स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी आर. आर. पाटील (आबा)

आर.आर. पाटील आबा म्हणजे राजकारणातील एक ग्रामीण भागातील चेहरा महत्वाचे म्हणजे एक स्वच्छ प्रतिमेचा व तळागाळातुन आलेला चेहरा म्हणजे आबा…

लोक प्रेमाने त्यांना आबा म्हनत, त्याचे पुर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील यांचा जन्म १६ आॅगस्ट १९५७ अजनी,ता.तासगाव जि. सांगली महाराष्ट्र

घरची परिस्थीती बेताची होती त्यामुळे आबांनी त्याचे शिक्षण कमवा आणि शिका या योजनेखाली शांतिनिकेतन महाविद्यालय सांगली येथे पुर्ण केले.

शाळकरी वयात आबांना प्राचार्य पी बी पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

शांतिनिकेतन महाविद्यालयातुन बि.ए. झाले पुढे त्यांनी एल.एल.बी. पुर्ण केले.

राजकीय पाश्र्वभुमि नसताना त्याची भाषण शैली, प्रश्न सोडवण्याची पध्दत व स्वच्छ प्रतिमा हे गुण वसंतदादा पाटलांनी हेरले व त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली.

१९७९ ते १९९० सावळज गणातुन जिल्हा परीषद सदस्य होते.

त्यानंतर तासगाव मतदारसंघातुन १९९०,१९९५,१९९९,२००४,२००५ व २०१४ सलग ६ पंचवार्षिक आमदार म्हनुन नेतृत्व केले.

१९९० व १९९५ साली काॅग्रेस पक्षाच्या तिकीटावर आबा निवडुन आले त्यानंतर शरद पवार साहेबा सोबत आबांनी काॅग्रेस सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सुरवातीला तासगाव व नंतर कवठेमहांकाळ मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले.

आमदारकी सोबत त्यांनी मंत्रीपदाचा कार्यकाळही सांभाळला.

सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जवाबदारी देण्यात आली या काळात गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियाण यशस्विपणे राबवुन त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा राज्यात निर्माण केला.

१ नोव्हेंबर २००४ ला महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. महाराष्ट्र राज्याचे सर्वाेत्कृष्ट गृहमंत्री म्हनुन आजही त्यांचे नाव घेण्यात येते.

गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार स्विकारल्या नंतर आज पर्यत सर्वाधिक नक्सली आत्मसमर्पण आबांच्या काळात झाले.

डान्सबार बंदिचा निर्णय घेऊन त्यांनी अनेक संसार उध्वस्त होण्यापासुन वाचविले. निर्णयाला भयंकर विरोध होऊनही आबा ठाम राहीले.

घरात सत्ता आलेकी नातेवाईकांना सुध्दा गुर्मि येते परंतु आबांचे कुटूंब अतिशय साधे पत्नि सुमन,मुलगा रोहीत,मुलगी स्मिता व आई भगिरथी हे आजही एकदम साधे आयुष्य जगतात.

आबांच्या मुलांनी जिल्हा परीषद शाळेत शिक्षण पुर्ण केले व आबाची आई ,पत्नि ते मंत्रि असताना सुध्दा शेतीत काम करायच्या..

आबा म्हणजे यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाचील,शरद पवार यांच्या विचारांनी भरलेला एक युवा पिढीचा प्रतिनिधीच होते.

त्याच्या कडुन महाराष्ट्राला अनेक अपेक्षा होत्या परंतु कैन्सर मुळे १६ फेब्रुवारी २०१५ ला आबांची प्राणज्योत मालवली.

अनेक जानकार सांगतात आबांना कर्करोगांची चाहुल लागली होती परंतु त्यांनी कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष केले…

आबाचा कधिही आबासाहेब नाही झाला यावरुन त्यांचा स्वभाव आपल्या ध्यानात येईल.

आबाला खासरे तर्फे सलाम…..

विलासराव देशमुख अपरिचीत क्लिक करा..

बच्चु कडू अपरिचीत क्लिक करा..

4 comments

  1. स्व.आबा हे साधी राहणी उच्च विचार सरनीचे व्यक्ती होते मी स्व.पंतप्रधाण लाल बहादूर शास्त्री यांना बघीतले नाही पंरतु मला आबासाहेब सोबत मुंबई /दिल्ली /भोकरदन जिल्हा जालना येथे त्यांना भेटण्याचा योग आला होता त्यावेळी आबा मला लाल बहादूर शास्त्री सारखे वाटले मला आज ही आठवते दिल्लीत निवांत अशी आबासाहेब यांची माझ्या पुर्व पुण्याने भेट घेतली अत्यंत साधे कपडे एका साध्या खुर्चीवर बसले होते मला अगदी जवळ बसविले तो क्षण माझ्या जीवनातील फार भाग्याचा होता हे मी कधी ही विसरून शकणार नाही

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *