आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी कश्मीरच्या रस्त्यावर लेडी सिंघम…

एक महिला हेल्मेट आणि अंगावर सुरक्षा जैकेट चढवून मागील वर्षी काश्मीर मध्ये दगडफेक करणार्यांना चांगल्याच मुसक्या बांधत होती. श्रीनगर मध्ये तिच्या नावाची दहशत झाली होती.

तिचे नाव आहे कांचन यादव, Assistant Commandant CRPF ४४ बटालियन श्रीनगर…
तिच्या बटालियन मध्ये तिला सर्वे लेडी सिंघम म्हणतात. परंतु तिच्या मधील हिम्मत हि रील लाईफ हिरो पेक्षा हजार पटीने जास्त आहे.
वयाच्या २८ व्या वर्षी तिला CRPF मध्ये हे पद मिळालेली पहिली महिला ती व सदा पेटत राहणाऱ्या भागात तिची नौकरी.

ती म्हणते कि “माझ्या साठी देश पहिले येतो त्याच्या समोर काहीही नाही” रस्त्यावरील अनेक धोक्यापासून हि निडर सर्वाचा मुकाबला करते.
“मला माझी नौकरी खूप आवडते. हि वर्दी घातल्या बरोबर एक वेगळीच उर्जा निर्माण होते… तीच उर्जा मला ह्या पदावर घेऊन आली आहे राष्ट्रप्रेम”
कश्मीरला तिला सर्वात प्रथम नियुक्ती मिळाली. जून २०१५ पासून आज पर्यंत ती श्रीनगर येथे कायदा आणि सुव्यवस्था राखत आहे.

तिच्या मधील क्षमता आणि ताकद याचा परिचय सर्वाना बुर्हाण वाणी याला मारल्या नंतर उठलेल्या दंग्यात आला. तिची काम करण्याची क्षमता बघून तिला अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

सकाळ ते संध्याकाळ न चुकता कश्मीर खोर्यात शांतता प्रस्थापित करायचं काम कांचन यादव करत आहे. कांचन यादव म्हणतात कि “जेव्हा मी कठीण पोस्टिंगमध्ये काम करते तेव्हा मला नेहमी आश्चर्य वाटले की मी जमिनीवर माझी जबाबदारी आरमात पार पाडेल. पण आता, या पोस्टिंगनंतर मला विश्वास आहे की मी काहीही करू शकते आणि कोणत्याही स्थितीत काम करू शकते.”

CAPF झेलम , हरियाना येथे २०१० साली झालेल्या कैम्प मध्ये तिला या खाकी वर्दी विषयी आकर्षण निर्माण झाले आणि तिने ती मिळवली.
तिची आई सुध्दा CRPF मध्ये Assistant Commandant होती. सध्या तिची ड्युटी मणिपूर मध्ये आहे. तिचे आजोबा पैरामिल्ट्री मध्ये होते. आणि वडील निवृत्त air force अधिकारी आहे. एकंदर तिच पालन पोषण हेच या वातावरणात झाले आहे.

“माझ्या घरातील सर्वे देश सेवेत आहे म्हणून मला याचे आकर्षण होते आणि आईने मला हे साध्य करायला खरी प्रेरणा दिली” अशी ती सांगते.
तिच्या आईची ड्युटी १९९९ साली कारगिल युद्धात होती. ११ व्या वर्षी कांचन ने काश्मीर खोर्याला भेट दिली व हि सर्व परिस्थिती पहिली.

कांचनचे लग्न झालेले आहे तिचा नवरा हा कोची येथे नौदलात अधिकारी आहे . डिसेम्बर २०१५ मध्ये या दोघाचे लग्न झाले.
ती हसत सांगते कि “ माझ्या नवर्याने व मी देशसेवेस जीवन अर्पण केले आहे. यामध्ये परिवार मधात येणार नाही”

व्यस्त काम काजातून वेळ मिळाल्यास ती स्थानिक लोकांना भेटते त्यांच्या समस्या समजून घेते. “स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त तुमच्या मनावर विश्वास ठेवा आणि तुम्ही उत्कृष राहसाल” हे तिचे मत.

खासरे तर्फे कांचन यादवच्या कार्यास सलाम…

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *