आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचा पोशिंदा, श्यासमसुंदर कनकेंच्या ज्ञानदानाच्या कार्याला सलाम

दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केलं आहे. घरातील आधार गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागते. या मुलाच्या भविष्याचा विचार करणारा त्यांची काळजी करणारा एक शिक्षक आहे. मुलाना एकत्र करुन त्यांच्या शिक्षणासाठी श्यासमसुंदर कनके नावाचा शिक्षक अहोरात्र चिमुकल्यांचा पंखांना बळ मिळावं, यासाठी झगडत आहे.

सध्या सोशल मिडीयावर गाजत असलेले गाणे तुम्ही एकलेच असेल त्यात लहान मुले विनंती करतात कि ‘आमच्या रुपात देवाला बघा ना बाबा..जहर पिऊ नका..’असं म्हणत मुलं शेतकऱ्याला आत्महत्या न करण्याचं आवाहन करत आहे. बापच गेल्याने काय यातना होतात याचा अनुभव ही मुलं रोजच्या जीवनात घेत आहे. तुम्ही सुध्दा हे अनुभव बघितले आहे.

सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील बळीराजा आपली जीवनयात्रा संपवतोय आणि कुटुंबाला असा पोरका करुन जात आहे.याच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याकरिता श्यामसुंदर ह्या मुलांना बळ देत आहे. अनाथ मुलांची मोट बांधून त्यांना शिक्षण देऊन उभं करण्याचं काम करत आहे एक गुरुजी आणि त्यांचं नाव आहे श्यामसुंदर कनके. एका गरीब कुंटुबात जन्माला आलेल्या कनके यांचं शिक्षण अपुरं राहिले. आपण ज्या हाल अपेष्टा शन केल्या ते या मुलांचे होऊ नये, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी मग या मुलांना एकत्र करुन शिक्षण देण्याचं ठरवलं. त्यांचा हा निर्णय क्रांतिकारक होता. आणि त्यांनी त्याचे स्वप्न साकार सुध्दा करून दाखविले आहे.

श्यामसुंदर कनके यांची श्री साई ग्रामीण पुनर्रचना संस्थे मार्फत डॉ. हेडगेवार पब्लिक स्कूल ते चालवतात. विनाअनुदानित असलेल्या या शाळेत त्यांनी या मुलांना प्रवेश देऊन मोफत शिक्षण, निवास, जेवण, सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची मोफत व्यवस्था केली. ज्ञानदानाचं हे काम त्यांनी 15-20 मुलांपुरता मर्यादित ठेवलं नाही, तर मराठवाडा आणि विदर्भात आत्महत्या केलेल्या तब्बल 2200 कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यासाठी पत्र पाठवली.

कुटुंब प्रमुखाच्या आत्महत्येनंतर होणारे कुटुंबाचे हाल त्यांनी या प्रयत्नातून मायेची फुंकर देण्याचे काम केले आहे. ज्ञानदानाचं हे पवित्र काम या कळ्यांना फुलण्याची उभारी ते देत आहे. तुम्ही त्यांची माहिती त्यांची वेबसाईट आपली मुले यावर सुद्धा बघू शकता.

कनकेंनीही आपली सगळी संपत्ती या मुलांच्या शिक्षणाकरिता लावलेली आहे. 200 मुलांना शिक्षण द्यायचे काम सध्या ते करतात. कणकेप्रमाणे सध्याच्या महाराष्ट्रास अनेक युवकांची गरज आहे. ह्या संकटावर मात करण्याकरिता. नाना पाटेकरनि सुध्दा त्यांच्या कार्याची स्तुती केली आहे.

खासरे तर्फे त्यांच्या कार्यांना सलाम…

Source DNA India

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *