११ महिन्याचे बाळ घरात ठेऊन तिने सामना केला पंचकुला येथील राम रहीमच्या गुंडाचा..

नेहमी शांत आणि खुशीत राहणारे शहर पंचकुला शुक्रवारी अचानक पेटले. कारण गुरुमित राम रहीम स्वयंघोषित देवाचा अवतार याला बलत्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली. सगळीकडे मृत्यूचे थैमान, जाळपोळ आणि हिंसाचार माजला होता. समर्थक अतिशय खालच्या पातळीस उतरले होते.

हरियाना पोलिसाने कितीही दावे केले कि ते पूर्णतः लढायला तयार होते परंतु सर्वाना वस्तुस्थिती माहिती आहे. राम रहीम समर्थकानी पोलीस स्टेशन, गाड्याची नासधूस जाळपोळ सुरु केली. लोकांना मारहाण हि रस्त्यावर समर्थकांनी केली. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार पोलीस स्वतः हि परिस्थिती बघून पळ काढत होती. त्यांनी हा सुध्दा विचार नाही केला आपल्या मागे सामान्य नागरिक आहेत.

परंतु या सर्व परिस्थितीमध्ये एक प्रामाणिक निडर अधिकारी पंचकुला येथे या सर्वाचा सामना करत होती. तिचे नाव गौरी पराशर जोशी. या अधिकर्याने स्वतःचा अकरा महिन्याचे बाळ बाजूला ठेवून या परिस्थितीस समोर गेली. आलेल्या अहवालानुसार तिला समर्थकांनी जखमी केले तिच्यावर हल्ला केला पण ती हटली नाही.

IAS गौरी जोशी

गौरी जोशी Deputy Commisnor हि २००९ सालची IAS अधिकारी Economics Times च्या बातमी नुसार तिच्यावर समर्थकांनी गोटे आणि लाठीने हल्ला केला.
अश्या परीस्थीमध्ये ती डगमगली नाही. अश्या कठीण परीस्थितीमध्ये तिच्या सोबत फक्त एक पोलीस अधिकारी देण्यात आला. तमाम संकटाचा मुकाबला करत ती कार्यालयात पोहचली आणि परिस्थिती हाताबाहेर असून मिल्ट्रीला बोलवण्यात यावे असा आदेश तिने दिला.

११ महिन्याचे बाळ घरी ठेऊन ती आदेश काढण्या करिता कार्यालयात गेली आणि रात्री ३ला वापस आले. जर हा आदेश पोहचला नसता तर आपण कल्पनाही करू शकत नाही काय परीस्थित राहली असती.

या अगोदरसुध्दा तिने अनेक कारनामे केलेले आहेत ओडीसा येथे कार्यरत असताना तिने नक्षल चळवळीपासून अनेक लोकांना वाचविले.

मागील वर्षी पासून ती पंचकुला येथे कार्यरत आहे. हल्ल्यामध्ये ती जखमी झाल्यानंतर तिला अनेक लोकांनी विनंती केली कि उपचार घ्यावा परंतु तिने साफ नकार दिला कि दवाखान्यात माझ्या पेक्षाही गंभीर रुग्ण आहेत माझ्यामुळे व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. The Tribune मध्ये या बाबत सविस्तर वृत्त छापण्यात आले आहे.
गौरीचे पतीही २००३ सालचा IAS आहे व त्याची ड्युटी चंदीगड येथे आहे.

गौरीच्या हिमतीस व कार्यास खासरे तर्फे सलाम…

वाचा कश्मीरमध्ये दगडफेक करणार्याच्या मुसक्या आवळणारी लेडी सिंघम

1 comment

  1. कारनामे हा शब्द त्यांच्या कर्तुत्वाला शोभेसा नाही. त्यानी जे जे केले आहे ते पराक्रम आहेत. अश्या रण रागिनीला मानाचा मुजरा..

    काही जास्त बोलले असेल तर क्षमस्व..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *