बैलपोळा कृषी संस्कुतीमधील महत्वाचा सण संपूर्ण माहिती….

उद्या बैलपोळा आहे,
आपल्या महाराष्ट्रा चा एक मोठा आणि खास सन. आपल्या शेतकऱ्यांचा सन. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गळणार्या बैलाचा सन. थोडीशी माहिती पोल्याबद्दल माज्या परीने. कुठे काही चुकले तर क्षमा करा व तुम्हाला काही माहिती असेल तर ती हि सुचवा.

हा सन विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची पूजा करतो.#पोळा हा श्रावण महिन्यातील पितोरी अमावास्येला येतो, इंग्रजी महिन्यांनुसार हा सन ऑगस्ट महिन्यात येतो.

या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते.त्यांच्या खाँध्याना तुपाने शेकून काढतात(पण आजकाल महागाई मुळे तेलाने शेकतात ) व त्यांना शाल झालरींनी सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंगवले जाते, गळ्यात हार घातले जातात. व शेतकऱ्यांची बायको त्यांची पूजा करते.

संध्याकाळच्या वेळी सजवलेल्या बैलांची ढोल तशान्सोबत मिरवणूक काढली जाते, यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर भांध्लेला असतो व तो ओढीचा असतो, त्याच्या पाठोपाठ इतर बैलांना सुद्धा हे करावे लागते. मग सर्व बैल ओळीने उभे केले जातात. यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते. काही गावांमध्ये तर जत्रा भरवली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात.

बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/ श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात.असा हा पोळ्याचा सण आहे.या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकल्या जाते. त्यांचे पाठीवर नक्षिकाम केलेली झुल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार) गळ्यात कवड्या वघुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य.

बैलाची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.संध्याकाळच्या वेळी सजवलेल्या बैलांची ढोल तशान्सोबत मिरवणूक काढली जाते, यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर भांध्लेला असतो व तो ओढीचा असतो, त्याच्या पाठोपाठ इतर बैलांना सुद्धा हे करावे लागते. मग सर्व बैल ओळीने उभे केले जातात. यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते. काही गावांमध्ये तर जत्रा भरवली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात.

पोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सन आहे. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व ५ भाज्यांची भाजी केली जाते. अशीच आपली संस्कृती उप्जावून ठेवूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया

पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *