम्राट ‘Qianlong Emperor’ सोबत खास मैत्री झाली. Qianlong Emperor हा उत्तम योद्धा होता आणि त्याचा संग्रही हे ‘आर्ट ऑफ वॉर’ पुस्तक होत. त्याच वेळी Jean Joseph Marie Amiot याने चिनी भाषा शिकून घेतली. फ्रान्स मध्ये परतताना या महाशयांनी चीन मधून भरपूर पुस्तके आणिली त्यातील एक म्हणजे ‘आर्ट ऑफ वॉर ‘. त्याने हेय पुस्तक भाषांतर करून १७७२ साली फ्रान्स मध्ये प्रकाशित केलं. आणि मग त्या नंतर या पुस्तकाचा प्रवास कधीही थांबला नाही. सध्या हेय मूळ बांबूवर लिहलेले पोस्टल युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाईड येथे जतन केले आहे.


उलगडल्या बांबूच्या पट्या आणि त्यावरील लेख

आजही हे पुस्तक बाजारात बऱ्याच भाषेत जिवंत आहे आणि वाचनीय असल्या मुळे खप आहे. आपल्यासाठी जस चाणक्याचे अर्थशास्त्र किंवा चाणक्य नीती तसं जगा साठी सनझुच ‘आर्ट ऑफ वॉर ‘. हे पुस्तक वाचताना त्यातील वाक्य नकळत का होईना आपण महाराजांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाशी आपण जोडत जातो. आजकाल या पुस्तकाचे पाठ कॉरपोर्टे मध्ये ही घेतले जातात. खाली ‘आर्ट ऑफ वॉर ‘ मधील काही वाक्य उदाहरणा दाखल देत आहे.

1. the way is to avoid what is strong, and strike at what is weak. 2. Appear weak when you are strong, and strong when you are weak.
3. Let your plans be dark and impenetrable as night, and when you move, fall like a thunderbolt. 4. Rouse him, and learn the principle of his activity or inactivity. Force him to reveal himself, so as to find out his vulnerable spots.
5.Move swift as the Wind and closely-formed as the Wood. Attack like the Fire and be still as the Mountain. 6. Treat your men as you would your own beloved sons. And they will follow you into the deepest valley. 7. When the enemy is relaxed, make them toil. When full, starve them. When settled, make them move. 8.If your opponent is of choleric temper, seek to irritate him. Pretend to be weak, that he may grow arrogant. 9.Attack him where he is unprepared, appear where you are not expected. 10.If his forces are united, separate them.
ही फक्त १० वाक्य आहेत संपूर्ण पुस्तक अप्रतिमच आहे.

आर्ट ऑफ वॉर चा लेखक सुंझी Sun Tzu किंवा Sunzi

१८ व्या शतक पर्यंत या युद्ध कलेला इंग्लिश मध्ये खास नाव असं नव्ह्तच. पण १८०९ मध्ये गुरिला हा शब्द इंग्लिश मध्ये प्रथम वापरला गेला तेही नेपोलियनच्या स्पॅनिश हल्याच वार्तांकन करताना. ते हे सांगण्यासाठी कि अमुक एक गाव नेपोलियनच्या सैन्या कडून गुरिलानी घेतले. आता हे गुरिला कोण होते. गुरिला हा स्पॅनिश शब्द आहे. नेपोलियन विरुद्ध लढताना स्पॅनिश छोट्या छोट्या टोळ्या मध्ये जमत आणि नेपोलियन सैन्यावर हल्ले करून पळून जात. या टोळीतील पुरुष सदस्यांना गुरिलेरो म्हणत तर महिला सदस्यांना गुरिलेरा म्हणत. आणि मागे तिथूनच पुढे शब्द झाला प्रचलित झाला गुरिला आणि या युद्धपद्धतीला नाव पडला गुरिला वॉरफेर.


फ्रेंच मशिनरी ‘Jean Joseph Marie Amiot’

प्राचीनकाळी गनिमी कावा हा काही फक्त चीन पुरता मर्यादित नव्हता. प्राचीन काळातही वेगवेगळ्या ठिकाणी या युद्ध पद्धतीच्या नोंदी सापडतात. ख्रिस्त पूर्व बलाढ्य ग्रीक, रोमन साम्राज्यांन विरुद्ध लढताना शक,गॉथ, वंडल या छोट्या राज्यांनी गनिमीकावा वापरुन टक्कर दिल्याच्या नोंदी सापडतात. कॅरटकस Caratacus या सेनानीने पहिल्या शतकात रोमन
सैन्याला गनीमीकाव्यामुळे ८ वर्ष झुंजावल्याच्या नोंदी सापडतात.

मध्य युगा मध्ये ज्या वेळेस मंगोल साम्राज्याने युरोप चा घास घेण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस तेथील छोट्या छोट्या राज्यांनी गनिमीकावा वापरून मंगोलांना कडवी झुंज दिल्याची नोंद आढळते.


चीन सम्राट Qianlong Emperor

१४४३ साली George Castriot नावाच्या अल्बेनियन कप्तानाने त्याचा सैन्याच्या २० पट असलेल्या तुर्की सैन्याचा दारुण पराभव केल्याच्या नोंदी सापडतात. या युद्ध साठी त्याने तुर्की सैन्याला पाठलागाचं अमिश दाखवून योग्य त्या ठिकाणी घेऊन आला. आणि मग तेथील डोंगराळ प्रदेश नदी नाले जंगल याचा उपयोग करत त्याने तुर्की सैन्याचा खात्मा केला. या साठी त्याने हिट अँड रन म्हणजे मारा आणि पाळा ही पद्धत वापरली. याच योध्याने २५ वर्ष तुर्की सैन्याला अल्बेनिया घेण्यापासून दूर ठेवलं केलं .
१५ व्या शतकात व्हिएतनाम मधील सम्राट ली लोई Le Loi याने चिनी साम्राज्याने व्हिएतनामचा गिळलेला भाग पुन्हा व्हिएतनामला मिळवून दिला. चीनसोबत लढताना सम्राट ली लोई गनिमी कावा अवलंबला आणि बलाढ्य चीनला परतवून लावलं.

अशा अनेक लढाया १५ १६ १७ व्य शतकात आढळतात. त्या सर्व इथे देणं शक्य नाही. याच काळात भारतामध्ये हा युद्ध प्रकार वापरला गेला असेल पण त्याच्या ठळक अशा नोंदी मला तरी सापडल्या नाहीत.


नेपोलियन फ्रेंच सैनिकांना खिंडीत पकडणारे गुरिला

मग उर्वरित शतकात गनिमी काव्याचा चांगलाच प्रचार आणि प्रसार झाला. त्यात शिखर गाठलं ते व्हिएतनाम-अमेरिका युद्धाने. व्हिएतनामच्या स्वतःच्या इतिहासात ही गनिमी कावा होता आणि ते तो विसरले नव्हते म्हणून ते अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला नमवू शकले.पुढे हा युद्ध प्रकार अतिरेकी, आखाती देशातील वेग वेगळ्या टोळ्या यांनीही अवलंबला आणि त्यात ते यशस्वी हि झाले.

गनिमी कावा हि एक कला आहे. आणि कला हि ज्याची त्याने आत्मसात करायची असते आणि फुलवायची असते. महाराजांनी तेच केलं, सह्याद्री, मावळ, पाऊस, माणसं, जंगल, नद्या, अमावास्या, घाट आत्मसात केली. महाराज मन कवडे झाले शत्रू ची इथंभूत माहिती हालचाली एवढाच काय त्यांच्या मनातलं ही महाराज ओळखू शकत होते. त्यात जादू वा दैवी चमत्कार नसून मानस शास्त्राचा भाग येतो. नुसताच शत्रू नाही स्वतःची प्रजा माणसं यांचा मन ही ते ओळखू शकत असणार. त्या मुळेच कोणाला कधी कुठे कसा गाठावा, कधी कोणाला सैल सोडावा हे त्यांना बरोबर जमलं.


George Castriot

त्याचा बरोबर त्यांना अजून एक कळत होतं कोठे थांबावं ते त्या मुळे महाराज कधीच एका धारेत, विचारात, प्रवाहात, भावनेत वाहत गेले नाही वा अडकले नाहीत. त्याचा परिणाम ते श्रीमान योगी झाले भोगी झाले नाही. तसेच कोणत्या युद्धात माघार घ्यावी कुठे माफी मागावी कुठे नमतं घ्यावं कुठे ढील द्यावी आणि कुठे तणावे हे त्यांना चांगले समजत होतं. आणि हेय ज्याला आत्मसात होतं तो गनीमीकाव्यात बाप माणूस होतो. कारण गनिमी काव्यात भावनेच्या भारत जाऊन कुठे थांबावं हेय तुम्ही विसरलात तर तुमचा शेवट नक्की.


व्हिएतनामी युद्धकुशल राजा Le Loi याचा व्हिएतनाम मधील भव्य पुतळा

त्याच बरोबर महाराजांनी योग्य गोष्टीचा योग्य उपयोग योग्य ठिकाणी केला गेला. योग्य गोष्टीचा योग्य ठिकाणी योग्य वापर ही तर गनिमीकाव्याचा मेख आहे.

महाराज गनिमी काव्याचे निर्माते नाही म्हणून नाराज नका होऊ मित्रानो. असा विचार करा महाराजांच्या ताटात देवानं काय वाढल तर राकट कणखर दगडांचा, अवखळ बेलगाम नद्यांनी वेढलेला सह्याद्री, अंगावर नीट कपडे नसलेली दोनवेळच्या अन्नाला मोहताज असलेली जनता जे त्यांचं सैन्य देखील होतं. आणि समोर अनेक बलाढ्य शत्रू. महाराजांनी गनिमी काव्यामुळे या सर्वांचा येथेच्छ ऊपयोग केला अगदी शत्रूंचा ही उपयोग केला आणि महाराष्ट्र धर्म संस्थापीला. उपाशी जनतेला अन्नाला लावलं सुखाचे दिवस दाखवले हे आपल्या राज्याचं कर्तृत्व. कुणा परदेशी माणसाचे महाराजनविषयी कौतुकाचे बोल आपल्यासाठी कौतुकाची गोष्ट खरी. पण ते महाराजांच कर्तृत्व नव्हे किंवा ते मोजण्याच माप नव्हे.

महाराजांचा आदर्श घेऊन, मिळालेल्या आव्हानातून, उपलब्ध साधनातून तुम्ही तुमच्यासाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी काय चांगल करता यात महाराजांचं खरं कर्तृत्व. समाजासाठी नाही जमलं निदान स्वतःच्या कुटुंबासाठी, आसपासचा लोकांसाठी केलत तरी खूप झालं. असंच प्रत्येक कुटुंब सुधारला तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही. आणि मग महाराजचं कर्तृत्व २० व्या शतकातही आपल्याला पाहायला मिळेल.

शिवराय असे शक्ती दाता

अभिजित वाघ

वाचा या आधीचा लेख शिवाजी महाराज आणी वियतनाम

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *