भारतातील असे १० शिक्षक ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाळा घडवली.

मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचं मोठं महत्त्व आहे. हे महत्त्व मुलांना समजावं यासाठी दोघांची भूमिका प्रमुख असते. एक मुलांचे आई-वडिल जे त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देतात आणि दुसरे शिक्षक. जे मुलांमध्ये अभ्यासाबाबत गोडी निर्माण करतात. या दोन्हीपैकी एकानंही सूट दिली तर त्याचा परिणाम हा मुलांवर होतो. मुलांचं भविष्य कमकुवत होऊ शकतं. मुलांना प्रेरणा देणाऱ्या काही शिक्षकाचा हा थक्क करणारा प्रवास आहे.

बाबर अली

सध्या त्याचे वय २१ वर्ष आहे त्याने शिक्षकी पेश्याची सुरवात वयाच्या ९ व्या वर्षी केली. वयाच्या १५ व्या वर्षी तो शाळेचा मुख्याध्यापक झाला तेव्हा ३०० विद्यार्थी आणि ६ शिक्षक त्याच्या शाळेवर कार्यरत होती. त्याच्या मते जर तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर पैसा,वय,सुविधा ह्या गोष्टी दुय्यम आहे.

आदित्य कुमार जिथे कोणीही पोहचत नाही तिथे तो शिक्षण गंगा घेऊन जातो.

आदित्य कुमारला लोक सायकल गुरुजी म्हणून ओळखतात. रोज ६० ते ६५ किमी अंतर तो सायकल वर फिरतो. आणि लखनो भागातील झोपडपट्टी मधील मुलांना मोफत शिक्षण द्यायचे काम तो अविरत १९९५ पासून करत आहे.

अरविंद गुप्ता आनंददायी शिक्षण देणारा शिक्षक

टाकाऊ वस्तू पासून खेळणे बनविण्याकरिता अरविंद गुप्ता प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यत वेगवेगळे शैक्षणिक साहित्य टाकाऊ वस्तूपासून बनविले आहे. त्याचे हे विडीओ तुम्ही youtube वरही बघू शकता. प्रत्येक घटनेमागील वैज्ञानिक कारण काय आहे हे तो या कृतीतून दाखवितो.

राजेश कुमार शर्मा शिक्षण देण्याकरिता इमारतीची गरज नाही हे सांगणारा शिक्षक

राजेश कुमारची शाळा दिल्ली येथील उडान पुला खाली भरते. झोपडपट्टीतील मुलांना येथे तो शिक्षण देतो. पुला खालील शाळा म्हणून लोक त्या शाळेस ओळखतात जवळपास २०० विद्यार्थी येथे शिकतात. २००५ पासून त्याचे हे काम अविरत सुरु आहे.

अब्दुल मलिक रोज शाळेत पोहत जाणारा शिक्षक…

केरळमधल्या मल्लापूरममधल्या पडिजट्टुमारी अब्दुल मलिक. ४२ वर्षांचे मलिक हे येथील मुस्लिम निम्न प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते शाळेत पोहत जातात. त्यांच्या शाळेत रस्त्यानंही जाता येतं. पण तो मार्ग आहे २४ किलोमीटर. या २४ किलोमीटर लांब खराब रस्त्यावरुन शाळेत जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात अब्दुल घरातून शाळेत आणि शाळेतून परत घरी पोहत परतही येतात. या सर्व दगदगीमध्ये त्यांनी आजवर शाळेतून एकदाही रजा घेतलेली नाही. हे विशेष.

प्राध्यापक संदीप देसाई भिक मागून विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक

मुंबई मधील लोकल ट्रेन मध्ये हा रोज लोकांना भिक मागतो. कारण फक्त एक त्याच्या श्लोक या संस्थेमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे.

रोशनी मुखर्जी इंटरनेट च्या माध्यमातून शिक्षण

ExamFear.com या वेबसाईट वर ती विडीओ अपलोड करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देते. नाही का हा इंटरनेटचा प्रभावी वापर.

विमल कौर वय हा केवळ एक अंक आहे.

८० वर्षीय हि शिक्षिका आजही दिल्ली येथी मदनपुर खदर येथील विद्यार्थ्यांना शिक्षण देते. तिचे हे काम मागील २० वर्षापासून सुरु आहे. गावतील शिक्षक नसल्यामुळे तिने हा निर्णय घेतला. सरिता विहार जवळील विद्यार्थी घेऊन तिने हे कार्य सुरु केले. तिला शिकवायला कुठलीही इमारत नाही तरी तिचे हे कार्य सुरु आहे.

कमलेश झापडीया शिक्षण हि एक बहुमुल्य देणगी आहे.

कमलेश रोज २० किमीचा प्रवास करत त्याच्या विद्यार्थ्या पर्यंत पोहचतो त्याने Edusafar नावाची वेबसाईट सुरु केलेली आहे. कोडे तयार करून तो विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच्या वेबसाईट वर वर्ग १ ते १० पर्यंत विषयाचे सर्व कोडे मिळतील. कोण बनेगा करोडपती प्रमाणे हा खेळ असतो.

शेवटचा शिक्षक हा थोडा वेगळा आहे कारण इथे विद्यार्थीच शिक्षक आहे. आणि सोबतच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात. लदाख भागात हि शाळा चालते.

खासरे तर्फे ह्या सर्व शिक्षकांना सलाम
वाचा जिल्हा परिषद शाळेतील समशानात सोने घडविणारा शिक्षक

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *