लालबागचा राजा का आहे एवढा प्रसिध्द…

लालबागचा राजा का आहे एवढा प्रसिध्द…

लालबागचा राजा म्हणजे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ ह्या नावाने ओळखल्या जाते. याची स्थापना १९३४ साली झाली. लालबाग मार्केट मध्ये हे गणपती मंडळ असल्याने लालबाग हे नाव देण्यात आले.

लालबागचा राजा हा अनेक वर्षापासून असाच प्रसिध्द आहे. १९३२ साली लालबाग मार्केट बंद पडले होते. त्या वेळेस तिथल्या विक्रेत्यांनी ठरविले कि गणपती बसवायचा. गणपतीची भक्ती भावाने पूजा केल्यास परत आपले मार्केट सुरु होईल आणि आपले चांगले दिवस परत येतील. मार्केट सुरु झाल्या वर गणपती बसवायचं ठरल आणि कमाल झाली मार्केट परत सुरु झाले. आणि सर्वप्रथम १९३४ साली लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली.

अजून एक गोष्ट लालबागच्या राजा बाबत प्रसिध्द आहे कि, भारतातील स्वातंत्र संग्राम जेव्हा जोरावर होता तेव्हा सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ स्थापन करण्यात आले. मुख्य उद्देश हा होता कि लोक एकत्र येतील आणि विचार विनिमय होऊन काहीतरी देशासाठी योगदान देता येईल. त्यावेळेस अनेक क्रांतिकारी येथे एकत्र येऊन विचार विनिमय करत असे. त्यामुळे सुध्दा लालबागचा राजा प्रसिध्द झाला.

काही लोकांच्या मते हा नवसाला पावणारा गणपती आहे इथे जी इच्छा मागल्या जाते ती पूर्ण होतेच. त्यामुळे सुध्दा लालबागचा राजा प्रसिद्ध आहे

काही लालबागच्या राजाच्या सदस्यांना स्वतंत्र लढ्यात अटक सुध्दा झाली आहे. लालबागचा राजा स्वतंत्र सैनिकांना स्फूर्ती देत असे. १९४६ साली लालबागचा राजा हा सुभाष चंद्र बोस यांच्या वेशात बसवण्यात आला होता. १९४७ साली लालबागच्या राजाला पंडित जवाहरलाल नेहरुचे रूप देण्यात आले होते. त्यानंतर महात्मा गांधीचा वेश सुध्दा लालबागच्या राजाने परिधान केला होता.
१९६० नंतर लालबागचा राजा सर्वत्र प्रसिद्ध जाहला आणि नवरात्री उस्तवाला देखील याच काळात सुरवात झाली. ५० वर्ष पूर्ण झाल्यावर लालबागच्या राजाच्या ४९ प्रतिमा बसविण्यात आल्या होत्या त्या आत्ता पर्यंतचे सर्व रूप होते.

लालबागच्या राजाचे देखावे हे नेहमी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहे. त्यामुळे लालबागचा राजाला पाहायला गर्दी असते. लालबागच्या राजाचे दर्शन घ्याला मोठ्यात मोठा नट ते राजकारणी सर्व लोक हजेरी लावतात व त्याच्या चरणी नतमस्तक होतात.

या सर्व कारणामुळे लालबागचा राजा प्रसिध्द आहे.
घ्या अष्टविनायकाचे दर्शन

Lalbaugcha Raja’s Website: http://www.lalbaugcharaja.com/ (लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ)

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *