मराठा क्रांती मोर्चा एक प्रवास चळवळ ते ……

मराठ्यांनी, मराठा समाजाच्या हितासाठी सुरु केलेली चळवळ म्हणजे मराठा क्रांती मोर्चा… ९ ऑगस्ट २०१६ मराठा समाजाच्या येणाऱ्या इतिहासचे एक पान जे परत फितुरीने फाडलेले पान.

पहिले काही मोर्चे खरच चळवळी चे प्रतिक होते कारण ३५० वर्षानंतर माझा समाज एक झाला होता आपल्या मागण्या मांडण्यासाठी माझ्या माता, भगिनीसह रस्तावर आला होता आज पर्यंत राजकीय पक्षाचे जोडे उचलाणारी माझी भावंडे आज एक होऊन समाजासाठी आपले सर्व कामधंदे सोडून एकत्र काम करत होती, काही मतभेद होते पण ध्येय एक होते. पण कुठे तरी माशी शिकली वा शिंकवली आणि हीच चळवळ ईव्हेंट बनली आणि मग आले अनेक नवे नेते आणि राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे त्यांचे दलाल आणि ९ ऑगस्ट २०१७ ला हि चळवळ संपली आता उरली आहे ती फक्त आस काही तर मिळण्याची, लाचारी सरकार काय देईल ते घेण्याची, काही आठवणी आणि त्याच बरोबर चळवळीत काम करतांना भेटलेल जीवाभावाचे मित्र…..

देशात काहीही छोटेसे घडले तरी “मन कि बात” करणार्या पंतप्रधान मोदि यांना हे लाखोच्या संख्येने निघणारे आणि जगभरात ज्या आचारसंहितेचा बोलबाला त्या आचारसंहिते प्रमाणे निघालेले शांत मूक मोर्चे दिसले नाहीत का?

१३ जुलै २०१६ एक काळा दिवस आमच्या भगिनीवर अत्याचार करून तिचा निघृण हत्या करण्यात आली, पोलीस आणि प्रशासनाने त्या घटनेकडे लक्षच दिले नाही म्हणून आम्ही रस्तावर उतरलो आणि त्या भगिनीच्या न्यायासाठी आम्ही एक झालो औरंगाबाद मधील काही मराठे एक झाले आणि ह्या क्रांतीला सुरुवात झाली, खरतर आम्ही रस्तावर उतरलो पहिल्यांदाच पण आमची एकी पाहून सरकार हादरले पण सरकारला हि माहित होते हे मराठे कधीच एक होणार नाही आणि याच्यात आपलेच काही लोक आहेत जे कधीही आपण फेकलेल्या तुकड्यांसाठी पळत येतील आणि आज हि तेच झाले आहे.

९ ऑगस्ट २०१६ ला औरंगाबाद मध्ये पहिला मोर्चा निघाला कुठल्याही राजकीय पाठींब्याशिवाय एक नविन आचारसंहिता आम्ही त्या मोर्चा मध्ये आणली आणि लढवय्या समाज शांती आणि साविधानिक मार्गाने रस्तावर आला प्रत्येक जिल्हात मोठ्या प्रमाणात मराठा समाज एक होऊन रस्त्तावर आला आणि एक नवा इतिहास घडला पण हे सर्वे होत असताना एकत्र येणार समाज पाहून काही राजकीय पक्ष आणि त्यांनी पोसलेल्या संघटना मात्र त्यात घुसल्या आणि सुरु झाली श्रेयवादाची लढाई “मी मोठा कि तू” “माझा नेता कि तुझा नेता मोठा” “माझी संघटना हि तुझी संघटना मोठी“ आणि याच श्रेयावाद मध्ये मोर्चा संपला आणि आले काही नवीन चेहरे समाजाचे नेते म्हणून आणि काही संपलेले नेतृत्व हि पुन्हा जीवित झाले.

५७ मोर्चे महाराष्ट्र आणि इतर भागात झाले आणि शेवटचा निर्णायक मोर्चा मुंबई मध्ये होणार होता पण तिथेच सुरु झाले राजकारण फुटीचे आणि फितुरीचे राजकारण .. ज्याने संपविली हि चळवळ

नागपूर मध्ये झालेल्या मोर्चाचे तर नावच बदले कारण सरकारला एक नवा खेळ खेळायचा होता आणि त्याना त्याचा फायदाही मिळाला पहिला मोर्चा मध्ये हादरलेले सरकार त्या नंतर च्या मराठा मोर्चाच्या कडे दुर्लक्ष केले कारण आपलेच फितूर त्यांना सामील झाले होते.

सर्वे मोर्चे झाल्यावर सुरु झाले होते निर्णायक मोर्चाची सुरुवात ५ जानेवारी २०१७ ला मुंबई मध्ये महामोर्चा निघणार असे औरंगाबाद येथून राज्यसमन्वयकच्या एक मताने जाहीर झाले आणि सरकारचे धाबे दणाणले कारण येणार्या महानगर पालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद यांच्या येणार्या निवडणुकीत च्या वेळेवर हा मोर्चा झाला तर सरकार पडेल कि काय अशी भीती सरकारला वाटू लागली होती त्यातच आधीच आपल्या मित्र पक्षाकडून डामडौल झालेल्या सरकारला हा मोर्चा नको होता. मग सुरु झाली सरकारची खेळी प्रथम माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर सांगतिले हि मी मोर्चा ला सामोरे जाणार आणि मराठा समाजाच्या मागण्या ऐकणार पण त्याच वेळी सरकारप्रणीत काही संघटना आणि राजकीय वरदहस्त लाभलेल्या लांडग्यांनी हि तारिख रद्द केली कारण होते परीक्षा (ज्या ३१ जानेवारीला कुठल्याही महत्वाच्या परीक्षा नव्हत्या), माघी गणेशउत्सव आणि मुंबई मध्ये आयोजनासाठी २० दिवस कमी पडतील हि प्रमुख करणे देउन हा मोर्चा पुढे ढकला खरे कारण होते जे ते म्हणजे येणारी निवडणूक आणि त्या मध्ये आपली उमेदवारी …

ज्या प्रमुख कारणासाठी मोर्चा पुढे ढकलला ती म्हणजे परीक्षा आणि मोर्चा ची नवीन तारीख येन बोर्डाच्या परीक्षेच्या काळात ६ मार्च घेतली आता सांगा याचा अर्थ काय?? कि परीक्षेच्या कारणाने मराठा समाज मुंबई मध्ये येणार नाही आणि जर मोर्चा झाला तर इतर समाजाकडून त्या वर केसेस दाखल करून हा मोर्चा रद्द करणे वा संपवने, ज्यांनी हि ६ मार्च ची तारीख बहुमताने मंजूर केली ते सारे आपल्या राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन व्यस्त झाले आणि महाराष्ट्रात बहुसंख्येने सरकार पक्ष विजयी झाला ज्या सरकारने आपल्या ५७ मोर्चा कडे दुर्लक्ष केले तेच सरकार सर्वे स्थनिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात निवडून आले कारण आपल्यातीलच काही फितूर त्यांना सामील झाले होते मराठा क्रांती मोर्चा पेक्षा त्या सरकार पक्षाला कसे यश मिळेल यावर ते जास्त व्यस्त होते कारण मराठा मोर्चा च्या नावाने काहींनी आधीच आपल्या झोळ्या भरून घेतल्या होत्या. त्या नंतर ६ मार्च च्या मोर्चा साठी काही हि नियोजन नसल्याने हा मोर्चा रद्द करावा लागला.

समाजात निस्वार्थ पणे काम करण्यार्या मराठा समन्वयकाना बदनाम करण्याचे एक मोठे षड्यंत्र काही मराठा समाजातील फितुरांनी मोठ्या प्रमाणात सुरु केले आणि त्या ज्या औरंगाबाद मधून हि क्रांतीची मशाल पेटवली होती तेच समाजासमोर बदनाम झाले कारण त्यांनी निस्वार्थ पणे हि चळवळ चालवली आणि त्यांना बदनाम करणारे हि मराठाच होते.

कारण सुरु झाला होता श्रेयवाद याचाच फायदा घेऊन सालाबाद प्रमाणे आपल्या संघटनेच्या नावाने आंदोलन करणार्यानि आपल्या आंदोलनाला “मराठा क्रांती मोर्चा चे नाव देऊन उघडा मोर्चा जाहीर केलात्या नंतर कोल्हापूर येथे “गोलमेज परिषद” आयोजित करण्यात आली होती आणि त्या मध्ये सर्व ज्या व्यक्तीने “चक्काजाम करून नये अशी जाहिरात्त दिली होती ती व्यक्ती त्या गोलमेज परिषद मध्ये भाषण करण्यासाठी आली होती हि तीच व्यक्ती होती ज्याने १५ जानेवारीला मोर्चा रद्द करण्यासाठी १५ मिनिटाचे भाषण केले होते आणि त्याच व्यक्तीने कोल्हापुरातील काही धनिक आणि राजकीय वरद हस्त असलेल्या लोकांच्या बळावर ४९ लाखाची जाहीरात देणून हे आंदोलन कसे शांत होईल या साठी मेहनत घेतली होती. त्यांना का आणि कोणी बोलावले हे आज पर्यंत माहिती नाही. तिथे हि असे ठरले कि आपण सर्वे एकत्र येऊन तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तर अशी मराठा समाजाची एक कमिटी बनवू आणि त्या मध्ये सर्वे मराठा समाजाला सामावून घेऊन सरकार वर दबाव टाकू पण तिथे हि तेच झाले आयोजकांनी आपल्याच माणसाची आपल्या संघटनातील पदाधिकार्याची नावे प्रथम टाकून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने हि संकल्पना रद्द झाली.

३० मे २०१७ ला एका संघटनेच्या काही लोकांनी मराठा क्रांती मोर्चा चे नाव लावून उघडा मोर्चा जाहीर केला आणि समाजात एक फार मोठा संभ्रम निर्माण केला त्यामुळे हा संभ्रम दूर करणयासाठी उघडा मोर्चा च्या आयोजकाशी अनेक वेळा अनेक जणांनी चर्चा केल्या पण त्या चर्चा मधून काही कि निष्पन्न झाले नाही उलटा अनेक मराठा लोकांनी त्वरित प्रसिद्धी मिळण्यासाठी या आदोलनाला मराठा क्रांती महामोर्चा नावाने प्रचार करण्यास सुरुवात केली त्या नंतर श्री. दिलीप पाटील, अॅड. संतोष सूर्यराव, रवींद्र काळे पाटील, आबासाहेव पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वे समन्वयकांशी संपर्क करून मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली ह्या बैठकीत समाजासाठी काम करण्यारे त्याच प्रमाणे अनेक जिल्हातील समन्वयक हजर होते त्या सर्वाचां एकमताने ९ ऑगस्ट हि तारीख जाहीर करण्यात आली.

त्या नंतर ठरल्याप्रमाणे कुठलेही कार्यक्रम आयोजित झाले नाही कारण मुंबई मध्ये असलेल्या आयोजकाचा श्रेयवाद उफाळून आला होता आणि त्या काही राजकीय वा सरकार चे जोडे उचलर्यांनी साथ दिली होती आणि एकत्र काम करणारे मराठे एकमेकाचे दुश्मन बनले होते. त्यातच ६ जून ला रायगडावर आयोजित कार्यक्रमाचा पूर्ण खेळखंडोबा करण्यात आला होता, त्या नंतर नाशिक येथे नियोजंनाची बैठक झाली त्या अनेक विषय मांडण्यात आले ते पुढील प्रमाणे होते १. निर्णायक मोर्चा च्या मागण्या ह्या ठोस मागण्या असाव्यात त्यात उपमागण्या वा ज्या मागण्या सहज मान्य होतील त्या मांडू नये. २. सर्वे मागण्या मराठा समाज यांच्याशी निगडीत असाव्यात ३. राज्यस्तरीय एक सुकाणू कमिटी जाहीर करण्यात यावी ३. मुंबई मोर्चा साठी सर्वे जिल्हातून समन्वयकानी एकत्र काम करावे ४. मराठा समाजातील वा जातीने मराठा असेलेल्या आमदार ना मराठा समाजाचे प्रश्न सरकार समोर मांडण्यासाठी दबाव निर्माण करावा ५. कुणी हि समाजाच्या वा क्रांती मोर्चाच्या नावाने पैसे गोळा करू नये ६, १३ जुलै ला कोपर्डी येथे नियोजन बैठक होणार आहे.

पण १३ जुलै ला कोपर्डी येथे ना नियोजन बैठक झाली ना श्रधांजली चा कार्यक्रम झाला फक्त मराठा समाजातील काही लोकांचा कलगीतुरा तू मोठा हि मी मोठा, मुंबई मध्ये मात्र जनजागृती साठी एक फार मोठा कॅन्डले मार्च झाला आणि मुंबई शहरातील मराठा समाज ह्या कार्यक्रमात हजर राहिला.

त्या नंतर मुंबई मध्ये कोण होणार आयोजक ह्या वरून काही मुंबई बाहेरील जिल्हातील मराठा आयोजकांनी वाद निर्माण करण्याचे सुरुवात केली त्याचे उदाहरण म्हणजे वसंतराव पाटील सभागृहात झालेली बैठक आणि त्याचा परिणामस्वरूप निस्वार्थपणे काम करणारे ह्या आयोजनातून बाहेर पडले वा त्यांनी आपल्या कडे घेतलेले कामावर लक्ष केंद्रित केले. त्यातील एक म्हणजे श्री. नानासाहेव कुटे पाटील ह्या मराठ्याने भरसभेत झालेल्या अपमानाचा बदला ना घेतां स्वताचा पैसा, वेळ आणि संघटना वापरून मुंबई मोर्चा साठी लागणारी पार्किग व्यवस्था साठी जीवाचे रान केले, मोर्चा पासून जवळच मोठ्या प्रमाणात कार पार्किंग ची सोय करून दिले त्याच प्रमाणे त्या पार्किंग साठी ५००+ जनाचे स्वयंसेवक दल बनविले आणि ९ ऑगस्ट ला शेवटची गाडी निघेपर्यंत त्याच पर्किग जागेतच ते थांबून राहिले.

९ ऑगस्ट च्या अगोदर मराठा समाजातील अनेक बैठका आणि मिटिंग मध्ये जाहीरीत्या सांगण्यात आले होते हि आचारसंहिते प्रमाणे राजकीय लोकां या नियोजनात आणू नये पण मुंबई मधील आयोजन करणार्या टीमचे पान पण राजकीय नेत्याशिवाय हलत नव्हते कारण त्यांनी आपल्या फायद्यासाठीच त्याना व्यासपीठावर अनेक वेळा आणले होते आणि त्यानी मदत तर केली नाही पण फक्त मोठ्या घोषणा करून आपले वर्चस्व त्या आयोजनात निर्माण केले आपल्या पुढच्या भविष्यातील फायद्यासाठी आयोजकांनी त्याना नेते म्हणून स्वीकारले आणि समाजाच्या भावना आणि मागण्या कडे कानाडोळा केला सर्वेच मराठा नेते असे नव्हते त्याला अपवाद होते ते फक्त ठाणेचे पालकमंत्री आमदार श्री. एकनाथ शिंदे यांनी कुठे हि पुढे न येता महाराष्ट्रातून आलेल्या समाज बांधावांसाठी नागरी सोई ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथे पुरविल्या त्याच प्रमाणे श्री. नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबई येथे आपल्या बांधवांसाठी फार मोठी पार्किग, जेवण, नास्त्ता याची व्यवस्था केली होती त्यावेळी सरकार पक्षातले अनेक मराठा आमदार अधिवेशन मध्ये व्यस्त होते.

३ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील अनेक मराठा संघटनेच्या पदाधिकारी यांनी एकत्र येऊन यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा आमदारांच्या बैठका आयोजित केल्या होत्या आणि त्यात असे मांडले होते कि आपण लोक प्रतिनिधी म्हुणून पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मुख्य मागण्या मांडाव्यात आणि तेथे आपल्या सर्वे मराठा आमदारांनी जाहीर पणे सागितले होते कि “तुम्ही मोर्चा करा आम्ही ८ आणि ९ ऑगस्टला अधिवेशनात चर्चा करू आणि समाजातील ज्या मुली व्यासपीठावरून भाषण करतात त्यांना न पाठविता आम्ही आपल्या सर्वे मागण्या मांडू आणि मुख्यमंत्री यांनी आधीच जाहीर केल्या प्रमाणे ते वा त्याच्या वतीने सरकारचे प्रतिनिघी मराठा समाजाला आझाद मैदान येथे सामोर जाऊन मान्य झालेल्या सर्वे मागण्याजाहीर करतील त्यामुळे मोठ्यासंख्नेने एकत्र आलेला समाज निराश होऊन परत जाणार नाही.” त्यानंतर सर्व मराठा आमदार आणि समाजातील मागण्या बाबत माहिती असलेले तज्ञ लोक ह्या मिटीग साठी बसतील आणि सरकार कडून ठोस निर्णय घेतल्या शिवाय हि शेवटची बैठक संपणार नाही असे ठरले होते.

त्यासाठी मराठा समाजाच्या मागण्याचे एक सुधारित मागण्याचे निवेदन या मराठा आमदारांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले होते. त्या मध्ये सर्वे मुख्य मागण्या होत्या त्याच प्रमाणे नागपूर मोर्चा नंतर सरकारने जाहीर केलेल्या मागणायावर सरकारने काय काम केले याचां हि पाठपुरावा करण्यात आला होता.

६ ऑगस्ट नंतर सरकार कडे महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात मराठा समाज मुंबई कडे येणार याची माहिती प्रशासनाकडे आली आणि आम्हाला हि ती मिळाली पण सरकारने याच माहितीचा वापर करून नवीन चाली खेळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या काही आयोजकांना हाताशी धरून मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयंत्न केला आणि आज सरकार त्यात यशस्वी झाले ८ ऑगस्ट संधयाकाळ पर्यंत सर्वे सुरळीत असतना रात्री ११ वाजता दादर येथील एका मोठ्या क्लब मध्ये सरकारप्रणीत आयोजकांनी एक मोठी बैठक आयोजित केली होती जेव्हा महाराष्ट्रातून आलेला बांधव मुंबई मध्ये आपण आणलेली चटणी भाकर खात होता तेव्हा याच क्लब मध्ये बसून मराठा समाजाचे स्वयंघोषित नेते मोर्चा कसा ढासलेल याच्या चर्चा करण्यात व्यस्त होता कारण ह्या चर्चे साठी आपल्या विचारसरणीच्या लोकांच बोलवण्यात आले होते. ह्या मिटिंग मध्ये अनेक गोष्ठी सरकारच्या फायद्यासाठी ठरविण्यात आल्या हि मिटिंग रात्री १.३० वाजे पर्यंत चालली आणि त्या नंतर काही स्वयंघोषित मराठा पुढारी मुंबई ( मंत्रालयाच्या दिशेने) रवाना झाले ते कोणाला भेटले आणि काय चर्चा झाली ते फक्त त्यांना माहीत आहे.

९ ऑगस्ट २०१७ ला मोर्चा भायखळा येथून निघणार होता हे माहित असताना हि सर्वे स्वयंघोषित नेते हे आझाद मैदान येथे आलेल्या पत्रकार यांच्या बरोबर व्यस्त होते आणि भायखळा येथे काही हि नियोजन मुंबई मधील आयोजकडून करण्यात आले नव्हते साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हि करण्यात आली नसल्याने रात्री पासून आलेल्या माता भगिनी आणि लहान मुलाचे हाल पाहवत नव्हते कारण सर्व आयोजक आझाद मैदानात व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेल्या नेते मंडळीची सेवा करण्यात व्यस्त होते .. प्रश्न असा आहे कि ज्यांनी जाहीर केले होते आम्ही चर्चा करु तुम्ही मोर्चा करा तेच नेते मस्त सावली खाली बसून आयोजकांनी पुरविल्या सोई चा लाभ घेत होते आणि महाराष्ट्रातून आलेले आमचे बांधव उन्हात बसून काही तरी मिळेल याची वाट पहात होते. ज्या वेळी आम्ही मोर्चा बरोबर आझाद मैदान येथे पोहोचलो त्या वेळी समजले कि रात्री झालेल्या बैठकीत वेगळे निर्णय घेण्यात आले आहे आणि मराठा समाजा तर्फे मुली ह्या मागण्या सरकार कडे मागणार आहेत आणि जे शिष्ठमंडल जाणार आहे ते आधीच ठरले आहे आणि त्यां नंतर स्टेज च्या मागे मंत्रालयात जाण्यासाठी मोठी चढाओढ पाहण्यास मिळाली काही महाभाग तर आघीच मंत्रालयात पोहचले होते…

त्या नतर पुढे काय झाले ते आपण आझाद मैदान पहिले आणि मंत्रालयात काय झाले ते अजून माहिती नाही ते जाणारे ४२ जण कोण होते कोणत्या विषयात तज्ञ होते त्यांनी काय मत मांडले याचा उलगडा अजून बाकी आहे.

सरकारने नागपूर मोर्चा ला जी गाजरे दिली होती त्याचा हलवा मुंबई मोर्चा मध्ये दिला ,,,

आपल्या मुख्य मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि होतील कि नाही हे हि माहिती नाही …

अश्या रीतीने हि चळवळ संपली आता फक्त …इतिहास मराठे युद्धात जिंकतात तहात हरतात ….

एक मराठा आता एकच मराठा
मराठा क्रांती मोर्चा संपला कि संपवला
मराठा क्रांती मोर्चा च्या मागण्या काय होत्या
मराठा क्रांती मोर्चा चे शिष्टमंडळ कधी ठरले
समाजाला काय मिळाले
आता पुढे काय…….?????

आबासाहेब पाटील पुणे

1 comment

 1. आबासाहेब ,
  जय हिंद -जय मराठा ,
  जय जिजाऊ जय शिवराय
  आपला लेख वाचला आणि आमच्या मनात मोर्चा संपला त्याच वेळी हेसार लक्षात आल .अवग्या दहा मिनटाच्या आत नराहववल्याने
  ‘महाराज घात झाला’नावाने थोडक्यात मनाती खदखद ऊदयन महाराजांच्या सलग्न फे.बुक वर व्यक्त केली. हो तुम्ही म्हनाल त्त्यांनाच का तर ताकाला जाऊन गाडगे का लपवायचे मी माझे आयुष्यात दोनच व्यक्ती चा फँन आहे.ऐक हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब यांचा आणि शिवप्रभुंचे वारस हाच चष्मा लावुन ऊदयन राजेसाहेब यांचेकडे पहातो दुनया कोणी काही बोबलुदेत सातार शिवगादी मराठ्यानसह तमाम शिवमावळ्यांचे वारसांनसाठी काशीसमान आहे.
  आणि त्या गादीचे वारस म्हणून आमच्या साठी वंदनिय आहेत.बरे आसो,
  मुळ मुध्द्याकडे-सद्याची मराठा क्रांती मोर्चा ची वाटचाल पहाता आता मोर्चा मुक मोर्चा महामोर्चा ह्याने मराठ्याचे पदरात विशेष काही पडेल आसे वाटत नाही .त्यामुळे मोर्चा वगैरे आता बास झाले.मराठा कार्यकर्त्यांना विनंती की आप आपल्या जिल्ह्यातील मराठ्याचे मजबुत संगठन करावे प्रत्येक जिल्ह्यातील ऐक समिती नेमावी त्याचेवर ऐक सेनापती नेतृत्व करील आणि महाराष्ट्रातील र्सव सेनापती चीमिळुन ऐकसुकानु समिती आसावी यासमितिने प्रमुख पदासाठी आपसी मतभेद टाळण्यासाठी तमाम शिवमावळ्यांचे मध्यवर्ती नेतृत्व सरसेनापती म्हणून नेर्तुत्व करन्याची आणि आपन सर्व जन भगव्या झेड्या खाली “मराठा क्रांती सेना”
  नावाचा पक्ष स्थापना करुन माहारास्ट्रात राजकीय दवावगट तयार केले शिवाय तुमची कोणी दखल घेनार नाही हेमाञ तितके च खरे .हे सांगने साठी कोणत्याही जोतिषाची गरज नलगे.
  मराठा तितुका(शिवकालिन मावळे त्यांचे वंशज)मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
  जय जिजाऊ जय शिवराय
  जय हिंद जरा मराठा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *