जगातील सगळ्यात महागडे ११ मोबाईल…

काल आयफोन ८ हा मोबाइल बाजारात आला आणि त्याच्या किंमतीवर अनेक जोक whatsapp व facebook वर फिरू लागलीत पण खालील मोबाइलच्या किंमती पुढे iphone नगण्य आहे. नक्की वाचा खासरे वर जगतील सर्वात महागडे मोबाईल

IPHONE PRINCESS PLUS $176,400 ( अंदाजे १ करोड ८ लाख रुपये)

दि प्रिन्सेस प्लस हे नाव या आयफोन ला त्यावर वापरलेले प्रिन्सेस कट हिरे १३८ हिरे या मोबाईलवर वापरलेले आहेत. ह्या फोनवर एकूण ३१८ हिरे वापरण्यात आलेले आहे. १७.७५ कॅरटचे हिरे या फोनवर वापरलेले आहे त्यासोबत १८ कॅरट पांढर्या सोन्याची बॉडी या मोबाईलची आहे.

SAVELLI SMARTPHONES $250,000 (अंदाजे १ करोड ५० लक्ष रुपये)

Savelli हि कंपनी जगातील सर्वात महागडे मोबाईल बनवीनार्या कंपनी पैकी एक आहे. १८ कॅरट सोन्यात हे मोबाईल बनविले जातात त्यामध्ये हिरे, पाचू इत्यादी बहुमुल्य रत्ने वापरून मोबाईल सजवला जातो. याची शान तुम्ही तुमच्या बजेट नुसार वाढविल्या जाऊ शकते त्या करिता शहामृग, अजगर, समुद्री घोरपड इत्यादीचे चमडे वापरतात. या कंपनीने बनविलेला सर्वात महाग मोबाईल Emerald Night हा आहे. त्यामध्ये १८ कॅरट गुलाबी सोने व ४०० पाचू वापरण्यात आले.

Vertu Signature Cobra $310,000 (अंदाजे ₹ 1 करोड ६७ लाख रुपये)

Vertu Signature Cobra जगातील सात नंबरचा महागडा फोन आहे. ह्या मोबाईल वर बनविण्यात आलेले कोब्रा साप ह्या मोबाईलची ओळख आहे. हा मोबाईल फ्रेंच ज्वेलर Boucheron याने डिझाईन केला आहे. यामध्ये १ पिअर कट हिरा, एक पांढरा गोल हिरा, २ पाचू आणि ४३९ रुबी वापरण्यात आले आहे.

BLACK-DIAMOND VIPN SMARTPHONE $300,000 (अंदाजे १ करोड ८५ लाख रुपये)

जॅरेन गोह याने Black-Diamond VIPN Smartphone सोनी करिता डिझाईन केला होता. या फोन मध्ये विशेष म्हणजे या मध्ये पॉलीकार्बोनेट काच व LED Technology आणि या फोनमध्ये दोन हिरे वापरण्यात आले आहे. एक हिरा फोनच्या पाठीमागे आणि एक हिरा फोनच्या Navigation Stick ला होता.

GRESSO LUXOR LAS VEGAS JACKPOT $1 MILLION (अंदाजे ६ करोड १५ लाख रुपये)

Gresso सुध्दा जगातील महागडे मोबाईल बनविणाऱ्या कंपन्यापैकी एक कंपनी आहे. कंपनीने ह्या मोबाईलची घोषणा करताच एकच धुमाकूळ सगळीकडे झाला. आत्तापर्यंत कंपनीने फक्त ३ युनिट बनविलेले आहे. आणि प्रत्येकाच्या पाठीमागे त्याचा नंबर कोरलेला आहे.

DIAMOND CRYPTO SMARTPHONE $1.3 MILLION (अंदाजे ८ करोड रुपये)

हिऱ्याचे कारागीर Peter Aloisson यांच्या रशियन उद्योगसमुहाने हा मोबाईल बनविलेला आहे. हा मोबाईल जगातील सर्वाच्च तंत्रज्ञानाने सज्ज आहे. ह्यामध्ये ५० हिरे वापरलेले आहे. ह्या मोबाईलची किंमत त्यामुळेच ८ करोड रुपये आहे.

Goldvish “Le million” $1.3 MILLION (अंदाजे ८ करोड ३२ लाख रुपये)

Goldvish “Le million” हा मोबाईल नावाजलेले डिझायनर Emmanuel Gueit ह्याने बनविलेला आहे. स्वीतझेर्लंड मध्ये हा मोबाईल लॉन्च करण्यात आला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने हा मोबाईल Millionaire Fiar in Cannes ह्या समारंभात सर्वात महागात विकल्या गेलेला मोबाईल म्हणून नोंद करण्यात आली आहे. ह्या फोन मध्ये १८ कॅरट White Gold व २० कॅरटचा VVS1हिरा वापरण्यात आलेला आहे.

IPHONE 6 AMOSU CALL OF DIAMOND $2.7 MILLION (अंदाजे १६ करोड ६० लाख रुपये)

iPhone Amosu Call of Diamond हा मोबाईल ६,१२७ लहान हिऱ्यानि सजविलेला आहे आणि एक मोठा हिरा त्याच्या पाठीमागे वापरलेला आहे. ज्याला Apple Logo चा आकार देण्यात आलेला आहे. फोनची पूर्ण बॉडी १८कॅरट सोन वापरून बनविलेला आहे. हा एक मोबाईल बनवायला २ महिने लागतात.

IPHONE 5 BLACK DIAMOND $15.3 MILLION (अंदाजे ९४ करोड रुपये)

Stuart Hughes हा apple कंपनीचे महागडे मोबाईल डिझाईन करत आसतो. त्यानेच हा iphone 5 बनविलेला आहे. ह्या मध्ये काळ्या रंगाचा अत्यंत दुर्मिळ हिरा वापरलेला आहे. हा मोबाईल चायना मधील एका बिजनेसमेन कडे आहे. त्याच्या करिता Stuart Hughes ने हा मोबाईल बनविला आहे.

IPHONE 6 FALCON SUPERNOVA EDITION $48.5 MILLION (अंदाजे ३०० करोड रुपये)

अमेरिकेतील “SuperNova” या कंपनीने हा iphone 6 Rose Gold वापरून डिझाईन केला आहे. ह्याच्या पाठीमागे गुलाबी हिरा लावण्यात आलेला आहे. हा मोबाईल ऑर्डर करण्याकरिता ५०% रक्कम पहिले भरावी लागते.
हाच मोबाईल नीता अंबानी वापरतात. ह्या मोबाईलमध्ये २४ मॉडल आहेत यापैकी तुम्ही कोणताही प्रकार निवडून हा मोबाइल बनवून घेऊ शकता.

आम्ही हि खासरे माहिती आपल्याकडे पोहचवली आता तुम्ही हि माहिती इतरापर्यंत पोहचवायला एक शेअर तर बनतोना…

वाचा वरील मोबाईल वापरणारा पुणेकर

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *