जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय ‘अंतराळ वीरांगना’

अणिमा पाटील साबळे यांनी भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला. आहे. त्या भारतातील तिसर्या अंतराळवीर होणार आहे. महाराष्ट्र तसेच भारताकरिता हा एक अभिमानाचा क्षण आहे. नासा मध्ये केपलर मिशन वर त्यांनी याअगोदर ३ वर्ष काम केले आहे.
या अगोदर भारतातून कल्पना चावला, सुनिता विल्यम्स नंतर भारतीय वंशाच्या अणिमा पाटील साबळे ह्या तिसऱ्या महिला अंतराळवीर आहे. आणि विशेष म्हणजे त्या जळगावच्या आहे.

अणिमा पाटील यांची HERA VII मिशन करिता कमांडर म्हणून निवड करण्यात आली आहे. चला बघूया त्यांचा प्रवास…
अंतराळ प्रवास करायची प्रेरणा कोठून मिळाली…
वयाच्या ७ व्या वर्षी त्यांची शाळा सेंट जोसेफ कॉन्वेंट, जळगाव येथे पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याच पुस्तक प्रदर्शनात त्यांना अपोलो मिशनची फोटो असलेले एक पुस्तक मिळाले. त्याच दिवशी मी मनाला ठरविले आयुष्यात मला काही करायचे असेल तर मी अंतराळवीरच होणार. मी निवडलेला प्रवास अत्यत खडतर होता परंतु मला तो पूर्ण करायचा होता अश्या त्या सांगतात. मी जेव्हा लोकांना सांगत मला अंतराळवीर व्हायचं आहे तेव्हा लोक हसत आणि माझी टिंगल टवाळी करत होते.

माझ्या करिता तेव्हा प्रेरणास्थान एकच होते राकेश शर्मा ते एकमेव भारतातील अंतराळवीर होते. मी पहिले लढाऊ विमान वैमानिक होईल आणि नतंर अंतराळवीर असे त्यांनी ठरविले. शाळेत त्या नेहमी पहिल्या नंबरवर असत. अभ्यासा सोबत अणिमा पाटील ह्या संगीत, नृत्य, भाषण इत्यादी गोष्टीत नेहमी सहभागी होत. लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याकरिता इंजिनिअरची किंवा भौतिकशास्त्राची पदवी आवश्यक होती. परंतु वडिलांनी सांगितले होते कि शिक्षण हे घरूनच पूर्ण करावे त्यामुळे इंजिनिअर होणे अशक्यच होते त्यामुळे मी भौतिकशास्त्रात पदवी घेण्याचे ठरविले. असेही मला भौतिकशास्त्र हा आवडीचा विषय होता. त्यांनी हि पदवी चांगल्या मार्कनि मिळवली परंतु जेव्हा अणिमा पाटील ह्या वैमानिकाचा अर्ज करण्या करिता गेल्या तेव्हा त्यांना कळले कि “फक्त पुरुष” येथे अर्ज करू शकतात. मनाशी निश्यच ठाम होता त्यांनी अर्ज केला. वैमानिक होण्या करिता दृष्टी अत्यंत उत्तम हवी असते त्यामुळे त्यांचा अर्ज खारीज करण्यात आला. ह्या घटनेमुळे त्या खचल्या “मला माझे सर्व संपल्या सारखे वाटले. काय कराव समजत नव्हते.”

“मला पुढे भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे नव्हते हे मीठरविले होते.” त्यानंतर त्याच्या वडलांनी त्यांना MCA (Master in Computer Applications) शिकण्याकरिता सांगितले. जळगाव येथे MCA कोर्सकरिता फक्त ३० जागा होत्या. घरात त्यांच्या लग्नाकरिता लगीनघाई उडाली होती. परंतु त्यांच्या आईने त्यांना या प्रसंगी साथ दिली आणि त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.

त्यांचे पती दिनेश हे कॉलेजमध्ये त्यांचे सिनियर होते. दोघाची मैत्री झाली आणि त्यानंतर लग्न झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनी मुंबई येथे काही दिवस नौकरी केली.
अडीच वर्षाच्या नौकरी नंतर त्यांना युएस मध्ये नौकरी करायची संधी मिळाली आणि मार्च २००० मध्ये दोघेही सैन होजे कॅलीफोर्निया येथे स्थायिक झाले. काही वर्षात त्यांनी NASA सेंटर येथे Columbia या अंतराळ यानाचे प्रक्षेपण बघितले आणि त्यांचा हा प्रवास परत सुरु झाला.

त्यानंतर त्यांनी परत मास्टर पदवी मिळविण्याचे ठरविले. Aerospace Engineering सैन जोसे विद्यापीठात त्यांनी पूर्ण केले. याकाळात त्यांना दुसरा मुलगा हि झाला. २०१० साली त्यांची हि पदवी पूर्ण झाली पूर्णवेळ आई आणि शिक्षण हे सांभाळून त्यांचा GPS 3.4/4 असा होता. दरम्यान या काळात त्यांनी अनेक वेळा NASA मध्ये अर्ज केला परंतु यश मिळत नव्हते.

२०१२ मध्ये ‘नासा’कडून बोलावणे आले आणि केपलर मिशनमध्ये सीनिअर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी चालून आली, तेव्हापासून आजपर्यंत बालपणीचे स्वप्न अगदी काही अंतरावर असल्याची जाणीव ठेवून मी आयुष्याची वाटचाल जोमाने सुरू ठेवली आहे.” अनिमा यांनी सांगितले. नासात काम करण्यासाठी अमेरिकी नागरीकत्वाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनिमा यांनी अमेरिकी नागरिकत्वही स्वीकारलं आहे.

‘नासा’मध्ये अनिमा आकाशगंगेतील सूर्यासारख्या ताऱ्यांभोवती त्यांच्या कक्षेत असलेल्या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेण्याच्या मिशनमध्ये कार्यरत आहे. केपलर ही आकाशात सोडलेली मोठी दुर्बीण आहे. आपल्यासारखी दुसरी पृथ्वी या आकाशगंगेत आहे का, याचाही नासा शोध घेत आहे. या दुर्बिणीतून आलेली छायाचित्रे अनिमाच्या सॉफ्टवेअरमधून तपासली जातात. त्याचा
अभ्यास शास्त्रज्ञ करतात.

पायलट होण्याचे मी आता प्रशिक्षण घेत आहे. जूनमध्ये ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये सिम्युलेटेड अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली आहे. येथे १४ दिवस चार सिम्युलेटेड अंतराळवीर अभ्यास करणार आहेत. त्यात माझा समावेश झाला आहे. अंतराळवीर होण्याची संधी ‘नासा’ने उपलब्ध केल्यास निश्चित त्या संधीचे सोने करेन. – अनिमा पाटील-साबळे, चीफ इंजिनीअर, नासा

हेरा मिशन :
हेरा म्हणजे ‘हुमण एक्स्प्लोरेशन रिसर्च अॅनालाॅग’. नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये एक आवास आहे, ज्यात निवड झालेल्या अनुरूप अंतराळवीराला काही दिवसांसाठी एका ‘सिम्युलेटेड ट्रेनिंग’साठी निवडले जाते. “जून २०१५ मध्ये माझी निवड इतर तीन लोकांबरोबर अंतराळ मोहिमेचा अंतिम टप्पा समजला जाणाऱ्या १४ दिवसांच्या मिशनसाठी झाली. या मिशनची कमांडर म्हणून मला निवडले गेले. यामध्ये एकजण फ्लाइट इंजीनियर होता. दुसरे दोघेजण मिशन विशेषज्ञ-१ आणि मिशन विशेषज्ञ-२ होते. आम्ही या मिशनच्या माध्यमातून अवकाशात असलेल्या वातावरणासारखे कृत्रिम वातावरण पृथ्वीवर तयार करून त्या वातावरणात कसे जुळवून घ्यावे याविषयीचे प्रशिक्षण घेतले.

सुमारे ८०० दिवसाचे असलेले हे मिशन १४ दिवसात संकुचित करण्यात आले. या चौदा दिवसांत आम्हाला एका आवासामध्ये मध्ये बंद करण्यात आले होते आणि लघुग्रहकडे उड्डाण करत असल्याचे अनुकरण आम्ही केले. या मोहिमेचे उद्दीष्ट म्हणजे मानव कैद आणि दीर्घकाळ अवकाशातील परिणामांना समजून घेणे आहे.” अनिमा सांगत होत्या.

जळगाव ते नासापर्यंतचा अनिमा यांचा हा प्रवास जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी असाच आहे. जळगाव खानदेशातल्या मातीतल्या या मराठमोळ्या कन्येच्या असामान्य कामगिरीला खासरे सलाम! त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा !

Source..
अणिमा पाटील यांचे फेसबुक पेज
Rocket Women

वाचा जळगाव कन्या ते महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *