रायगड अपरिचित अलिखित गोष्टी..

किल्ले रायगडाचे संवर्धनाचे काम करत असलेली “रायगड संवर्धन मोहिम”
संवर्धनासोबत संशोधनाच्या कार्यात ही अग्रेसर असलेली “रायगड संवर्धन मोहिम”

या वेळी आपल्या समोर “किल्ले रायगड” वरील काही अपरिचित व् अलिखीत गोष्टी आपल्या समोर मांडत आहोत…

“रायगड संवर्धन मोहिम” किल्ले रायगडावरील बांधकामाच्या अभ्यास करत असताना काही महत्वाच्या गोष्ट दिसून आल्या त्या पैकी एक…..
होळीच्या माळावर असलेला एक चौथरा , ज्याला आपण शिरकाई देवीचा घरटा म्हणून ओळखतो, तसेच पुरातत्व खात्याचे ऑफिस म्हणजेच हत्तीखान्याच्या बाहेर आणि बालेकिल्ल्यातल्या टांकसाळाच्या बाहेरील पाण्याच्या टाकी वरील एका दगडावर विशिष्ट प्रकारचे एक सारखे खड्डे दिसले. ते काय असावेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.

हे खड्डे एका रेषेत 8, त्या खाली समांतर रेषेत 8 असे कोरलेले आहेत. याचा अभ्यास केला असता हे 8 वसु आणि 8 *दिकपाल आणि दोन बाजूचे 2 खड्डे आहेत ते सूर्य आणि चंद्राची जागा दर्शवतात. असे मार्क्स जगात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. हे मार्क्स प्रागैतिहासिक कालखंडातील असून त्याला “कपमार्क्स” (cup marks) म्हणून देखील ओळखले जाते.

स्कॉटलंड , फिनलँड, स्पेन, पोर्तुगाल अशा अनेक ठिकाणी याचा उल्लेख दिसतो. स्कॉटलंड येथील अभ्यासकांच्या मते हे दगड स्मारक किंवा महत्वाच्या दिशा दर्शवण्यासाठी वापरत असावे तर काही अभ्यासकांच्या मते हे सुर्योपासनेशी निगडित असावे.

भारतात असे मार्क्स बऱ्याच ठिकाणी मिळाले असून इथे अभ्यासक त्यांना वसू आणि दिक्पाल असे म्हणतात.
वसु व् दिक्पाल या बद्दल थोडक्यात माहिती

वसु
वसु ला मार्कंडी असेही म्हणतात. “वसु” म्हणजे एक प्रकारचा नंदी असे म्हंटले जाते. उत्तरेकडील काही मंदिरात वसुची उभी मूर्ती आढळते त्यांच्या डाव्या हातात पोथी, कमंडलू , तर उजव्या हाती स्तुक व अक्षरमाला ही असते. करद मुकूट माथ्यावर लहान कान व आखुड शिंगे असे त्याचे स्वरुप असते हे एकूण आठ असतात म्हणून त्यांना “अष्टवसु” असे म्हणतात.

दिक्पाल
दिशाच्या अधिपतिला “दिक्पाल” असे म्हणतात त्या प्रमाणे आठ दिशांचे आठ दिक्पाल असतात ते खालील प्रमाणे
पूर्व – इंद्र ,आग्नेय -अग्नी, दक्षिण – यम,नैऋत्य – निऋति, पश्चिम – वरुण, वायव्य – वायु, उत्तर – कुबेर, ईशान्य – ईश्वर

निऋति आणि कुबेर जरी राक्षस असेल तरी यांना काही कालावधी नंतर देवता म्हणून स्थान देण्यात आले. असे या खुणा ( कपमार्क्स) यादव कालीन बांधकामात, यादवकालीन नगर रचनेत व त्या कालीन मंदिरामध्ये, महालामध्ये, गुहांमध्ये पाहावयास मिळते.

आठ वसु, आठ दिक्पाल, चंद्र व् सूर्य असे हे एकुण १८ कपमार्क्स कोरलेले दगड़, आपणास होळीच्या माळावर असलेला एक चौथरा( शिरकाई देवीचा घरटा) , तसेच पुरातत्व खात्याचे ऑफिसच्या (हत्तीखाना) बाहेर आणि बालेकिल्ल्यातल्या टांकसाळाच्या बाहेरील पाण्याच्या टाकी वरील एका दगडावर आहेत, पण काही ठिकाणी या कपमार्क्स ची संख्या बदलेली दिसते.
जसे की महाराजांचे रहायचे दालन राणीवस्या कडून आपण छोट्या दरवाज्यातून आत सदरे कडे प्रवेश करतो तेथील चवथरा त्याच्या उजव्या बाजुला एक छोटी भिंत दिसते त्या वर ही असे मार्क दिसतात , तसेच शिरकाई देवीच्या मंदीरा बाहेर ही एका दगडावर असे मार्क दिसतात तसेच मेना दरवाज्या मधे रोप वे च्या बाजूने प्रवेश करताना आपण ज्या जुन्या पायऱ्या आहेत तेथेही असे मार्क आहेत या मार्क चे महत्व आणि त्याची जागा लक्षात घेण्या साठी गडावरील एका मोठ्या वास्तु वरील कप मार्क सविस्तर माहिती देत आहोत किल्ले रायगडावरील कचेऱ्या ज्याला आपण “बाजारपेठ” म्हणतो,

होळीच्या माळा कडून आपण कचेऱ्यांकडे(बाजारपेठे) चालत जात असताना, उजव्या बाजुच्या पहिल्या कचेरीत (बाजार पेठेतील गाळ्यात) प्रवेश केल्यावर उजव्या बाजुच्या दगडावर १३ कप मार्क कोरलेले दिसतात, तसेच डाव्या बाजुच्या पहिल्या कचेरीत पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजुच्या दगडावर १८ मार्क दिसतात. या नंतर उजव्या बाजुच्या सर्वात शेवटच्या कचेरीत १४ कपमार्क दिसतात, काही मार्क स्पष्ट दिसत नाहीत, कारण तेथील दगड उन-पावसाच्या माऱ्याने थोड़ा खराब झालेला आहे, तसेच डाव्या बाजुच्या सर्वात शेवटच्या म्हणजे अर्धी पडलेली कचेरी जिचा थोड़ा भाग अस्तित्वात आहे, पण प्रवेश करण्यासाठी पायऱ्या नाहीत, तिथे १२ कपमार्क स्पष्ट दिसतात.

या पूर्ण कचेऱ्यामध्ये(बाजारपेठे मध्ये) दोन्ही बाजुतील पहिल्या आणि शेवटच्या कचेरीमध्ये (गाळ्यात) हे कपमार्क दिसून येतात. या कपमार्क ची संख्या जरी कमी जास्त असली तरी त्यांची जागा ही महत्वाची आणि काहीतरी महत्वाचा संकेत करणारी दिसून येते ,असे हे कपमार्क किल्ले रायगडाच्या संशोधनात भर घालणारे आहेत.

हे असे संशोधनाचे तसेच संवर्धनाचे काम मोहीम या पुढेही करत राहील आणि
किल्ले रायगड व त्यातील बारीक बारीक़ गोष्टी आपल्या समोर मांडत राहीन.

या साठी आम्हाला कार्यक्षम अभ्यासू युवक आणि युवतींची साथ मोलाची आहे

रायगड संवर्धन मोहीम
जय शिवराय
इंकलाब जिंदाबाद

मोहिमेचा संपर्क क्र
8007464599
फेसबुक पेज लिंक

रायगड संवर्धन मोहिम

1 comment

  1. हे काम खरेतर खूप अवघड आहे परंतु ते महत्वाचे आहे ही माहिती आमच्यापर्यंत पोहचवून तुम्ही फार मोलाची कामगिरी बजावली आहे धन्यवाद

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *