नागराजच्या आगामी चित्रपटात अमिताभ करणार ह्या मराठी माणसाची भूमिका…

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता नागराज मंजुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या सर्वोच्च नाव, त्याने २ दिवसा अगोदर पोस्ट केली ती खालील प्रमाणे,

आता आपल्याला उस्तुकता लागली कि मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मधील दोन मोठे चेहरे एकत्र येत आहे. नागराज सुध्दा हिंदी मध्ये सिनेमा करतोय आणि सोबत अमिताभ काय असेल याची कथा ?

KhaasRe.Com आपल्या करिता हा खुलासा घेऊन येत आहे. या शतकातील महानायक साकारणार आहे एका मराठी माणसाची सत्य कथा.

कथा आहे नागपूरच्या विजय बोरसे यांची एक सेवानिवृत्त शिक्षक ज्याने झोपडपट्टी फूटबॉल हा विषय सर्वा समोर आणला आणि झोपडपट्टी मधील व्यसनाच्या आहारी गेलेले, वाम मार्गाला लागलेल्या मुलांना बदलवायचा चंगच बांधला मदतीला फक्त फूटबॉल…

आज पर्यंत विजय बोरसे यांनी १०,००० मुलांना मार्गदर्शन केले आहे. त्याचे बरेच मुले रेल्वे,पोलीस,सरकारी कार्यलय,बैंक इत्यादी ठिकाणी कार्यरत आहे.

या चित्रपटाचे नाव असणार झुंड

मुंबई व प्रदेशात या चित्रपटाचे चित्रीकरण होईल. ४० दिवसात संपूर्ण चित्रीकरण पूर्ण करणार आहे असे आमच्या सूत्राकडून कळले आहे.

आहेन खासरे कथा ! नागराज आणि बोरसे यांची भेट पुणे मध्ये झाली व त्यांनी ह्या कथेला खो दिला आहे. अमिताभ हि तयार आहे. आता वाट फक्त सिनेमा पडद्यावर येण्याची.

झोपडपट्टी फूटबॉल चा उपयोग विजय सरांनी व्यसन,स्वच्छता,आयुष्यातील कौशल्य, स्त्री पुरुष समानता, शिक्षण इत्यादी क्षेत्रात मुलांना मदत करण्या करिता केला आहे.

आमच्या सूत्राकडून आम्हाला कळले आहे कि नागराजने या चित्रपटाच्या कथानकावर दीड वर्ष मेहनत घेतली व नंतर अमिताभ कडे गेला व अमिताभ तयार झाले.

अमिताभ बच्चनने या आदीही नागराजची सैराट च्या वेळेस स्तुती केली आहे.

या महान कलाकाराने नागराजला सैराट सिनेमा बघितल्या वर त्याला स्वतः पाठवून स्तुती केली.

नागराजचा पहिला हिंदी सिनेमा व त्याने या अगोदर बनविलेले चित्रपट यापेक्षा हा विषय वेगळा आहे म्हणून सर्वाना ह्या चित्रपटाची उस्तुकता राहील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *