या हॉलीवूड मुव्हीचे बाहुबलीने केले सीन कॉपी..

बाहुबली सिनेमा आपण अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. सिनेमा आहे हि तसा सिनेमातील फाईट सीन, सिनेमातील इफेक्ट सर्व एकसे बढकर एक आहे. सगळेच म्हणत होते मटकिला मोड नाही बाहुबलीला तोड नाही.

भारतीय सिनेमा हा हॉलीवूडची कॉपी करतो हा शिक्का नेहमी मारल्या जातो परंतु आता हॉलीवूड आपली कॉपी करेल असे प्रेक्षक बोलू लागले. परंतु आमच्या खासरे टीमनि थोडफार निरक्षण केल्यावर खालील गोष्टी आढळल्या ज्या बघून थोडा भ्रमनिराश झाला.

चला तर बघूया कोणत्या सिनेमातून बाहुबलीने सीन चोरली आहेत.

सर्वात पहिले बाहुबली सिनेमाची पोस्टर बघूया त्याची खूप वाह वाह झाली होती. कारण पहिल्यादाच हिंदी सिनेमात अश्या प्रकारे प्रयोग करण्यात आला होता. लहान बाळाला पाण्यातून वर काढणारा हात हा Simon Birch या हॉलीवूड मूवीच्या पोस्टरमधून कॉपी केला आहे.

दुसरे पोस्टर अनुष्का शेट्टी हिचे ती हातात कड्या बांधून उभी असलेली देवसेना. हे पोस्टरसुध्दा हॉलीवूड मुव्ही The Book Of Esther मधून कॉपी केली आहे.

प्रभास धबधब्यावरून वर चढण्याच्या प्रयत्नात खाली पडतो तो सीन अंगावर काटा आणतो परंतु हा सीन चोरला आहे हॉलीवूडच्या KingKong सिनेमातून खाली दिलेल्या फोटोत तुम्ही तो सीन व बाहुबली दोन्ही सीन सोबत बघू शकता..

त्यानंतर येतात फाईट सीन यामधील Action तर भयंकर आहे. बाहुबली अश्या सीन करिता गाजला आहे. त्यापैकी एक सीन हा हॉलीवूड मुव्ही WonderWoman मधून कॉपी करण्यात आला आहे…

हा आहे ओरीजनल बाहुबली मुव्ही मधील सीन

आणि हा आहे हॉलीवूड मुव्ही WonderWoman मधील सीन या दोन्ही सीन मध्ये तुम्ही साम्य बघू शकता..

हा मूवी बघताना बऱ्याच मित्रांना ३०० या हॉलीवूड मुव्हीची आठवण आली असेल. येणारच कारण यातील लढाईमधील सीन व बहुबलीचे सीन सेम आहेत. खालील फोटोत तुम्ही बाहुबली सिनेमाचा सीन पाहू शकता.

आणि हा सीन आहे हॉलीवूड मुव्ही बाहुबलीचा आहेन सेम तो सेम

त्यानंतर बाहुबलीच्या भोवताल जी गावातील लोक जमा होतात आणि त्याचा जयजयकार करतात. तो सीन गेम ऑफ थ्रोन व सुपरमेन या हॉलीवूड मालिका व चित्रपटातून मिळवून बनविलेला आहे.

सुपरमेन मधील सीन आपण बघू शकता..

आणि हा आहे बाहुबलीमधील सीन

हि आहेत काही सीन जी हॉलीवूड मधून बाहुबली या सिनेमाने कॉपी केली आहेत…
वाचा संगीतकार अजय अतुल यांचा खडतर प्रवास..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *