दोनशे रुपयांची नोट उद्या येणार चलनात..

भारतीय रिजर्व बँकेने अधिकृत घोषणा केली आहे उद्या शुक्रवार रोजी नवीन २०० ची नोट चलनात येणार. मागील काही दिवसापासून २०० ची नवीन नोट येणार या विषयी अनेक खोटे फोटो सोशल मिडियावर फिरत होते. या सर्व अफवांना रिजर्व बँकेने पूर्णविराम दिला आहे. कशी असणार नवीन नोट या विषयी तुम्हाला आता माहिती देणार खासरे वर

दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची नोट व पाचशेची नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. आता २०० रुपयाची नोट चलन तुटवडा कमी करण्याकरिता कामाला येणार आहे.

चला बघूया काय असतील वैशिष्टे ह्या २०० च्या नोटीचे

नोटेची पुढील बाजू

नवीन नोट महात्मा गांधी (नवीन) प्रतिमा राहणार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर. पटेल यांच्या स्वाक्षरीसह हि नोट येणार.

सांकेतिक चिन्हातहि दोनशे लिहून राहणार या नोटीवर

२०० रुपये हे देवनागरी मध्ये लिहून असणार

महात्मा गांधी यांची प्रतिमा मध्यभागी असणार…

‘आरबीआय’, ‘भारत’, ‘भारत’ आणि ‘200’ हे सूक्ष्म अक्षरात लिहून असणार.

नोटीमधला सुरक्षा धागा आता हिरव्या नाही निळ्या रंगात राहणार. आणि त्यावर भारत व RBI हे लिहून असणार.

खालील भागात असलेला २०० हा आकडा हिरवा होता आता तो निळा झाला आहे.

अशोक स्तंभ उजव्या बाजूला असणार.

उजव्या बाजूला नोटेचा नंबर हा लहान ते मोठा होणार.

अंध व्यक्तीकरिता महात्मा गांधी व अशोक स्तंभ हे कोरीव असल्यामुळे ओळखता येणार. सोबतच त्याची खून H अशी राहणार व २०० चा आकडा हा ब्रेल लिपीत राहणार.

नोटीच्या मागची बाजू

छपाईचे वर्ष मागील बाजूला राहणार.

स्वच्छ भारत लोगो व त्याचे घोषवाक्य राहणार.

वेगवेगळ्या भाषेत चलनाचे मुल्य

सांचीचे स्तुपाचा फोटो

नोटेचा आकार 66 mm x 146 mm एवढा असणार.

50 रुपयांचीही नवी नोट

आरबीआयने 50 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची घोषणा केली होती. पन्नास रुपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील हे महत्वाचे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *