मराठमोळ्या अजय अतुल विषयी तुम्हाला ह्या गोष्टी माहीती आहे का?

अजय-अतुल हे नाव ऐकले की आपोआपच मराठी माणसाचे पाय थरथरायला लागतात. ह्रद्याचे ठोके संगीतावर उडायला लागतात. महाराष्ट्रातील संगितास यांनी ज्या उंचीवर पोहचवीले आहे ते कार्य कुठल्याही संगीतकारास जमलेले नाही आहे. यांच्या गाण्याच्या चाली हिंदी चित्रपटात कॉपी होत आहे.

मराठीबरोबरच हिंदीतही यशाची पताका फडकवणारे हे दोघेच महाराष्ट्रियन बंधु. अजय अतुल यांना कुठलहिही संगीताची पार्श्वभुमि नसताना हे स्थान गाठले आहे. अजय आणि अतुल यांच्यातील अतुल गोगावले यांचा आज (११ सप्टेंबर) वाढदिवस आहे. चला बघुया अजय-अतुल विषयी अपरिचीत खासरे माहिती…

अतुल आहेत थोरले
अजय-अतुल यांच्यात अतुल हे थोरले तर अजय हे धाकटे बंधिू आहेत. २१ ऑगस्ट १९७६ रोजी पुण्यात अजय यांचा जन्म झाला.तर थोरले अतुल यांचा जन्म ११ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. दोघांच्या वयात दोन वर्षांचे अंतर आहे.

अतुल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही अजय-अतुलच्या आजवरच्या प्रवासाबाबत तुम्हाला सांगणार आहोत. लहानपणापासूनच हे दोघे सोबत आहे. त्यामुळे वाढदिवस अजयचा असला तरी आपण आज दोघांच्या कारकिर्दीबाबत जाणणार आहोत.

अजय अतुल यांचा जन्म व बालपण संपुर्ण पुण्यातील राजगुरू नगर येथे झाले आहे. दोघांनाही लहानपणापासून संगिताची आवड होती.

“अजय-अतुल” शिरुर जि.पुणे येथे बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेच्या उद्घाटना साठी आले होते तेव्हा अजय-अतुल यांनी या लहान वयात पोवाडा सादर केला होता.

तो पोवाडा बाबासाहेब देशमुखांचा होता. अतुल पोवाडा म्हणायचा तो थांबला की अजय कोरस गात असे.

त्याने म्हटलेला पोवाडा व आवाज बाळासाहेंबाना एवढा आवडला की त्यांनी स्वतः या दोघा भावांचा हार घालुन सत्कार केला. यानंतर अजय अतुलनी कित्येक दिवस तो हार सांभाळुन ठेवला होता.

अजय अतुल यांच्याकडे एक सायकल होती ती त्याच्या आवडीची या सायकलवर फिरताना त्यांनी अनेक चाली रचल्या व त्या पुढे हिटही झाल्या.

एनसीसीच्या कॅम्पमध्ये अजय अतुलला गाण्याचा योग आला यांनी त्या गाण्याची चाल बदलवली आणी त्या गाण्याल
प्रथम पुरस्कार ही मिळाला होता.

परीस्थिती गरीब असल्यामुळे सुरवातीच्या काळात अजय अतुल यांना गाण्याची चाल कोणाला सांगायची असेल तर ते तोंडाने त्या वाद्याचा हुबेहुबे आवाज काढत गाणे म्हणत.

कुटूंबाने त्याच्या संगिताच्या वेडास कधि विरोध केला नाही परंतु आर्थिक परिस्थिती अभावी त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने संगीत शिकता आले नाही.

त्याच्या परिस्थितीची जाण ठेऊन एका संगीत निर्मात्याने त्यांना पैश्याऐवजी हार्मोनियम भेट दिला होता.

पहिला किबोर्ड घेण्याकरीता त्यांना खुप घालमेळ करावी लागली. आई वडिलांच्या मागे लागुन व स्वतः काही पैसे टाकुन त्यांनी सव्वा लाख रुपयाचा किबोर्ड घेतला.

२००४ साली अजय अतुल मुंबईला आले परंतु आर्थिक परीस्थिती बेताची असल्याने ते बचती करता स्टुडिओ मध्येच झोपत असे.

पहिला त्यांचा हिट अल्बम गणपती बाप्पाचा “विश्व विनायका” हा टाईम्स म्युझिक सोबत केलेला अल्बम तुफान हिट झाला त्यांचे दिवस पालटले. या अल्बममध्ये त्यांच्यासोबत शंकर महादेवन व एस. पी. बालसुब्रम्हण्यम ने काम केलेले आहे.

रामगोपाल वर्मा हा नविन कलाकारांसोबत काम करतो. त्यांचा चित्रपट गायब ह्या चित्रपटाने अजय अतुल यांना चित्रपट सृष्टीत ओळख मिळवुन दिली.

परंतु अजय अतुल यांच्या नावाचा गाजावाजा झाला मराठीतील “अगबाई अरेच्चा” चित्रपटामुळे आजही या चित्रपटाचे गाणे सर्वत्र ऐकायला मिळतात. मल्हार वारी या गाण्यामुळे महाराष्ट्राचे संगितातील आयडॉल झाले.

अजय अतुल यांनी गाजलेल्या नाटकांना संगित दिलेले आहे. सही रे सही या नाटकाला त्यांनीच संगीत दिलेले आहे.

त्यानंतर एकानंतर एक हिट संगित त्यांनी सिनेमाला दिले. जोगवा, नटरंग ह्या चित्रपटांनी त्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

आता हिंदीचित्रपट सृष्टिचे अजय अतुल बादशाह झालेले आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांना अजय अतुल यांनी संगित दिलेले आहे.

५६ वर्षात पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवायचा मान अजय अतुल यांच्या नावावर आहे.

अजय अतुल जोडीमधला अतुल मोठा आहे. परंतु नावाचा रिदम अजय अतुल असा योग्य वाटतो म्हणुन त्यांनी चित्रपटसृष्टीत हे नाव ठेवले.

सिंफॉनीक ऑर्केस्ट्रा हॉलीवूडमध्ये संगितबध्द झालेले पहिले भारतीय गाणे अजय अतुल यांचे सैराट चित्रपटातील येड लागल हे आहे. यामध्ये विविध संगीत देण्याकरीता १००च्या वर कलाकारांचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये ६६ संगितकार, ४५ तंतुवाद्य, ६ बासुरी व १ विणा वापरण्यात आला होता.

फोर्ब्सने यंदाची टॉप १०० सेलिब्रिटीची यादी जाहीर केली. शाहरुख खान, अमिताभ बच्चन सोबत यामध्ये अजय अतुल यांनी ८२ वे स्थान पटकावले आहे.

नटरंग सिंनेमातील खेळ मांडला गाणे व संगिताने ओसाका, वाकायामा, टोकियो या जपानी शहरात चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती.

ए. आर. रहमान संगित क्षेत्रातील जगात गाजणार नाव ते सुध्दा अजय अतुलच्या संगिताचे चाहते आहे. त्यांनी हे अनेकदा मुलाखातीत बोलुन दाखविले आहे.

मुंबईत रहायला घर नसल्यामुळे स्टुडिओ मध्ये झोपणा-या अजय अतुल यांनी पुणे येथे स्वप्नातील बंगला बांधला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात 2013मध्ये त्यांनी आलिशान घर उभे केले. स्टुडिओ फाइव्ह इंडिया या कंपनीत कार्यरत सचिन खाटपे यांनी त्यांच्या घराचे इंटेरियर डिझाइन केले आहे.

अजय-अतुल यांच्या घरात एक सुंदर मंदिर असून तिथे विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मुर्ती विराजमान आहे. शिवाय अजय अतुल यांनी घरात एक स्टुडिओ करुन घेतला आहे. येथे त्यांनी अनेक गाण्यांच्या चाली तयार केल्या आहेत. या घराचे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर प्रशांत भट. यांनी काढले आहे.

चला तर आपल्या मराठमोळ्या अजय अतुलला खासरे तर्फे सलाम आणि ह्या दोघांच्या संघर्षास एक शेअर तर बनतोच…

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *