तारुण्य टिकवायला काही सोपे घरगुती उपाय नक्की वापरा..

कशे राहणार तरुण ?

प्रत्येकाला वाटते कि त्याने आयुष्यभर तरुणच राहावे, परंतु ते राहण्याचे प्रयत्न फार कमी लोक करतात. प्रत्येकाचे स्वप्न आहे कि तरूण रहावे परंतु हे स्वप्न पूर्ण करायला काही आयुर्वेदिक उपाय रोज वापरावे लागतील . अनेक ऋषी मुनींनी याबाबत लिखाण केलेले आहे कि निरोगी व तरूण कसे राहावे.

राजमा सर्वाना माहिती आहे, यामध्ये फायबर व potashium मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे कोलेस्ट्रोल लेवल कमी राहतो व आजारापासून माणूस लांब राहतो. सोबतच राजमापासून मोठ्या प्रमाणात प्रोटीन म्हणजेच प्रथिने मिळतात.

कोकोआ चॉकलेट
७० टक्के पेक्षा जास्त कोकोआ असणाऱ्या चॉकलेट मध्ये प्रोटीन व विटामिन जास्त प्रमाणात असतात. थोडी थोडी डार्क चॉकलेट खाल्याने शरीरातील चरबी कमी होते. सोबतच त्वचा व केस चांगले राहतात.

गाठवाली गोबी (ब्रॉकली)
ब्रॉकली मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे वजन नियंत्रित राहते सोबतच आजराला लढायला ब्रॉकली मदत करते.

ब्लुबेरीमध्ये सुध्दा विटामिन सी असतो. यामुळे रक्तसंचार चांगला राहतो. यामधील काही घटक तुम्हाला शारीरिक वय वाढीपासून दूर ठेवतात.

दैनदिन जीवनात काही बदल तुम्हाला तरुण ठेवतील.
लवकर झोपावे व लवकर उठावे किमान ६ तास झोप आवश्यक आहे. तुम्ही उशिरा उठत असल्यास हे शरीराला घातक आहे. एकवेळेस सकाळी उठायची सवय लागल्यास रोज सकाळी आरामात उठू शकता. आणि या सोबत काही योग व प्राणायाम करावीत.

शारीरिक श्रम हे तरुण राहण्यास अत्यंत मदत करतात. आरामदायक जीवनामुळे माणूस आळशी होतो व त्याचे शारीरिक वय वाढत जाते. रोज सकाळी पैदल फिरणे. व्यायाम करणे यामुळे माणूस तरून राहतो. सोबतच त्याची त्वचा तजेलदार बनून राहते. दैनदिन श्रामानुसार आराम हि आवश्यक आहे.
खाण्या पिण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनात जंक फूड जास्त खाऊ नये. यामुळे तुमच्या शरीरावर खराब परिणाम होतो. सात्विक अन्न व योगासने तुम्हाला तरूण ठेवतात.

त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या टाळण्याकरिता जास्त प्रमाणत पाणी पियावे. रोज ४ लिटर पाणी शरीरास आवश्यक आहे. यामुळे अनेक रोज दूर राहतात.
राग,तणाव यामुळे जास्त वय वाढते त्यामुळे जास्त ताण घेऊ नये. आपली त्वचा तणावामुळे तेज कमी होत असतो.

धुम्रपान करू नये. धूम्रपानाने आयुष्य कमी होत असते. सोबतच तुमच्या त्वचेवर सुध्दा याचा परिणाम होतो.

विटामिन सी च्या सेवनामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. आवळा,संत्रा,पपई,लिंबू,टमाटर,फुल गोबी,हिरवी मिरची,आंबे,टरबूज,अननस इत्यादी फळामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी आढळते याचे सेवेन वाढवावे.

तांब्याच्या भांड्यात पाणी पीत चला. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेऊन सकाळी उठल्यावर रोज पिल्यास पोट साफ राहते. गैस असिडीटी सारख्या समस्या दूर राहतात. आणि चेहऱ्यावर तजेलदारपणा वाढतो.

मासोळीचे तेल तुमच्या अवयवास येणारी शिथिलता दूर करते. यामुळे शारीरक वय कमी करण्यास दुप्पट परिणाम होतो.
साखरीपासून बनणारे पदार्थ खाणे टाळा शरीरास साखर अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे शुगर लेवल योग्य राहते आणि याचा परिणाम तुमच्या वयावर होतो.

जेवण करताना पाणी पिऊ नये. यामुळे शरीराची पचनक्रिया कमी होते. जेवणाच्या आधी व जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये. थोडे पाणी पिऊन जेवण संपवावे व तासाभराने पाणी पिण्यास हरकत नाही.

सदर गोष्टी करून आपण आपले तारुण्य टिकवू शकता.

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *