ह्या पाचजणीमुळे झाली तिहेरी तलाक पद्धत बंद….

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक ऐतिहासिक निकाल दिला तो म्हणजे तिहेरी तलाक पद्धती बंद करण्याबाबत. सर्वोच्च न्यायलयाने म्हटले कि मुस्लीम स्त्रियांना मुलभूत अधिकारापासून तिहेरी तलाक हि पद्धत वंचित ठेवते. हि अतिशय चुकीची पद्धत आहे तोंडी तीनवेळा तलाक म्हनने आणि तिची काडीमोड होणे.
ह्या अन्यायकारक रूढी परंपरा बंद करण्याकरिता पाच जणीने शर्तीचे पर्यंत केले व आज त्या यशस्वी झाल्या आहे. चला बघूया ह्या पाच स्त्रिया कोण ?

शायरा बानो
वय ३५ वर्ष
मुले २
काशीपुर जिल्हा उधम सिंघ नगर , उत्तराखंड
शायरा बानो ला ऑक्टोंबर २०१५ ला या पद्धतीने तलाक देण्यात आला. लग्नाच्या १५ वर्षानंतर तिला सोडण्यात आले.

आफरीन रेहमान
वय २६ वर्ष
जयपूर, राजस्थान
आफरीनने २०१४ साली लग्न केले एका विवाह नोदणी वेबसाईट वरून दोघाची ओळख झाली. लग्नाच्या २,३ महिन्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिला त्रास देणे सुरु केले तिचा मानसिक छळ केल्या गेला तिला हुंड्या करिता त्रास देण्यात येत होता. मागील वर्षी मे महिन्यात स्पीड पोस्टाने पत्र आले कि तला तलाक देण्यात येत आहे.

गुलशन परविन
वय ३१ वर्ष
रामपूर उत्तर प्रदेश
परवीनचे लग्न एप्रिल २०१३ साली झाले त्यानंतर तिला हुंड्या करिता सतत २ वर्ष त्रास देण्यात आला. आणि त्यानंतर १० रुपयाच्या stamp पेपर वर तिच्या नवर्याने तिला तलाक दिला असे पत्र तिला २०१५ मध्ये पाठविण्यात आले.

इशरत जहान
मुले ४
हावरा , पश्चिम बंगाल
इशरतला तिच्या नवर्याने तलाक २०१५ मध्ये दुबई येथून सरळ फोनवर दिला. लग्नाच्या १५ वर्षानंतर तिला तलाक देण्यात आला होता.

आतीया साबरी
मुले २
सराहनपूर उत्तरप्रदेश
साबरीचे लग्न २०१२ साली झाले होते. १२ डिसेम्बर २०१५ ला तिने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली कि तिला सासरचे २५ लाख रुपया करिता छळ करीत आहे. त्यानंतर तिच्या नवर्याने तिला सध्या कागदावर लिहून तलाक दिला.

Muslim Women’s Quest for Equality (MWQE) व Khuran Sunnath Society (KSS) यांनी शायरा बानो व ह्या चौघी सोबत हा लढा लढला. MWQE हि संस्था मुस्लीम महिल्याच्या हक्का करिता लढत असते आणि KSS हि संस्था कुराणचा योग्य वापर कसा करावा ह्या करिता कार्य करते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *