१३३ वर्षापासून चालत आलेली मारबताची परंपरा…

चिलट माश्या गोमाश्या जायरे मारबत….

आजही खेड्याने रोज सकाळी गावातील तरून एकत्र येऊन हि परंपरा चालवतात परंतु नागपूर मध्ये याचा नजरा वेगळाच असतो. वाचा खासरे वर काय आहे मारबत…

नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी येथे आजहि साजरा होतो मारबत उस्तव, पोळ्याच्या दुसर्या दिवशी मारबत आणि बडग्या याची मोठ्या धूमधडाक्यात मिरवणूक निघते. शहरातील काही मंडळाद्वारे मारबताची मिरवणूक काढली जाते. हि परंपरा शेकडो वर्षा पासून चालत आलेली आहे. मारबत आणि बडग्या हे समाजातील वाईट प्रवृत्तीचे प्रतिक आहे. अनेक पिढ्या पासून हे मारबत बनविणारे आजही हि प्रथा जोपासून आहे.

जगनाथ बुधवारी यांचे तेली समाज मंडळ आजही पिवळ्या मारबत बनवत आहे. ६० वर्षीय कारागीर गजानन शेंडे सांगतात कि त्याचे वडील भिमाजी शेंडे हे मारबत बनवत होते आज ते बनवतात. १८८५ मध्ये त्यांच्या वडिलांनी मारबत बनवायला सुरवात केली आणि वडिलाच्या मृत्यूनंतर आज ते हि परंपरा टिकवून आहे. भिमाजी शिंदे यांचे वडील गणपतराव शिंदे सुध्दा हेच काम करत होते. मारबत निर्मात्या कारागीर मध्ये सदाशिव वस्ताद तडीकर हे सुध्दा आजही हि परंपरा सांभाळून आहे. त्यांच्या नतंर त्याचे नातू जयवंत मनिराम तकीतकर आज मंडळाचे सचिव म्हुणुन हे काम सांभाळत आहे. पिवळ्या मारबता सोबत काळ्या मारबतहि अनेक वर्षापासून शहरात निघतात. दोन्ही मारबत हे वाईट समाजातील वाईट प्रवृतीचे प्रतिक आहे.

जयवंत ताकीतकर सांगतात कि पिवळी मारबत हि १८८५ पासून बनत आहे. याला बनवायचा उद्देश हा कि शहरातील रोगराई , अस्वच्छता इत्यादी पासून स्वतंत्र मिळणे. १८८५ अगोदर शहरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली होती त्या वेळेस लोकांना असे समजले कि मारबताची मिरवणूक काढली कि ह्या पासून मुक्ती मिळेल. काळी मारबत सुध्दा १३१ वर्षापासून बनविल्या जाते. असे सांगल्या जाते कि १८८१ साली भोसले घराण्यातील बकाबाई ह्या इंग्रजांसोबत मिळाल्या होत्या त्या नंतर भोसले कुटुंबांवर वाईट दिवस आले. या गोष्टीचा विरोध करण्याकरिता काळी मारबताची मिरवणूक काढल्या गेली. काळ्या मारबतला रावणाची बहीण पुतनाच्या स्वरुपात दाखविल्या जाते. श्रीकृष्णाने पुतनाला मारल्यानंतर गोकुळवासियांनी तिला गावा बाहेर नेऊन जाळले व गावातील रोगराई नष्ट झाली. हि धारणा मनात ठेऊन काळी मारबत बनविल्या जाते. अशी धारणा आहे कि माराबतास गावा बाहेर नेऊन जाळल्यास रोगराई व वाईट प्रवृत्ती नष्ट होतात.

जुन्या मंगळवारीत श्री साईबाबा सेवा मंडळाद्वारे पिवळ्या मारबत बनविल्या जाते. असे म्हटल्या जाते कि मारबत जगनाथ बुधवारीतून निघणार्या मारबातची हि मुलगी आहे. म्हणून हिला “लहान पिवळी” म्हटल्या जाते. या मारबताची परंपरा ११८ वर्षाची आहे. याची सुरवात स्व. काशीराम मोहनकर यांनी केली होती. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत हे मारबत बनविले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोहन मोहनकर आजही हे परंपरा जपून आहे. यानंतर बडग्याची परंपरा सुरु झाली आणि आजही सुरु आहे.

मारबत बनवायची परंपरा अनेक वर्षाची आहे. काही लहान मुलाद्वारे बडग्याचा निर्माण केल्या जाते. बडग्याची परंपरा लहान मुलांनी सुरु केली गेली असे म्हटले जाते. कागद, झाडाच्या फांद्या, घरातील कचरा इत्यादी पासून बडग्या बनविल्या जाते. शहरभर मारबत व बडग्या फिरविल्या नंतर त्यांचे दहन केल्या जाते. बडगे बनविणारे अनेक मंडळ शहरात आहे. सचिन गुरव सांगतात कि बडग्या आम्ही मागील ४५ वर्षापासून बनवितो. प्रत्येक वर्षी वाईट प्रवृतीचे दर्शन बनवून हे बडगे बनविल्या जाते.

अशी आहे हि मारबताची खासरे परंपरा….

1 comment

  1. I have noticed you don’t monetize your website, don’t waste your traffic, you
    can earn additional cash every month because you’ve got hi quality content.
    If you want to know how to make extra money, search for:
    best adsense alternative Wrastain’s tools

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *