हरियाना पंजाब मधील दंगल व मराठा क्रांती मोर्चा….

ऑगस्ट महिना २ घटना..
एक परवाची २५ ऑगस्ट हरियाणा पंजाब आणि दुसरी ९ ऑगस्ट मुंबईची

एका बलात्कारी बाबाला सोडा म्हणून २५ ऑगस्ट ला जाळपोळ करून दंगल भडकावून ५०-१०० लोकांचा जीव घेणारे अंध अनुयायी कुठं आणि ५८ मोर्चे काढून बलात्कार्याला लागलीच फासावर लटकवा म्हणून लाखो करोडोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरून साधा दगड सुद्धा न उचलणारे मराठे कुठं..

आता १५ दिवसांपूर्वीचं मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चाचं उदाहरण घ्या.. लाखो मराठा बांधव ९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात मूक आंदोलन करण्यासाठी जमले होते… मराठा ही मुळातच फायटर कम्युनिटी आहे… लढाऊ बाणा लढवय्या वृत्ती ही मुळातच मराठ्यांच्या रक्तातच आहे… पण मुंबईत मराठ्यांनी प्रचंड संयम दाखवला त्याचं सारं श्रेय शिवभक्तांना, काही प्रमाणात मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांना आणि अगदी तुरळक का होईना छत्रपती संभाजीराजेंना द्यावं लागेल…

सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मी जबाबदारीनं मांडतोय की ९ ऑगस्टला मुंबई क्रांती मोर्चाचा शेवट होतं असताना आझाद मैदानात समाज खूप प्रक्षोभक झाला होता… मागण्या मान्य झाल्याशिवाय मैदान सोडायचं नाही असा पवित्रा अनेक लोकांनी घेतला.. त्यात एखाद्यानं चिथावणी दिली असती तर मॉबचा संयम सुटून मुंबई पेटायला क्षणभर सुद्धा नसता लागला… मराठ्यांची वृत्तीच मुळात लढवय्यी असल्यानं सर्व आयोजकांना पोलिसांना प्रचंड प्रेशर होतं.. तिथे मराठा क्रांती मोर्चाचा प्रतिनिधी सामोरा गेला असता तरी जनतेनी प्रतिसाद दिला नसता.. मग ह्या जनतेची श्रद्धाअसलेला एखादा व्यक्ती म्हणून सर्व मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींनी एकमताने संभाजी महाराजांना गळ घातली आणि मोर्चाचा प्रोटोकॉल मोडून स्टेजवर जायची विनंती केली… संभाजीराजे स्टेजवर जायला तैयार नव्हते पण मोर्चेकऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त करून राजेंना स्टेजवर जाण्यास भाग पाडले…. राजे एक मिनिटासाठी स्टेजवर गेले लाखो लोक मैदानात होते राजेंच्या शांततेच्या अपिलानं लाखो लोकांनी संयमाचं शिस्तीच पालन केले आणि अनर्थ टळला….

परिस्थिती चिघळू नये म्हणून राजेंना स्टेजवर नेणं हा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा तात्कालिक निर्णय होता.. सोशल मीडियात टीकेचं धनी मात्र राजेंना केलं गेलं असो…

हरियाणा आणि पंजाब च्या प्राश्वभूमीवर पण सर्व मराठ्यांनी मुंबईत जो अभूतपूर्व संयम दाखवला तो खरच वाखाणण्याजोगा होता… सॅल्युट मराठ्यांच्या संयमाला, सॅल्युट मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांना.

विराज भास्कर तावरे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *