मृत्युनंतर पतीप्रमाणेच तिने वाचविले अनेकाचे जिव…

कविता करकरे ATS प्रमुख शहिद हेमंत करकरे यांची पत्नी. हेमंत करकरेंना मुंबई दहशतवादी हल्यात अनेक निष्पापांचे जिव वाचविताना विरमरण आले. २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांची पत्नि कविता यांचा ब्रेन हैमरेजनी मृत्यु झाला परंतु त्यांनी मृत्युसमयी सुध्दा तिन लोकांना जिवनदान दिले.

कविता करकरे ह्या टारिडो कॅालेजला प्राध्यापिका होत्या , अचानक बिमार पडल्याने त्यांना हिंदुजा हॅास्पीटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे त्यांचा ब्रेन डेड आहे हे समजले. मेंदुत अती रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा वाचण्याची अपेक्षाच नव्हती. त्यांना हा आजार बरेच दिवसापासुन होता व याची कल्पना त्यांना होती.
मुलगी परदेशात असल्यामुळे त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. कविता करकरे यांनी मृत्युपुर्विच त्याचे देहदान करायचा संकल्प केला होता. त्यानुसार त्याची किडनी हि एका ४८ वर्षिय व्यक्तिस देण्यात आली व त्याचा जिव वाचला.

दुसरी किडनी ही ५९ वर्षिय व्यक्तिस जसलोक हॅास्पीटल येथे देण्यात आली हा रुग्ण किडनी प्रत्यारोपणाकरीता ७ वर्षापासुन वाट बघत होता व त्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक होते.
कोकीलाबेन हॅास्पीटल येथील ४९ वर्षिय रुग्णाला सुध्दा त्यांनी नवजिवन दिले त्याचे लिवर त्या रुग्णास देण्यात आले.

तिनीही शस्त्रक्रिया ह्या यशस्वीरित्या पुर्ण झाल्या व त्याचे डोळे हे हाजी बाचुअली आय बैंक,परेल यांना दान देण्यात आले.

हिंदुजा हॅास्पीटल येथे कवितांची मुले आकाश,सायली व जुई यांनी हा कठिण निर्णय घेतला व ३ रुग्णांना नवजिवन दिले.

हेमंत करकरे हे सुध्दा आयपीएस होण्या अगोदर प्राध्यापक होते त्याच काळात कविता व हेमंत सरांची भेट झाली. २६ नोव्हेंबर २००८ ला दहशतवादी हल्याच्या दिवशी हेमंत करकरे व कविता सोबत जेवन करत होते व अचानक त्यांना फोन आला व ते चालले गेले की परत आलेच नाही.
दुस-यांचे आयुष्य वाचविणे हे दोघांनिही मृत्युपश्चात करुन दाखविले…..

2 comments

  1. अभिमान वाटतो तुमचा आम्हाला, तुम्हीच या देशाचे खरे हीरो आहात salute तुमच्या कार्याला,आज या देशाला तुम्हच्या सारख्या खरया हीरो ची खुप गरज आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *