गोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा…

ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दगावलेल्या संख्या ६३ वर पोहोचली आहे. यात ३०हून अधिक मुलांचा समावेश आहे. आज, शनिवारी सकाळी एका अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूज्वर झाल्याने मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यातच मृत्यू झालेल्या मुलांपैकी ३४ नवजात बालकांना नामकरणाआधीच मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे धक्कादाय वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मुलांच्या जन्माचा आनंद साजरा करण्याआधीच त्यांच्या मृत्यूचे शोक करण्याची वेळ त्यांच्या आईवडलांवर आली आहे.

सरकारतर्फे सुरवातीला या घटनेचा नकार दिल्या नंतर मृताच आकडा ३० वर पोहचला त्या नंतर,
गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी या दुर्घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, बीआरडी हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्याने ऑक्सिजन अभावी मुलांचा मृत्यू झाला आहे.

हॉस्पिटलने ६९ लाख रुपये न भरले गेल्याने ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या एका कंपनीने हॉस्पिटलचा पुरवठा बंद केला होता. या कंपनीने गुरुवारी सायंकाळीच पुरवठा बंद केला होता. बीआरडी हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट बसवण्यात आला होता. याद्वारे एन्सेफलायटिस वॉर्डसह शेकडो रुग्णांना ऑक्सिजन दिला जात होता.

परंतु ऑक्सिजन पुरवठा करणारी कंपनी पुष्पा गैस एजन्सीने या गोष्टीचा साफ इंकार केला आहे. कंपनीच्या एच आर मिनू वालिया “मुलांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला नाही, आम्हाला याचे गंभीर परिणाम समजतात कोणीही असा पुरवठा अचानक बंद करणार नाही ”

प्रशासनास थकीत रक्कमे बद्दल अनेक वेळा संपर्क करून हि त्यांच्या कडून कुठलीही प्रतिक्रिया आम्हाला मिळाली नाही. असे मिनू वालिया कडून सांगण्यात आले.

मीनु वालीयाच्या या व्यक्तावयामुळे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित राहत आहे. योगी सरकारचा कारभारावर अनेक लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. कंपनी सोबत झालेल्या करारामध्ये नमूद केलेले आहे कि दहा लाखाच्या वर थकीत रक्कम कधीही राहणार नाही मग ती ६९ लाख रुपयावर कशी पोहचली ?

 

गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत ३0 नव्हे, तर पाच दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

मिनू वालीयाची मुलाखत आपण बघू शकता…

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *