कचरा उचलून उपजीविका करणारा बॉडी बिल्डर

मागे कोणीतरी बोलत होते की पहिलवान होण्यासाठी खुप वेळ द्यावा लागतो त्यामुळे कामधंदा करता येत नाही व सरकार आमच्या कड़े लक्ष्य देत नाही. परंतु तुम्हाला यश गाठायचे असेल तर ते तुम्ही नक्की गाठू शकता फक्त जिद्द आणि परिश्रम हवे. यवतमाळ येथील युवकाने हे शक्य करून दाखविले आहे.

राज्यात ‘महाराष्ट्र केसरी’ची चर्चा सुरू असतानाच, तिकडे यवतमाळच्या एका तरुणाने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत लौकिकास्पद यश मिळवलं आहे. दिनेश राजूरकर ने विदर्भ स्तरीय शरीर सौष्टव स्पर्धा जिंकली आणि अचानक त्याचे नाव सगळीकडे झळकू लागले. कोण आहे हा दिनेश राजूरकर चला बघुया खासरेवर

दिनेश राजूरकर हा युवक रोजंदारीवर घंटागाडीवर काम करतो त्याचे काम सकाळी संपूर्ण गावातील कचरा उचलणे आणि उपजीविका चालविणे.
दिग्रस (यवतमाळ) झालेल्या विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत 60 किलो वजनी गटात त्याने का किताब पटकाविला आहे.

दिनेशचे वय सध्या ३० वर्ष आहे लहानपणापासून त्याला बॉडी बिल्डींगचे वेड होते. दहावी शिकलेला दिनेश स्वतचे शरीर पिळदार बनविण्याकरिता तब्बल ८ वर्षापासून मेहनत घेतोय. विशेष बाब हि हे सर्व करताना त्याने स्वतःची उपजीविका चालविण्याकरिता कचरा उचलण्याचे नगर परिषद यवतमाळमध्ये काम करत आहे.

दिनेश हा यवतमाळ नगरपरिषदेत मागील सात वर्षापासून कंत्राटी स्वरुपात घंटागाडी चालक म्हणून काम करतो. त्याला याची प्रेरणा त्याच्या मोठ्या भावाकडून मिळाली. बॉडी बिल्डींग हा खर्चिक प्रकार मानला जातो परंतु दिनेशनी सर्व गोष्टीवर मात करत हा किताब पटकावला आहे.

ध्येय आणि अपार परिश्रमाने मागील आठ वर्षापासून त्याने सर्वस्व अर्पण केले आहे. शरीर पिळदार बनविण्यासाठी दिनेश रोज ५ तास घाम गाळतो. तगडा व्यायाम केल्यानंतर आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. मात्र त्याचा मेळ घालने दिनेशला अतिशय कठीण जात आहे.

कारण कंत्राटी नोकरीतून दिनेशला अवघे 4 हजार रुपये मिळतात. या पगारातून कुटुंब चालवण्यासोबतच स्वत:चा आहारही सांभाळणं शक्य नाही. तरीही एक ध्येय बाळगून दिनेश मेहनत घेत आहे. ‘महाराष्ट्र श्री’ आणि ‘भारत श्री’ हे मानाचे किताब पटकावण्याचं ध्येय दिनेशचं आहे. मात्र त्याच्यासमोर गरिबी आवासून उभी आहे.

यापूर्वी दिनेशला ‘बेस्ट मसल मॅन’, ‘यवतमाळ श्री’ हा किताब तब्बल 5 वेळा मिळाला आहे. आता त्याला यापेक्षाही मोठ्या ध्येयाचा टप्पा पार करायचा आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे त्याचा प्रवास खडतर झाला आहे . अशावेळी या स्वछतादूताला आता ‘महाराष्ट्र श्री’ खुणावत आहे. महाराष्ट्र शासनाने दिनेशसारख्या कठीण परिस्थितून आलेल्या युवकास काही मदत केल्यास त्याला हा टप्पा पार करणे अतिशय अवघड जाणार नाही हे नक्की…

दिनेश राजूरकरच्या मेहनतीस खासरे तर्फे सलाम

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *