ख-या प्रेमास भेटण्याकरीता त्याने केला ८ देशाचा सायकलने प्रवास…

गरीब मुलगा व श्रिमंत मुलगी भेटतात. दोघांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. मुलगी तिच्या देशात परत गेली. मुलाने तिला भेटायची हमी दिली. वेळ निघुन जातो व दोघांना परत एकत्र येण्याकरीता तो संघर्ष करतो. त्याचे स्वप्न पुर्ण करायला तो सायकल घेतो व ८ देशाचा प्रवास करत त्याच्या आयुष्यातील ख-या प्रेमास भेटायला जातो.

कुठल्या आगामी हिंदी चित्रपटाची हि कथा नाही आहे. असा व्यक्ती आजही जिवंत आहे जो प्रेमाकरीता काहीही करु शकतो. हि कथा आहे भारतातील डॉ. प्रद्युमन कुमार महानंदिया व स्वीडन मधील शॉरलेट वॉन स्केडविन (Charllette Von Schedvin) चित्रपटाप्रमाणे रंजक अशी दोघांची प्रेम कथा हि प्रेम, भावना व नाट्यमय स्वरुपाची आहे.

प्रेमाची अद्वैतिय कहाणी, प्रेमाला कुठलिही सिमारेषा अडवु शकत नाही हे pk ( प्रद्युमन कुमार) याने सिध्द केले आहे.

१९४९ साली ओडीसा येथील दलित विनकर कुटूंबात त्याचा जन्म झाला. Pk जन्मत: देणगी मिळालेला कलाकार होता. परंतु कुटूंबास त्याचे शिक्षण पूर्ण करायला पैसा नव्हता. जातीमुळेही आयुष्यात ठिकठिकाणी त्याला अपमान सहन करावा लागला. १९७१ साली सर्व कठीण प्रसंगावर मात करत दिल्ली येथील कला महाविद्यालयात प्रवेश मिळविला आणी त्याच्या व्यक्तिचित्रास सगळीकडे प्रसिद्धी मिळु लागली.

१९७५ साली १९ वर्षाची शॉरलेट हि लंडन येथे शिक्षण घेत असताना भारतात फिरण्याकरीता आली. १० मिनटात आपले हुबेहुब चित्र बनवुन घ्या. तिला हे अशक्य वाटले आणी तिने स्वतःचे चित्रे काढण्याचे ठरवीले. ईथे तिने स्वत:ची काही चित्रे बनवुन घेतली. Pk चि अद्भुत कला पाहुन ति थक्क झाली होती. तारे जुळणे हे नशीबात लिहुन होते. या काळात दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले.

शॅरलेटनी स्वतःचे भारतीय नाव चारुलता ठेवले आणि दोघांनीही भारतीय पध्दतिने लग्न केले.
जेव्हा तिला परत जायची वेळ आली तिने pk ला सोबत चलायची विनंती केली, तेव्हा pk विद्यार्थी होता त्याला शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यानंतर तिने त्याला तिला भेटायला येण्याकरीता विमानाची तिकीट देऊ केले परंतु त्याने ति नाकारली व स्वत:च्या बळावर तुला भेटायला येईल हे त्याने सांगितले. यानंतर दोघाचा संपर्क फक्त पत्राद्वारे होता.

तिला दिलेले परत भेटायचे वचन pk ला स्वस्थ बसु देत नव्हते. परंतु वस्तुस्थिती ही होती कि pk कडे तिला भेटायल
जाण्यापुरते पैसे नव्हते. स्वप्न पुर्ण करण्याकरीता त्याने कोणिही कल्पना करणार नाही असा संकल्प केला व जवळील थोड्या बहुत वस्तु विकुन एक जुनी सायकल विकत घेतली. सायकल, ब्रश, रंग व तो असा त्याचा प्रेम परत मिळविण्याचा प्रवास १९७८ साली सुरू झाला.

अमृतसरला तो दिल्लीवरुन पोहचला यामार्गे तो अफगाणिस्तान, इराण, टर्की, बल्जेरीया, युगोस्लोविया, जर्मनी, ऑस्ट्रीया व डेन्मार्क असा त्याचा मार्ग होता. अनेक वेळ सायकलमध्ये बिघाड झाला, काही वेळेस त्याला उपाशीपोटी प्रवास करायचे काम पडले परंतु त्याची इच्छाशक्ती कमि पडली नाही. रोज ७७ किमीचा प्रवास तो करत असे.

४ महिने ३ दिवसाचा थक्क करणारा प्रवास करत तो गटेनबर्ग, स्विडनला सायकल चालवत पोहचला. त्याकाळात ब-याच देशात फिरायला Visa लागत नव्हता.

पोहचल्यानंतर, स्विडीश अधिकारीही थक्क झाले की एक भारतीय सायकल चालवत स्विडनला आला. त्यामागचे कारण त्यानी pk ला विचारले. तर त्याने सांगितले की प्रेयसीला भेटायचे आहे. त्यानी शॉरलेटची फोटो व पत्ता त्याना दिला.

आणि एक थक्क करणारा खुलासा pk ला माहिती झाला की शॉरलेटही स्विडनच्या राजघराण्यातील राजकुमारी आहे. त्याला काळजी वाटायला लागली की राजकुमारी या देशात आपला स्विकार करणार का नाही?
अधिकारीसुध्दा गोत्यात पडले की, युरोपची राजकुमारी व गरीब भारतीय मुलगा या दोघांचे लग्न झाले.

शॉरलेटला हे कळले की कुठलातरी भारतीय तिला भेटायल
सायकलने पाच महिने प्रवास करत आलेला आहे. तिने सरळ गटेनबर्ग गाठले व pk चा स्विकार केला. तिच्या आई वडीलानेही प्रद्युमनचे आनंदाने स्वागत केले. तिच्या संपुर्ण राजघराण्यात प्रद्युमन हा पहिला व्यक्ती आहे जो राजघराण्यातील नसुन जवाई झाला.

लग्नाच्या ४० वर्षानंतर डॉ. प्रद्युमन महानंदिया, पत्नी शॉरलेट व दोन मुले स्विडनमध्ये राहतात. डॉ. प्रद्युमन महानंदिया सद्या भारत सरकारचे ओडियाचे राजदूत म्हणून काम पाहतात. त्याचा गावात तो दलित असल्यामुळे त्याला दुर ठेवायचे तेच लोक त्याचा मोठा कार्यक्रम सत्कार प्रत्येक वेळेस करतात. आजही त्याने ति सायकल आपल्या घरात सजवुन ठेवलेली आहे.

Utkal University of Culture, भुवनेश्वर तर्फे त्याला डॉक्टरेट देण्यात आली. लवकरच संजय लिला भंसाळी हे प्रसिध्द हिंदी सिनेमा दिग्दर्शक त्याच्या आयुष्यावर चित्रपट काढणार आहेत.

प्रेम असेल तर कुठलेही गोष्ट अशक्य नाही! हे नक्कीच खरे आहे.

खासरेतर्फे चारुलता व प्रद्युमनच्या प्रेमास सलाम….

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *