रोजंदारीवर चार रुपये कमाविण्यापासून ते बावीस हॉटेलांचे मालक…

कोणत्याही व्यवसायाची सुरवात हि छोट्यातून होते आज सुखसागर च्या २२ शाखा आहेत परंतु या मागे आहे संघर्ष अत्यंत कठीण संघर्ष…
चला बघूया खासरे वर हा माणूस शून्यातून मोठा कसा झाला ?

सुरेश पुजारी, वय वर्ष ७६
एक दहा वर्षाचा मुलगा कर्नाटकाच्या उडपी जिल्ह्यातील पादुकोण नावाच्या छोट्याश्या गावातून मुंबईत आला. हा छोट्या गावाकडे जगलेला मुलगा खूप मोठी स्वप्ने घेऊन या मायानगरी मध्ये आला होता. १९५० मधील हि घटना आहे. त्याने दक्षिण मुंबई मध्ये एका मंदिराजवळच्या छोट्या हॉटेलमध्ये काम करणे सुरु केले. काही दिवसाने त्याला मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम मिळाले सहा रुपयाची हि नौकरी होती परंतु त्याच्या करिता याचे मोल अमुल्य होते.

त्यानंतर होणार्या पैश्याच्या बचतीतून त्याने चौपाटीवर स्वतःचा हातागाडा सुरु केला रस,पाव भाजी इत्यादी तो विकू लागला यामध्ये त्याला नातेवाईकानेहि मदत केली होती. धंदा वाढत गेला मुंबई सोबत सुरेशचीहि प्रगती होत होती त्याने यावर समाधान न मानता मुंबईत इलेक्ट्रॉनिकचे हब म्हणून ओळखले जाणारे लँमिंगटन रोडवर दुसरे असे उपहारगृह सुरू केले.
लोकांना इथे आल्यावर आरामदायक वाटावे म्हणून त्याने या हॉटेलचे नाव सुखसागर असे ठेवले. इडली,भात इत्यादी वस्तू लोक इथे रोज खातात आणि याचा व्याप दिवसा दिवस वाढत चालला आहे. मेहनत व संघर्षाच्या जोरावर त्याने २२ शाखा उघडल्या आहे.त्यापैकी८ मुंबईत आहेत, ७ बंगळुरूमध्ये आहेत, आणि प्रत्येकी एक म्हैसुरू, चेन्नई, आणि सौदी अरेबिया मध्ये तर प्रत्येकी दोन दुबई आणि कतारमध्ये आहेत. भविष्यात अजून याचा विस्तार करायचा या दिशेने सुरेश पाउले टाकत आहे. हा एक यशस्वी उद्योग समूह आहे.

या सुखसागर हॉटेल मध्ये अनेक दिग्गज हजेरी लावत असतात कारण इथली चव त्यांना वापस आणतेच अमिताभ बच्चन, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नडिज, त्यानंतर सुरेश भट इत्यादी इथे नित्यनेमाने येतात. एखाद्या पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल असे चवीच्या बाबतीत हे हॉटेल आहे.

सुखसागर फक्त कमाईच नाहीतर सामाजिक जाणीव सुध्दा जपून आहे अनेक बेवारस अनाथ मुलांच्या शिक्षण व अन्न पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडविला आहे. हजार लोकांना रोजगार मिळाला आहे, बावीस उपहारगृहातून, शॉपिंग मॉलमधून आणि आईसक्रीम फँक्टरीमधून तसेच बंगळूरूमध्ये असलेल्या तीन तारांकीत उपहारगृहातून.

१९७६मध्ये त्यांनी संतोषी यांच्याशी विवाह केला. आता त्यांची तीन मुले देशभरातील कारभार पाहतात आणि सुखसागर आंतरराष्ट्रीय पक्रमामध्ये लक्ष घालतात. यश मिळाल्यानतरही सुरेश आजही जमीनीवर आहेत, त्यांच्या जन्मगावी पादुकोणला जातात तेथील मुलांच्या शिक्षणाला मदत करतात. त्यांनी मोफत समाजभवन देखील सुरु केले आहे. त्यांच्या कर्मचा-यांची औषधोपचारांची देयके ते देतात, शिवाय त्यांना भरपगारी सुट्या सुध्दा दिल्या जातात.
स्वतःचे व्यवसाय सुरु करण्याकरिता कर्मचार्यांना प्रोत्साहन देणारा एकता मालक सुरेश असेल अनेक कर्मचार्यांना त्यांनी मदत केली आहे. निस्वार्थी उद्योजक म्हणून सुरेश म्हणजे दया आणि साधेपणाचे प्रतिक बनले आहेत. त्यामुळे अनेकांना ते प्रेरणादायक ठरले आहेत.

त्यांना खासरे तर्फे सलाम
हा लेख आवडल्यास शेअर करा एखाद्या हिमंत हारलेल्या युवकास प्रेरणा मिळू शकेल.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *