पान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदाचा “भाऊबली”

सध्या भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम हा चेहरा विनोदी मराठी दुनियेत सर्वोच्च ठिकाणी आहे. भाऊ यांनी आपल्या धमाल कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये भोळा विविध व्यक्तिरेखा साकारणार भाऊ कदम धमाल उडवुन टाकतो. भाऊ यांना खरी पहिली ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाने. मात्र ही लोकप्रियता, प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर भाऊ कदम आला आहे.

सद्या भाऊ कदमवर समाजातील काही ठेकेदारींनी बहिष्कार टाकला होता कारण त्याने गणपतिची घरी स्थापना केली. भाऊला वाळित टाकणारा समाजाचे ठेकेदार भाऊच्या संघर्षाच्या काळात कुठे होते? असो भाऊला त्याची अपेक्षाही नाही. परंतु भाऊच्या विरोधकांनी हा लेख नक्कीच वाचा…

भाऊ कदमचा जन्म मुंबईत एका कोकणी कुटुंबात झाला त्याचे संपूर्ण बालपन मुंबईतीस बिपीटी क्वार्टर मध्ये गेले.त्यांचे वडील बीपीटीत नोकरी होते.तर आई गृहिणी होती. भालचंद्रला प्रेमाने सर्व भाऊ म्हणत, वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. भाऊ जसा टिव्हीवर व्यक्तिरेखा साकारतोय तसाच लाजाळू व भोळा लहानपणापासून होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.बीपीटी क्वॉटर सोडावे लागले.वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले.

उदरनिर्वाहासाठी केले कारकुनीचे काम…

भाऊला अभिनयाची लहानपणापासून आवड होती, सहा महिन्यातून एखादे नाटक मिळत असे. यावर उपाय म्हणून भाऊने एक कोर्स केला. कुटुंबाचे पालणपोषण करण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात काही कार्यालयांत कारकुनीचे काम ते निवडणुकीच्या काळात मतदारांची नावे नोंदवणे, अशी कामे केली.

500 हून अधिक नाटकांमध्ये अभिनय…

भाऊचे गुरु विजय निकम यांच्या म्हणण्यावरुन त्यांच्या आईंनी त्यांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची परवानगी दिली. अनेक नाटकांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला. ‘कोब्रा 37’ या नावाने कॉलेज आयुष्यात ग्रुप होता. या ग्रुपमध्ये कमलाकर सातपुते आणि किशोर चौघुले हे प्रसिद्ध अभिनेते सहभागी होते. विजय निकम यांच्या ‘एवढाच ना’ या नाटकाद्वारे त्यांना पहिला कमर्शिअल ब्रेक मिळाला होता. या शॉर्ट टर्म मेमरी लॉस असलेल्या व्यक्तीची भूमिका त्याने या नाटकात वठवली होती.

पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ 500 नाटकांमध्ये अभिनय केला. परंतु नाटकात पाहीजे तसे काम मिळत नव्हते व घर चालनेही कठिण होते म्हणून त्याने हे थांबविण्याचा सुध्दा निश्चय केला होतो. परंतु अचानक विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. याच नाटाकतुन भाऊच्या आयष्याला वळण मिळाले व त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘एक डाव भूताचा’, ‘बाजीराव मस्त’ मी या नाटकांमधील त्यांच्या भुमिकेने त्याला प्रसिद्धी व स्तुति मोठ्याप्रमाणात दिली. ‘रानभूल’ हे नाटक रंगभूमीवर सुरु आहे.

दोनदा नाकारली ‘फू बाई फू’ची ऑफर

भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील ब-याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव ‘फू बाई फू’साठी सुचवले. फु बाई फु या विनोदी मालिकेत त्याने ऑफर दोनदा नाकारली होती. त्याला वाटायचे आपला स्वभाव लाजाळू आहे त्यामुळे हे जमणार नाही. मात्र तिस-यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे तो विजेता होता.

भाऊ यांनी केला प्रेमविवाह, तीन मुलींचे आहे पप्पा…

भाऊने प्रेमविवाह केला आहे त्याचा पत्निचे नाव ममता आहे. या दाम्पत्याना तिन मुली आहे. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी ही त्यांच्या मुलींची नावे आहेत.

परदेशवारीसाठी बायकोची अंगठी ठेवली गहाण…

महेश मांजरेकर यांनी पहिल्या मिक्ता अवॉर्ड सोहळ्यासाठी भाऊ यांना आमंत्रित केले होते. दुबईत हा सोहळा रंगणार होता. विशेष म्हणजे तोपर्यंत भाऊ यांच्याकडे पासपोर्ट नव्हते. शिवाय तिकडे जाण्यासाठी हाती काहीच पैसा नव्हता. तिकिट, खाणेपिणे आयोजकांकडे असणार, हे त्यांना ठाऊक होते. मात्र समजा तिकडे पैशांची गरज पडली तर काय करणार, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांची अंगठी गहाण ठेवायला दिली. बायकोची अंगठी गहाण ठेवलेल्या पैशातून भाऊ यांनी आपली पहिली परदेशवारी केली होती.

भाऊ यांचे सिनेमे…

हिंदीत फेरारी की सवारी याशिवाय मराठी‘टाइमपास’, ‘टाइमपास 2’, ‘सांगतो ऎका’, ‘मिस मॅच’, ‘व्हाया बिहार’, ‘नारबाची वाडी’, ‘कोकणस्थ’, ‘चांदी’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘बाळकडू’ या सिनेमांमध्ये भाऊने अभिनय केला

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *