वेळ कधी, कुठ कशी फिरेल सांगता येत नाही.

सातारा जिल्ह्यातील सत्यकथा

एकदा हि कथा वाचा व विडीओ बघाच..आणि जास्तीत जास्त शेअर करा..

अप्रतिम हजारो वेळा अप्रतिम अप्रतिम म्हटलं तरी कमीच आहे शब्द नाहीत अक्षरश:आदेश बाँधेकर सुद्धा अश्रू आवरु शकले नाहीत.
वेळ कधी, कुठ कशी फिरेल सांगता येत नाही.

भातुकलीच्या खेळामधली छकुली बारा वर्षापूर्वी हरवली; मात्र ताईच्या लग्न मंडपात आज अकस्मात प्रकटली. गेलं एक तप मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या या छकुलीला रक्ताची नाती गवसली. हे अनोखं दृश्य पाहताना बोहल्यावर अक्षतांऐवजी आनंदाश्रूंचा सडा पडला. होय.. लग्नासाठी जमलेला अवघा गाव हमसून हमसून रडला.

हिचं नाव प्रियांका.
वय वर्षे एकवीस. बारा वर्षापूर्वी तिच्या आईनं स्वतर्‍ला जाळून घेऊन आत्महत्या केलेली तर वडील चोवीस
तास नशेत चूर. त्यावेळी प्रियांकाची छोटी बहीण दोन-अडीच वर्षाची तर सर्वात धाकटा भाऊ अवघ्या सहा महिन्यांचा. लोकांची खरकटी भांडी घासून प्रियांका दोन लहानग्या भावंडांना घासभरवू लागली.

वयाच्या नवव्या वर्षी तिला आलेलं ‘अकाली आईपण’ पाहून तिचे आजोबा हेलावले. त्यांनी भाडळे येथील विजय तारळकर यांच्या घरात प्रियांकाला दत्तक म्हणून सोपविलं.
इतर दोघांनाही बाहेरगावी पाठवलं; पण त्याचा थांगपत्ता काही मरेर्पयत लागू दिला नाही.

प्रियांका भाडळेमध्ये मोठय़ा कोडकौतुकानं मोठी झाली. तारळकर घराण्यानं सारी सुखं तिच्या ओंजळीत ओतली; पण आपली दोन छोटीशी भावंड कुठं गेली, या वेदनेपायी ही मुलगी आजर्पयत मनातल्या मनात कुढत राहिली.

गेल्या आठवडय़ात ‘होममिनिस्टर’ कार्यक्रमात तिनं भाग घेतला होता. त्यावेळी सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्याशी बोलताना तिनं आपल्या बहिणीच्या ताटातुटीची कहाणी सांगितली होती. हा कार्यक्रम सोमवारी टीव्हीवर प्रक्षेपित झाला. मंगळवारी सिंधुताई सपकाळ यांचा फोन बांदेकर यांना आला. माईंनी सांगितलं, ‘त्या प्रियांकाची हरवलेली लहान बहीण सध्या सासवडच्या ममता बालसदनमध्ये शिकतेय. तिच्या आजोबांनी बारा वर्षापूर्वी आमच्या अनाथाश्रमात तिला आणून सोडलं होतं. तिचंही नाव आम्ही प्रियाच ठेवलंय.’

मग काय, क्षणाधार्थ सूत्रं फिरली. बांदेकरांनी त्या छोटय़ाशा प्रियाला घेऊन आज बुधवारी कोरेगाव तालुक्यातलं भाडळे गाव गाठलं.
योगायोग म्हणजे आजच प्रियांकाचं लग्न होतं. सारा गाव मंडपात जमला होता. ‘लग्नाची भेट’ म्हणून आदेश बांदेकरांनी एक फाईल नवरीच्या हातात दिली.
फाईल उघडून त पाहते तर काय.. तिच्या हरवलेल्या बहिणीचा लहानपणीचा फोटो. डोळ्यांतून टपटप पाणी. ‘हीच माझी बहीण, कुठाय ती? तिचा थरथरता प्रश्न.
तेवढय़ात गाडीतून उतरून ती छकुली मंडपात धावली. थेट ताईच्या गळ्यात पडली.सुरुवातीला अवघा मंडप अवाक् झाला. नंतर चैतन्यानं भारून गेला; कारण ही घटनाच तशी अकल्पित होती. पंचक्रोशीसाठी ‘न भुतो न भविष्यती’ होती.

एक व्हिडिओ पाठवला आहे त्याची कहानी वर दिली आहे.नक्की बघा डाऊनलोड व्ह्यायला वेळ लागला तरी डेलिट करू नका बघाच.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *