आज मुंबई ला नाही वाचवले तर पुढे मुंबई याच शहराप्रमाणे नामशेष होईल…

जुन्या काळातील आर्थिक राजधानी लोथल

सिंधु संस्कृतीच्या उत्खनन स्थळांचा विचार करत असताना आपल्याला गुजरातमधील लोथल या सिंधु नगरीच्या स्थळाच्या उत्खनन शोध अत्यंत महत्वाचा समजला जातो. अहमदाबादपासून ८० किमी दक्षिणेस आणि भोगवो नदीपासून ३ किमी अंतरावर लोथल आहे.

लोथल येथील नागरी सिंधु संस्कृतीचा शोध १९५४ साली लागला आणि १९५५ ते १९६० या कालावधील या स्थळाचे उत्खनन झालेले आहे. उत्खननातून हे स्पष्ट झाले की चन्हुदारो या स्थळाप्रमाणेच लोथल हे उद्योगाचे आणि औद्योगिकरणाचे शहर होते.लोथल या सिंधु स्थळाची रचना ही साधारणपणे मोहेंजोदारो आणि हडप्पा या शहराप्रमाणेच अतिशय सुबद्ध होती. काटकोनी रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, गटारी, विहिरी, कच्चा आणि पक्या मातीची घरे, दफन करण्याची जागा या ठिकाणी उत्खनननीत झाले आहे.

शहराला तटबंदी असून बालेकिल्ला देखील उत्खननात आढ़ळला आहे. भात आणि कापूस या शेतीचे पुरावे देखील या ठिकाणी मिळाले असून उद्योगाबरोबर येथे शेती देखील होत होती हे स्पष्ट होते..

लोथल हे बंदरही होते आणि तेथून तयार होणारा माल निर्यात होत असे. लोथल या ठिकाणी शंखाच्या वस्तू, हस्तीदंताच्या वस्तू याशिवाय अनेक माणिकमोती, हिरे देखील तयार होत असावेत याचा पुरावा आढ़ळला आहे. एका ठिकाणी रांजणात ६०० तयार मणी आढळले असून ते निर्यातीसाठी असावेत.

एक भट्टी देखील उत्खननीत झालेली आहे. याशिवाय कच्चा माल आणि तयार माल साठवण्यासाठी गोदाम देखील आढ़ळलेले असून कोठारे देखील उत्खननीत झाली आहेत. गोमेद या मण्याचे काही अवशेष देखील सापडले असून लोथल हे मणी बनवण्याचे सर्वात मोठे केंद्र होते हे सिद्ध होते.लोथल येथे याशिवाय खापराच्या मुद्रा, वजने, मातीची भांडी, विटा, ब्रॉन्झची काही शस्त्र, सुरीचे पाते आणि काही खेळणी तसेच मूर्ती, मासेमारी करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या हुका देखील उपलब्ध झालेल्या आहेत..

लोथल येथील उत्खननाचा महत्वाचा विशेष भाग म्हणजे विटांनी बांधलेला २१८ मीटर लांब आणि ३७ मीटर रुंद भोगवो नदीपासून लोथलपर्यंत आणलेल्या जलमार्गावर उपलब्ध झालेली गोदी अर्थात dockyard जेथे जहाजे तयार आणि दुरूस्त केली जात असत. सिंधु संस्कृतीमधील लोक जलमार्गाने होड़ी आणि नावांमार्फत परदेशात व्यापार करत होते याचा उल्लेख ऋग्वेदात आहेच पण लोथल येथे परशियाच्या आखातातील बेटावरील मुद्रा सापडल्या आहेत तसेच सुमेर येथे देखील सिंधु मुद्रा सापडलेल्या आहेत.

यावरून लोथल येथून समूद्रामार्गे व्यापार होत होता हे स्पष्ट आहे. लोथल येथील उत्खननित झालेली गोदी अतिप्राचीन आणि हे बंदर देखील अतिप्राचीन आहे असे काही संशोधकांचे मत आहे. ५००० वर्षापूर्वी सिंधुसंस्कृतीमधील लोकांची नौकानयानाची कला ही dockyard ( गोदी ) बांधण्याइतकी प्रगत होती ही बाब आपल्यासाठी खूप महत्वाची असून आपली संस्कृती ही किती उन्नत होती याचा हा पुरावा आहे.

प्राचीनकाळी समूद्रामार्गे व्यापार करणे हे आपली संस्कृती कृषक संस्कृतीबरोबर व्यापारी संस्कृती आणि औद्योगिकरणाच्या अतियुच्च बिंदुवर होती ही गोष्ट सामान्य नसून आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे..

●फोटो लोथल नगर रचना प्रतिकृती ● गोदी ( Dockyard) ●मणी साठवण्यासाठी तयार केलेले रांजण, घरांची नागरी रचना ●सांडपाण्याची व्यवस्था ●सार्वजनिक विहीर ●व्यापारी माल साठवण्याचे गोदाम ●समुद्र व्यापार दर्शवणाऱ्या मुद्रा ●उत्खननात सापडलेली भांडी

● संदर्भ ●lothal harappan port town – S.R.Rao ●Harppan seals – John huntigton ●Harappan and their Mesopotamin contact – V.N.Prabhakar ●सिंधु संस्कृती, ऋग्वेद, हिंदू संस्कृती- प्र.रा. देशमुख ●भारताची कुळकथा – डॉ. ढवळीकर

राज जाधव

शेअर करा व मुंबईकरांना कळू द्या एक आपली आर्थिक राजधानी गेली हि सुध्दा धोक्यात आहे….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *