आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय? नो टेन्शन…

तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल करायचा असेल तर काही टेन्शन घेऊ नका. कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता.
फार सोप्या पद्धतीने आपण आपल्या आधारकार्डमध्ये बदल करू शकतात.

कसे कराल बदल…
https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा

‘Update Your Aadhaar Card’ या टॅबवर क्लिक करा
नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता… पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीनं… आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं…

‘Fill up 4-Step Online Request’ च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील Update Aadhaar Data या ऑप्शनवर क्लिक करा

नवं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील… आणि त्यांची उत्तरंही…

ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतील. व्यक्ती आपलं नाव, पत्ता, लिंग, जन्मदिवस, मोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात.
डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘click here’ वर क्लिक करा.
अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.

यानंतर तुम्हाला ‘To submit your update/ correction request online please’ च्या समोर Click Here वर क्लिक करावं लागेल.
यानंतर उघडलेल्या ‘Aadhaar Self Service Update Portal’वर तुम्ही पोहचाल. इथे तुम्हाला अगोदर 12 अंकांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.

टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल
यानंतर तुम्हाला तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यातील जी माहिती बदलायचीय त्यावर क्लिक करा
Data Update Request उघडल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल

सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसू शकेल… त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा
सबमिट केल्यानंतर Document Upload चा सेक्शन समोर दिसेल. इथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकाल
इथे तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं नाव सिलेक्ट करावं लागेल.

यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मॅसेज मिळेल… या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकानं तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करू शकाल.

हि झाली आधार अपडेट करण्याची ऑनलाईन पद्धत ऑफलाईन पद्धतीने हि तुम्ही आधार अपडेट करू शकता.

पोस्टाद्वारे आधार अपडेट करण्याकरिता इथे क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करा. त्यानंतर तुम्ही या अर्जातील संपूर्ण माहिती भरावी. खालील पत्त्यावर ती फॉर्म पोस्ट करू शकता. त्या पाकिटावर Aadhar Updat/Correction नक्की लिहावे.

Address -1
UIDAI
Post Box No. 10
Chhindwara,
Madhya Pradesh- 480001
India

Address-2
UIDAI
Post Box No. 99
Banjara Hills
Hyderabad- 500034
India

तसेच जवळील आधार कार्ड सेंटर ला तुम्ही भेट देऊन आधार अपडेट करू शकता. या करिता २५ रुपये एवढी फी लागेल. सेंटरची यादी तुम्हाला येथे मिळेल क्लिक करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *