ताक पिण्याचे हे अनेक फायदे माहिती करून घ्या.

जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. किंवा तुम्ही ऐकलेसुध्दा असेल कि ताक पीत चला परंतु आपण ह्या गोष्टी कडे एवढे गांभीर्याने लक्ष देत नाही. परंतु ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत व ते कसे आरोग्या करिता उपयोगी आहेत हे आपण आज खासरे वर जाणून घेऊया… जाणून घ्या ताकाचे हे फायदे

ताकात लॅक्‍टिक ऍसिड, अनेक मिनरल्स जसे की, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस आणि रिबोफ्लेविन असते. कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे. पोटॅशियम एक आवश्‍यक इलेक्‍ट्रॉन आहे, जे हार्टच्या फंक्‍शनसाठी आवश्‍यक असते. फॉस्फरस हेल्दी सेल्स आणि टिश्‍यूजसाठी आवश्‍यक आहे, हे रिबोफ्लेविन नसांसाठी काम करते आणि अन्नाचे रुपांतर ऊर्जेत करण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. यामध्ये फॅट कंटेंट खूप कमी प्रमात असतात. हे अन्न नलीका आणि अमाशयमध्ये जमा झालेले फॅट कमी करण्यास मदत करते.

ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

यात प्रोबायोटिक्‍स असतात, जे तुमच्या पचन नलिकेमधील नुकसानदायक बॅक्‍टेरियाला वाढण्यापासून थांबवतात. यामुळे कॅंसरचा धोका कमी होण्यास मदत होते.

ताकाता साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

एवढे गुण केवळ ताकामुळे भेटतात. परंतु आपल्या कडे ताक असून सुध्दा अज्ञाना अभावी आपण ताकाकडे दुर्लक्ष करतो. ताक शरीरास अत्यावश्यक आहे तर उद्यापासून रोज टाक पिनार का?

वाचा कोमट पाणी पिल्याचे फायदे

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *