सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून या आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

अधिकार्याची एवढी मुजोरी वाढलेली आहे कि ते सामान्य लोकांना काहीही समजत नाही याला काही अधिकारी अपवाद आहेत. असाच अनुभव आजकाल अमरावतीकर लोकांना येत आहे. इर्विन हे जिल्ह्याचे सामान्य रुग्णालय अनेक खेड्यापाड्यातून गरीब लोक येथे उपचारा करिता येतात. सामान्य रुग्णालयात उपचार घेणारा हा समाजाच्या खालच्या स्तरातील गरीब माणूस राहतो. हे लोक अधिकार्यांना बोलायला बघत नाही. अमरावतीच्या दवाखान्यात घाणीचे एवढे साम्राज्य वाढले होते कि तिथे पाय ठेवणेही कठीण झाले होते. हि बाब काही नागरिकांच्या लक्षात आली.

महाराष्ट्रात आगळ्या वेगळ्या आंदोलना करिता प्रसिध्द असलेले आमदार बच्चू कडू यांना लोकांनी गाठले. बच्चू कडू यांचे आंदोलन हे लक्षवेधक असतात. कधी ते पाण्यासाठी टाकीवर चढून शोलेचे विरू होतात तर कधी आदिवसाच्या जमिनी करिता स्वतःला जमिनीत गाडून घेतात. असा आगळा वेगळा आमदार महाराष्ट्राला लाभला आहे. जो पर्यंत आंदोलनच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत त्यांचे आंदोलन सुरु राहतात. कधी तोंडाला काळे फासून जमिनीवर नाक घासायचे आंदोलन तर कधी नेत्याच्या घरात बेसरमाची झाड लावायची बच्चू कडू यांनी आंदोलने केली आहे. म्हणून हा आमदार ३ वेळा अपक्ष निवडून आला व विशेष म्हणजे लोक वर्गणी करून यांचा प्रचार करतात.

रुग्णालयास बच्चू कडूनि इशारा देऊनही प्रशासनास जाग आली नाही. मग काय बच्चू कडू यांनी ठरल्याप्रमाणे आपले आगळेवेगळे आंदोलन सुरु केले व स्वतः कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दवाखान्याची साफ सफाई सुरु केली. बघता बघता लोकही जमली व संपूर्ण परिसर स्वच्छ झाला. परंतु आज बच्चू कडू साफ करून गेले उद्या कोण करणार हा प्रश्न आहेच तर त्यांनी यावर म्हटले आहे कि , हि आमची गांधीगिरी होती पुढील वेळेस आल्यावर परत असे घाणीचे साम्राज्य दिसल्यास भगतसिंगगिरी दाखवू म्हणजेच या बाबत तुम्हाला सांगायची गरज नाही. या अगोदर नाशिक,मंत्रालय इत्यादी ठिकाणी बच्चू कडूचे आक्रमक रूप अधिकार्यांनी अनुभविले आहे.

या शैलीवर बरेच लोक टीका करतात परंतु बच्चू कडू यांच्या मते बैर्याना आवाज याला धामाक्याची आवश्यकता असते. आणि तो आम्ही करतो. यामुळे प्रश्न मार्गी लागतात.
या घटनेचा संपूर्ण वीडीओ तुम्ही बघू शकता..

त्यांच्या या कार्याकरिता खासरे तर्फे त्यांना शुभेच्छा…

बच्चू कडू विषयी अधिक माहिती क्लीक करा व वाचा..
तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *