फ्लॅट अथवा घर खरेदी करताना हि कागदपत्रे अवश्य तपासा…

स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि ते खऱ्या आयुष्यात उतरविण्या करिता त्याला काय त्रास किंवा किती घालमेळ करावी लागते याची तुम्हाला कल्पना असेलच. गावाकडे तर म्हण वापरतात घर म्हणते बांधून बघ आणि लग्न म्हणते करून बघ
आजकाल ह्या व्यवहारात अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. कायदेशीर घोळ होतात म्हणून हे टाळणे महत्वाचे आहे. त्यामुळे खरेदीचे व्यवहार करताना काही कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे. खासरे वर आम्ही तुम्हाला देतोय मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी घेण्याची काळजी..

संबंधित व्यक्तींची ओळख आणि अधिकार सिद्ध करणेमालमत्तेचा व्यवहार हा सक्षम व्यक्तींमध्ये व्हायला हवा, ज्यांना त्याविषयीचे करारपत्र करण्याचा (स्वामित्व हक्क, मुखत्यारपत्र, इत्यादीद्वारे) अधिकार आहे. ओळखपत्र आणि केवायसी पुरावे हे मालमत्तेचा ग्राहक आणि विक्रेता यांची ओळख सिद्ध करण्यासाठी मदत करतात.

परिपूर्ण आणि विक्रीयोग्य स्वामित्व हक्क मालमत्तेवर कुठल्याही प्रकारचा कब्जा (आर्थिक कायदेशीर जबाबदारी) नसणे महत्त्वाचे आहे. आपण अशा प्रकारचे प्रमाणपत्र ज्या कार्यालयात या मालमत्तेची नोंदणी केली आहे, त्या उपनिबंधकाच्या कार्यालयातून मिळवू शकता. या प्रमाणपत्रावर विशिष्ट कालावधीत झालेल्या या मालमत्तेच्या सर्व व्यवहारांची नोंद असते. एक विशिष्ट मसुद्यातील अर्ज भरून दिल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळू शकते. हा अर्ज उपनिबंधक कार्यालयात सादर करावा लागतो आणि त्यासोबत पुढील गोष्टी जोडाव्या लागतात.

अ. शिधापत्रिका किंवा निवासाचा अन्य कुठलाही पुरावा ब. मालमत्तेची जागा आणि सव्‍‌र्हे क्रमांक नमूद करावा. क. कालावधी, मालमत्तेचे संपूर्ण वर्णन, मापे आणि सीमारेषा नमूद कराव्यात. या संपूर्ण प्रक्रियेस १५ ते ३० दिवस वेळ लागतो.

योग्य त्या परवानग्या असणे घर खरेदी करताना ग्राहकाने पुढाकार घेऊन खालील परवानग्या आणि त्यांची कालमर्यादा तपासून घ्यावी, जेणेकरून मालमत्ता तांत्रिक आणि कायदेशीररीत्या विकत घेण्यायोग्य आहे याची खात्री करता येईल.

नुकसानभरपाई कलम मालमत्तेवरील कुठल्याही कायदेशीर वादापासून होणाऱ्या नुकसानापासून या कलमाद्वारे संरक्षण होते. या कलमामुळे मालमत्तेविषयी भविष्यात होणाऱ्या कुठल्याही कायदेशीर वादापासून ग्राहकाचे संरक्षण होते. या कलमानुसार, या कलामात नमूद केलेल्या कायदेशीर मुद्दय़ांमुळे जर ग्राहकाला तोटा झाला, तर विक्रेत्याला त्याची भरपाई करावी लागते.

पूर्वीच्या व्यवहारांची साखळी कागदपत्रे ग्राहकाने मालमत्तेचे पूर्वी झालेले सर्व व्यवहार दाखवणारी साखळी कागदपत्रे मूळ स्वरूपात मागितली पाहिजेत आणि विक्रेत्याने उपलब्ध करून दिली पाहिजेत.

कायदेशीर मान्यताप्राप्त साधने विक्रेत्याला ठरलेली किंमत ही कायद्याने मान्यताप्राप्त साधनाद्वारे अदा केली पाहिजे आणि तसे स्पष्टपणे खरेदीखतामध्ये नमूद केले पाहिजे. त्याच बरोबर ही रक्कम ग्राहकाने अदा केल्याची तारीख/ करण्याची तारीखसुद्धा नमूद केली पाहिजे.

खरेदीखताची नोंदणी करणे शेवटी खरेदीखताची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क (हे सक्षम शासकीय अधिकाऱ्यांद्वारे निश्चित केले जाते आणि प्रत्येक राज्यानुसार बदलते) भरून करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या खरेदीखताच्या तुलनेत, न्यायालयात नोंदणी केलेले खरेदीखतच ग्रा धरले जाते. तसेच, खरेदीखताची नोंदणी केल्यानंतर त्याची नोंद मालमत्ता ताबा प्रमाणपत्रावर होते.

मालमत्तेसंबंधित आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या बाबी..

महसूल खात्यातर्फे योग्य ती बिगर शेती परवानगी. इमारतीचा नकाशा नगर विकास / पालिका अधिकाऱ्यांनी मंजूर केलेला असणे.इमारतीचा बांधणी नकाशा रचना अभियंत्याने मंजूर केल्यानंतर नगर विकास / पालिका अधिकाऱ्यांकडे सादर करणे. नगर पर्यावरण पीडब्लूडी विमानतळ पुरातत्त्व संरक्षण राष्ट्रीय स्मारक भूजल रेल्वे आणि वन खात्याच्या अधिकााऱ्यांची मंजुरी. मालमत्तेचे बांधकाम सुरू असल्यास सक्षम अधिकाऱ्याकडून बांधकामाच्या विविध पातळ्यांसाठी मिळालेले कार्यारंभ प्रमाणपत्र. सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेले बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. सक्षम नागरी अधिकाऱ्यांकडून (पाणीपुरवठा वीजपुरवठा गॅस रास्ते वाहतूक मलनि:सारण आणि अग्निशमन) मिळणारे ना हरकत प्रमाणपत्र.सक्षम पालिका अधिकाऱ्यांकडून मिळणारे ताबा प्रमाणपत्र

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *