आशिया खंडातील पहिली बस चालक वसंत कुमारीचा संघर्षमय प्रवास…

वसंत कुमारी आशिया खंडातील पहिली महिला बस ड्रायवर आहे. त्यांनी जेव्हा हातात स्टेअरिंग घेतले तेव्हा अशी परिस्थिती होती कि, महिला एकट्याने प्रवास करायला घाबरत होत्या.विशेष म्हणजे अश्या वयात ज्या वयात मुली आईच्या पदरा मागे लपतात.

वसंत कुमारी, एक नाव जिने संपूर्ण जगाला दाखविले कि महिलांना कितीही खाली ओढण्याचा प्रयत्न केला तरी दृढ निश्चयाने तितक्याच वर येणार. पुरुषप्रधान संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्याच्या थोबाडावर हि जोरदार चपराक आहे. समाजाने वेळोवेळी तिचे खच्चीकरण केले परंतु ती डगमगली नाही. वसंत कुमारी आशिया खंडातील पहिली महिला बस चालक आहे.

१९९३ साली वसंतने गाडी चालवायला सुरवात केली. तेव्हा तिचे वय होते फक्त १४ वर्ष,
आपल्या सुरवातीच्या दिवसात वसंत कडे नौकरी करिता कुठलीही पदवी नव्हती. नवरा बांधकामावर काम करत होता परंतु यामधून होणार्या तुटपुंज्या कमाईतून घर चालत नव्हते. त्यानंतर तिला माहिती झाले कि महिलांना ३० टक्के नौकरीत आरक्षण आहे.

लहानपणीच आईच्या निधनानंतर तिच्या वडिलाने दुसरे लग्न केले व वसंतचा संपूर्ण सांभाळ तिच्या मावशीने केला. वयाच्या १९ व्या वर्षी एका वयस्कर विधुर व्यक्ती सोबत तिचे लग्न लावण्यात आले. त्यांला पहिल्या ४ मुली होत्या. त्यानंतर हिचे २ अपत्य ह्यामुळे आर्थिक घडी एकदम बिघडली. तिच्याकडे नौकरी करिता पदवी नव्हती. आणि बांधकाम साईट वर नवर्याचे काम ह्यातून तिचे घर चालत नव्हते. नौकरीमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण असल्याचे तिला माहित झाल्यावर तिने बस चालकाच्या नौकरी करिता अर्ज केला.

जेव्हा तिने नौकरी करिता अर्ज भरला तेव्हा तिला अधिकारी म्हणत “ जगात फार कमी ठिकाणी महिला बस चालक आहेत. पुरुषासोबत तू हि नौकरी कशी करू शकणार ?”
वसंतने फार कमी वयात अवजड वाहने चालवायचे प्रशिक्षण घेतले होते व तिच्याकडे परवाना सुध्दा होता. अनेक वेळेस तिला फेल करण्यात आले व शेवटी तिला तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्ट कोर्पोरेशन मध्ये ३० मार्च १९९३ साली नौकरीची पाहिली नियुक्ती देण्यात आली.

वसंत सांगते पोलीस अधिकारी इतर सहकारी पुरुष अधिकारी यांच्यामुळे तिला फार अवघड गेले नाही. तामिळनाडू मध्ये आता सध्या ती एकटी महिला चालक नाही आहे तर तिच्या पासून प्रेरणा घेऊन अनेक महिला या क्षेत्रात आल्या आहे. परंतु अधिक महिलांना कार्यालयीन काम दिल्या जाते कारण रस्त्यावर लोड जास्त असतो.

वसंत कुमारी ला तिच्या उत्कृष्ट सेवे करिता २०१६ साली Raindrops Women Achievers Awards
देण्यात आला. तिची इच्छा आहे कि महिला करिता स्वतंत्र वाहन प्रशिक्षण केंद्र सूरु व्हायला हवे. म्हणजे विपरीत परिस्थतीमध्ये महिलांना सन्मानपूर्वक जीवन जगायचा मार्ग मिळेल.

खासरे तर्फे वसंत कुमारीस सलाम

वाचा गौरी सावंत एक तृतीयपंथीय आई
मोक्षदा पाटील महिला सिंघम
हरियाना उध्वस्त होण्यापासून वाचवणारी निडर महिला अधिकारी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *