१४ महिन्याच्या चिमुकल्याने वाचविला आराध्याचा जीव…

गुजरात येथील केवळ १४ महिने वय असलेला सोमनाथ शाह हा सर्वात कमी वयाचा हृदय आणि किडनी दान करणारा ठरलेला आहे. मरावे परी अवयवरुपी उरावे या म्हणीचे जिवंत उदाहरण म्हणजे सोमनाथ आहे. आराध्या मुळे वय ३ वर्ष ५ महिने हिला नवीन ह्रदयाची आवश्यकता होती. काही महिन्या अगोदर तिला वाचविण्याकरिता सोशल मिडीयावर #SaveAaradhya हा ट्रेंड सर्वत्र संपूर्ण भारतात प्रसिध्द झाला. त्याचीच हि प्रचीती कि आराध्याला नवीन हृदय मिळाले आणि तिचा जीव वाचला. सोमनाथची किडनी हि अहमदाबाद येथील Institute of Kidney Diseases and Research Center (IKDRC) ला देण्यात आल्या.

सोमनाथचे मुळ गाव बिहार मधील सिसवान जिल्ह्यात मुबारकपूर हे आहे. त्याचे वडील काही दिवसा अगोदर गुजरात येथे मिलमध्ये काम करत होते. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सोमनाथ नेहमी प्रमाणे त्याच्या बहिणीसोबत खेळत होता अचानक तो पायरीवरून तो पाय घसरून डोक्यावर पडला. बेशुध्दअवस्थेत सोमनाथला New Civil Hospital Surat येथे सोमनाथला भरती करण्यात आले.

डोक्यावर पडल्यामुळे सोमनाथच्या मेंदूला मार बसला होता आणि त्याच्या कवठीमध्ये अनेक फ्रॅक्चर होते. त्यानंतर सोमनाथला ४ तारखीला ब्रेन डेड म्हणून डॉक्टरांनी सांगितले. त्याचे वाचणे अशक्य होते. दवाखान्याने सुरत येथील Donate Life या संस्थे सोबत संपर्क साधला त्या संस्थेचे सुरत येथील अध्यक्ष निलेश मंडलेवाला यांनी सोमनाथच्या आई वडिलाला अवयव दानाचे महत्व समजून सांगितले. आणि सोमनाथचे आई वडील अवयव दान करण्याकरिता संमती दर्शवली. परंतु सर्वात कठीण काळ हा होता कि अवयव कमी वेळात गरजू व्यक्तीस पोहचते करणे.

सुरत येथून मुंबईला आराध्याला ह्र्दय पोहचविण्याची प्रक्रिया सकाळी ७:३० वाजता सुरु झाली. Fortis Hospital मुलुंड येथील तज्ञ डॉक्टरांची टीम सुरत येथे ७:४५ ला पोहचली आणि मुंबईला ह्रदय घेऊन जाण्याचा प्रवास ७:५५ ला सुरु झाला. फक्त ४५ मिनटात ते डॉक्टरांची टीम मुंबई येथे पोहचली आणि सकाळी ९ वाजता ह्र्दय प्रत्यारोपण करण्याची शाश्त्रक्रिया सुरु झाली. एक एक मिनिट हा लाख मोलाचा होता आणि डॉक्टरांनी संपूर्ण शर्थीने एका एका मिनटाचे मुली जाणत आराध्याला वाचविले. डॉक्टर स्वाती गरेकर ह्यांनी मिडियासोबत बोलताना सांगितले कि आराध्याची तब्येत आता ठीक आहे २४ तासात तिच्यात अजून सुधारणा होतील.

आराध्याची ह्र्दय समस्या हि जन्मता होती. तिला प्रत्येक महिन्याला दवाखान्यात आणावे लागत असे. तिचे ह्र्दय मोठे होते आणि त्याची पंप करण्याची क्षमता कमी होती. त्यामुळे तिला Viral Myocarditis हा आजार जुळला होता.

याशिवाय एका दहा वर्षांच्या मुलालाही सोमनाथच्या किडनीने नवं आयुष्य मिळणार आहे. सोमनाथची किडनी आणि लिव्हर अहमदाबादच्या इंस्टिट्यूट ऑफ किडनी डीजीजेज अँड रिसर्च सेंटर इथे पाठवण्यात आलं आहे.

‘’सोमनाथच्या जन्मासाठी अनेक वर्ष नवस केले होते. अखेर गेल्या वर्षी आमचा नवस पूर्ण झाला आणि सोमनाथचा जन्म झाला. मात्र तो आम्हाला एवढ्या लवकर सोडून जाईल, असं कधीही वाटलं नव्हतं. आम्ही मुलगा तर गमावला. मात्र तो आराध्याच्या रुपाने अजूनही जिवंत आहे. सोमनाथच्या अंत्यसंस्कारानंतर आराध्याला भेटण्यासाठी मुंबईला जाऊ’’, असं सोमनाथच्या आई-वडिलांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.

चला आपणही अवयव दानाचा संकल्प करून अनेक जीव वाचवूया…
लवकरच हे दोनीही चिमुकले बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्राथना…. आणि सोमनाथच्या आई वडिलाच्या ह्या निर्णयास खासरे तर्फे सलाम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *