भारताला ऑलम्पिकसहित पाच अंतराष्ट्रीय किताब मिळवून देणारा “गुंगा पहलवान”

भारताला ऑलम्पिकसहित पाच अंतराष्ट्रीय किताब मिळवून देणारा “गुंगा पहलवान” उर्फ विरेंद्र सिंग याची प्रेरणादायक..

भारत सरकार बुलेट ट्रेन आणि स्मार्ट सिटी बनविण्यात व्यस्त आहे परंतु भारतात खेळ (क्रिकेट व्यतिरिक्त) हा एक दूर्लक्षित घटक आहे. हे एक दुखदायक सत्य आहे. भारतात अनेक प्रतिभावंत खेळाडूची नेहमीच उपेक्षा होते. यापैकीच एक ३२ वर्षीय तरूण वीरेंद्र सिंघ उर्फ गुंगा पेहलवान हा आहे. गुंगा पहालवान त्याचे सामर्थ्य एका नंतर एक येणाऱ्या स्पर्धत सर्वासमोर दाखवीत आहे.

त्याने आत्तापर्यंत पॅराऑलम्पिकमध्ये २ सुवर्णपदक, १ कास्यपदक मिळविले आहे. तसेच अंतराष्ट्रीय मुकबधीर कुस्ती स्पर्धत त्याला एक रौप्यपदक व कास्यपदक मिळाले आहे. अंतराष्ट्रीय स्पर्धत भारताचा झेंडा गर्वाने फडकविणारा वीरेंद्र मात्र प्रसिद्धी पासून दूर आहे. रोजीरोटी चालविण्याकरिता तो सामान्य मल्ला सोबत कुस्ती खेळतो आणि जिंकतो सुध्दा परंतु हि एक निंदनीय गोष्ट आहे.

वीरेंद्रला पहिले सुवर्ण पदक २००५ साली मेलबर्न येथील स्पर्धत मिळाले. त्यानंतर २०१३ साली झालेल्या बल्जेरीया येथील अंतराष्ट्रीय मुकबधीर ऑलम्पिक कुस्ती स्पर्धत दुसरे सुवर्ण मिळाले. तो एकमेव भारतीय आहे ज्याने हा किताब मिळविला.

यासोबतच त्याने २००८ साली आर्मेनिया येथे झालेल्या दुसऱ्या अंतराष्ट्रीय मुकबधीर कुस्ती स्पर्धत एक रौप्यपदक व तैपई येथे २००९ साली कास्य पदक मिळविले. सोफिआ,बल्जेरीया येथे झालेल्या जागतिक मुकबधीर कुस्ती स्पर्धा २०१२ साली त्याने कास्यपदक मिळविले आहे. असा आहे हा भारताचा मल्ल !

वीरेंद्र हरियाना पॉवर कॉर्पोरेशन मध्ये कारकुनाची नौकरी करतो. सोबतच त्याला त्याने खेळलेल्या कुस्त्यामधून काही मिळकत होते. सुशील कुमार सोबत तो छत्रसाल स्टेडियम मध्ये त्याच्या कुस्तीची तालीम करतो. मागे त्याने स्वतःवर चित्रित केलेल्या “गुंगा पहलवान” या माहितीपटात भूमिका केली होती. या माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार हि मिळाला आहे.

या माहितीपटात त्याने केलेला संघर्ष दाखविण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रशिक्षकांनी त्याला भारतातील एक सर्वोत्कुष्ट मल्ल म्हणून किताब दिला आहे. परंतु कर्णबधीर असल्यामुळे त्याला सामान्य ऑलम्पिकमध्ये भाग घेता येत नाही कारण काय तर त्याला कुस्तीत वाजवलेली शिट्टी ऐकू येत नाही. शारीरिक व्यंगामुळे त्याला असे बाहेर रहावे लागते हि एक क्रूर थट्टाच आहे.

मागे एक वाहिनीस दिलेल्या मुलाखातीत वीरेंद्रनि त्याच्या दुभाषी मार्फेत सांगितले होते कि “सुवर्णपदक मिळवूनही काहीही बदल झाला नाही. माझ्याकडे आत्ताही फक्त दोन जोडी कपडे व एक जोडी बूटाची आहे ज्यामध्ये मी प्रशिक्षण करतो. माझ्या कामगिरीकरिता मला कोणीच काही मदत केली नाही. परंतु यापासून मी हिंमत हरलो नाही कारण मी जे काम करतो ते मला आवडते.

त्याच्या पेक्षा दुप्पट असणार्या पेहलवानांना तो असाच धोबिपछाड देऊन जिंकतो. वीरेंद्र उर्फ गुंगा पहेलवानला खासरे तर्फे सलाम…