भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर ज्यांची संपत्ती अंबानी, टाटा,बिरला पेक्षाही जास्त आहे.

देशात श्रीमंतीची गोष्ट निघाली कि आपल्या डोक्यात येणारी नावे अंबानी,टाटा व बिरला हे आहे. परंतु तुम्हाला हे माहित होताच आश्चर्य वाटेल कि देशामध्ये काही मंदिरे असेही आहे ज्यांची संपत्ती या अरबपती उद्योगपतीपेक्षा जास्त आहे. भारतात देवाला दान देताना लोक नेहमी पैश्या एवजी सोने चांदी चढवतात. या मंदिराची संपत्ती सुध्दा ह्याच सोन्या चांदी मुळे वाढलेली आहे. पद्मनाबस्वामी, तिरुपती बालाजी आणि शिर्डीचे साईबाबा हे मंदिर या यादीत येतात…

पद्मनाभस्‍वामी मंदिर, केरल एकूण संपत्ती १.४७ लाख करोड रुपये

मुकेश अंबानी एकूण संपत्ती १.२६ लाख करोड रुपये

केरळमध्ये तिरुवनन्‍तपुरम स्थित पद्मनाभस्‍वामी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मन्दिर आहे. याची एकूण संपत्ती २२.३ बिलियन डॉलर म्हणजेच १.४७ लाख करोड रुपये एवढी आहे.

२०१५ मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती १८.९ बिलियन डॉलर म्हणजेच १.२६ लाख करोड रुपये आहे. हि संपत्ती मंदिराच्या संपत्ती पेक्षा कमी आहे. या संपत्ती मध्ये मंदिरातील बहुमुल्य वस्तूची किंमत आलेली नाही आहे. मंदिरातील कोठारात अनेक सोनसाखळ्या, शिक्के आणि सोन्याचे ढीग सापडले. हे मंदिर भगवान विष्णूचे मंदिर आहे. जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे.

या मंदिरातील विष्णूची मूर्तीची किंमतच ५०० करोड रुपये येवढी आहे. १७ किलो सोन्याचे शिक्के आहेत. खजाण्यात सापडलेला सोन्याचा हार दहा फुट लांब व १०.८ किलो सोन्याचा आहे. ५३६ किलो सोन्याचे शिक्के मंदिराकडे आहे. २० किलो सोन्याची शिक्के ब्रिटीश कालीन आहेत. नेपोलियन काळातील बहुतांश शिक्के यामध्ये आहे. यासोबतच बहुमुल्य हिरे आणि खडे या मंदिराकडे आहे.

तिरुपती बालाजी मन्दिर आंध्र प्रदेश एकूण संपत्ती ३३ हजार करोड

सध्यस्थितीत तिरुपती बालाजी देवस्थाना कडे ५२ हजार करोड रुपये किंमतीचे सोने आहे. म्हणून जगातील श्रीमंत मंदिरापैकी एक तिरुपती बालाजी मंदिर आहे. या देवस्थानाकडे १४,००० नियमित कर्मचारी काम करतात. त्यांचा पेन्शन फंड १५० करोड रुपये आहे.

बालाजी मंदिराचे सोने SBI व Indian Overseas Bank यांच्याकडे जमा आहे. मंदिराची हि संपत्ती देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल पेक्षाही जास्त आहे. मंदिराकडे ५२ हजार करोड रुपयाची संपत्ती आहे तर एचसीएल कडे ३३ हजार करोड रुपये येवढी संपत्ती आहे. जिंदाल ग्रुपची संपत्ती एकूण १८,०३० करोड रुपये आहे.

शिर्डीचे साईबाबा देवस्थान एकूण संपत्ती ५४० करोड रुपये

शिर्डीचे साईबाबा हे देवस्थान भारतातील एक लोकप्रिय देवस्थान आहे. येथील दानपात्र नेहमी पैश्याने भरून असतात. लोक इथे सोन व हिरे नेहमी दान करतात. या संस्थानची एकूण संपत्ती ५४० करोड रुपये येवढी आहे.

वैष्णोदेवी मन्दिर जम्मू एकूण संपत्ती ५०० करोड रुपये

वैष्णोदेवीला दरवर्षी १ करोड लोक भेट देतात. तिरुपती बालाजी नंतर सर्वाधिक लोक येथे भेट देतात. यांचे वार्षिक उत्पन्न एकूण ५०० करोड रुपये आहे. तसेच संस्थानकडे १.२ टन सोने जमा आहे.

सुवर्ण मंदिर अमृतसर

अमृतसर सुवर्ण मंदिर हरमिंदर साहिब गुरुद्वाराच्या नावाने ओळखल्या जातो रोज या ठिकाणी लाखो सिख लोक भेट देतात. हे संपूर्ण मंदिर सोन,चांदीने मढविण्यात आलेले आहे. परंतु मंदिराची एकूण संपत्ती आज पर्यंत जाहीर केलेली नाही. रोज येथे २४/३६५ दिवस किमान ४०,००० हजार लोकांना मोफत जेवण मिळते हे विशेष आहे. शीख समुदायाचा आदि ग्रंथ हा हिरे जडित,चांदीचे खांब असलेला आणि सोन्याच्या पाठावर ठेवलेला आहे. या मंदिराची संपत्ती करोडोच्या घरात आहे हे नक्की..

सिद्धी विनायक मंदिर मुंबई एकूण संपत्ती १२५ करोड रुपये

मुंबईमधील सर्वात श्रीमंत देवस्थान सिद्धी विनायक मंदिर हे आहे. गणपतीचे हे देवस्थान आहे, मंदिराकडे ३.७५ किलो सोने आहे. रोज २५,००० लोक येथे दर्शन घेतात. गणेश चतुर्थी दरम्यान हा आकडा लाखाच्या घरात जातो. या मंदिराची एकूण संपत्ती १२५ करोड रुपये येवढी आहे.

हे आहेत काही भारतातील खासरे श्रीमंत देवस्थान…

वाचा शेगाव खासरे श्रद्धेचे व्यवस्थापन करणारे विश्वस्थ

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *