नारायण राणे यांचा जीवनप्रवास नक्की वाचा…

नारायण तातू राणे
कोकणातील राजकारणास उंचीवर नेणारा नेता…

जन्म १० एप्रिल १९५२ सुभाष नगर येथील चाळीत राहणारे एक गरीब कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा लांबचा टप्पा गाठणारा नेता म्हणजे नारायण राणे…

राजकारणात येण्या अगोदर नारायण राणे यांनी मित्रा सोबत सुभाष नगर येथे मित्रा सोबत चिकन शॉप सुरु केले होते.
१९६० साली हर्या नार्या टोळीची दहशत होती या टोळी सोबत रानेचे संबंध आले आणि त्याचे नाव सगळीकडे पोहचले. हर्या नार्या जिंदाबाद या नावाने एक चित्रपट सुध्दा त्या काळात येऊन गेला. याच काळात नारायण राणे यांच्या नावाने खुनाचा गुन्हा देखील घटाला पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा देखील नोंद झाला होता.

पोलीस रेकॉर्ड नुसार वयाच्या १४ व्या वर्षी ह्यांनी हि टोळीचे सदस्य झाले. माधव ठाकूर व राणे यांचा वाद या काळात बराच गाजला.
वयाच्या २० व्या वर्षी राणे यांचे संबध शिवसेने सोबत आले , चेंबूर येथे शाखा प्रमुख पद राणेंना देण्यात आले.
कोपरगावचे नगरसेवक हि त्याची पहिली निवडणूक व ते यशस्वी झाले व त्यांनतर त्यांनी मागे वळून पहिले नाही.

१९९६ शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
१९९९ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच राणेना काही महिन्या करिता मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळाली.
उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदाची चर्चा सुरु झाल्यानंतर राणेचे शिवसेनेत खटके उडायला सुरवात झाली.

३ जुलै २००५ ला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली परंतु शिवसेनेतून जाताना राणे अनेक समर्थक घेऊन कॉंग्रेस मध्ये गेले.
शिवसेने सोबत वाद असून राणे हे बाळासाहेबांबद्दल खूप आदर ठेवतात , ते म्हणतात “नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे”

युती सरकारच्या काळात राणे यांना BEST चे चेअरमन पद देण्यात आले या काळात कोकणातील अनेक लोकांना बेस्ट मधे काम करायला मिळाले.
बेस्ट मध्ये किती चेअरमन होऊन गेले मला माहित नाही. पण मुंबईत बेस्ट चेअरमन म्हणून कुणाची कारकीर्द सर्वात लक्षात राहिल तर नारायण राणेंची

कॉंग्रेस मध्ये त्यांना महसूल मंत्री पद देण्यात आले व त्याच कॉंग्रेस मध्ये राणेवर २००८ साली पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा ठपकाहि लावण्यात आला.

८ ऑक्टोबर २००८ साली नारायण राणे यांनी प्रहार नावाचे वृत्तपत्र सुरु केले.

२००९ साली त्यांनी परत महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
नारायण राणे यांची दोन मुले नितेश व निलेश हे दोघेही राजकीय कारकीर्द जोरात गाजवत आहे.

सध्या त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे त्याचे नाव परत चर्चेत आले. नारायण राणे कुठेही असो पण त्याच्या लढाऊ वृत्तीस खासरे तर्फे सलाम….

contact us
info@KhaasRe.com

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *