लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे..

आयुष्यात यशस्वी होण्याकरिता सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे असे बरेच लोक सांगतात. जर आपण सकाळचा वेळ सदपयोगी लावला तर दिवस हि आनंदी जाऊ शकते.
आताही अनेक लोक बिछान्यावर पडून विचार करत असेल आपले आयुष्य अधिक सुखकर कसे होईल. या जगातील प्रत्येक यशस्वी माणूस हा वेळेच महत्व ओळखून आहे. त्यामुळे ते रोज सकाळी लवकर उठतात. प्रत्येक व्यक्तीचा सकाळी उठल्यावर दिनक्रम वेगवेगळा आहे. चला तर खासरे वर बघूया जगातील काही असे लोक जे सकाळी लवकर उठून काय करतात…

Jack Ma- Founder, Alibaba Group

मी नेहमी स्वतःला सांगतो कि आपला जन्म हा कामासाठी नसून आयुष्याची मजा घेत जगण्याकरिता आहे. दुसर्या करिता आयुष्य सोप करणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे. जर तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य कामात घालविले तर भविष्यात तुम्हाला याचा पश्चाताप होईल.
ह्या भावना ह्या Jack Ma च्या ह्रदयातून आलेल्या आहे. तो रोज सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान उठतो आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची मजा घेतो. तो फक्त काम दिवसातून अर्धा तास करतो आणि बाकी वेळ आपल्या परिवाराला देतो. alibaba कंपनीचे वार्षिक उत्पन्न ३०५ अफ्ज डॉलरपर्यंत पोहचलेले आहे.

Jeff Bezos- CEO, Amazon

ग्राहक सेवेवरील त्याच्या कार्यामुळे तो एक ऑनलाईन खरेदी मधील यशस्वी वेबसाईट चालवतो. जेफ हा स्वतःला कामात गुंतवून ठेवतो. परंतु झोपण्याला तो पुरेपूर वेळ देतो आणि सकाळी लवकर उठणे हा त्याचा रोजचा दिनक्रम आहे.

Tim Cook, CEO, Apple

टीम कुक सकाळी उठून सर्वात पहिले ४:३० वाजता त्याचे कंपनीचे इमेल पाठवितो. आणि सकाळी ५ वाजता तो रोज व्यायाम करतो. एवढे करूनही तो रोज रात्री उशिरा झोपतो. कार्यालयात येणारा पहिला आणि जाणारा शेवटचा व्यक्ती टीमच असतो. मागील वर्षी apple ची कमाई २१५ अफ्ज डॉलर पर्यंत पोहचली होती.

Bill Gates, Co-founder, Microsoft

बिल गेट्स रोज सकाळी १ तास नियमित व्यायाम करतो. त्यामध्ये धावणे आणि कार्डीओ व्यायाम हा महत्वाचा आहे. त्याकरिता तो विडीओ बघून व्यायाम करत असतो.

Mark Zuckerberg- Co-Founder and CEO, Facebook

मार्क झकेनबर्ग रोज सकाळी ६ला उठून त्याच्या कार्यालयात जातो. www.sleepypeople.com च्या मते मार्क हा अतिशय कमी झोप घेतो कधी कधी तो सकाळी ५ पर्यंत काम करत असतो. परंतु आता त्याने हि पद्धत बंद केली आहे.

Jack Dorsey- Co-Founder, Twitter
jack dorsey रोज सकाळी ५:३० ला उठून सायकलिंग करत असतो. सोबतच ध्यान सुध्दा त्याच्या दिनचर्येचा हिस्सा आहे. रोज तो ५ मैल पळत असतो.

Richard Branson- Founder, Virgin Group

रिचर्ड ब्रांसन रोज सकाळी त्याच्या स्वतःच्या मालकीच्या बेटावर पोहायला जात असतो. त्यानंतर तो टेनिस खेळतो आणि आरोग्यदायी नाश्ता करून त्याच्या दिवसाची सुरवात होते. virgin group च्या ४०० विविध कंपन्या वेगवेळ्या क्षेत्रात काम करतात. ५ बिलियन डॉलर दरवर्षी तो एकटा कमवतो.

Warren Buffett- CEO, Berkshire Hathaway

Warren Buffett रोज सकाळी ६:४५ ला उठून कमीत कमी ६ वृत्तपत्र वाचतो. तशी त्याची दिनचर्या फिक्स नसते. या व्यक्तीचे विशेष हे आहे कि तो त्याचा दिवसातील ८०% वेळ वाचनात घालवत असतो.

Ratan Tata- Chairman Emeritus, Tata Sons

रतन टाटा ची दिनचर्या सकळी लवकर सुरु होते. रोज सकाळी ६ वाजेपासून त्याच्या बैठका सुरु होतात. विकेंडला स्वतःची गाडी तो स्वतः चालवीत असतो. बैठकीस जाण्याकरिता त्याचे खाजगी विमान रोज सकाळी तयार असते.

Indra Nooyi- CEO, PepsiCo

रोज सकाळी सूर्य निघण्या अगोदर इंद्रा नुरीचा दिनक्रम सुरु होतो. जेव्हा सर्व जग जागे व्हायचे असते तोपर्यत इंद्रा नुरी तिचे बरेच काम संपवून टाकते. तिच्या मते सकाळी काम लवकर होतात.

Narendra Modi, Indian Prime Minister

नरेंद्र मोदि यांची अधिकृत वेबसाईट www.narendramodi.in नुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदि रोज सकाळी ५ वाजता उठून प्राणायाम करतात. झोपायला कितीही वेळ झाला तरी त्यांचे हे काम ते नित्यनेमाने करतात.

Donald Trump, President of the USA

डोनाल्ड ट्रम्प यांचा दिवस सकाळी ४ पासून सुरु होतो. रोज सकाळी तो विविध वृत्तपत्र वाचतो त्यानंतर तो सकाळी twitter चेक करत असतो. केस ठीक करण्याकरिता हि त्याचा बराच वेळ जातो असा तो स्वतः सांगत असतो.

Virat Kohli- Cricketer

विराट कोहली रोज सकाळी ६ ला उठतो आणि त्यानंतर व्यायाम करत असतो. सकाळी वजन उचलणे हे सुध्दा त्याच्या व्यायामाचा भाग आहे. त्यामुळे त्याची बॉडी चांगल्या प्रकारे बनलेली आहे.
म्हणून लवकर उठणे आवश्यक आहे.
चला तर मग तुम्ही उद्या पासून किती वाजता उठणार हे आजच ठरवून घ्या आणि कमेंट करा….

image courtesy yourstory…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *