१९९५ च्या विधानसभा निवडणूक कशी झाली आणि जागांची स्थिती काय होती नक्की बघा..

भाजप-शिवसेनेचे १९९५ मध्ये सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळीची स्थिती काय होती. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. हे आज आपल्या आठवत नाही. या जागांच्या आधारावर शिवसेेनेचा मुख्यमंत्री करण्यात आला होता.

१९९५ मध्ये घेण्यात आलेल्या हि विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. पहिला टप्पा १२ फेब्रुवरी १९९५ आणि दुसरा टप्पा हा ९ मार्च १९९५ घेण्यात आला. या निवडणुकीचा निकाल १३ मार्च १९९५ला जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत सर्वाधिक जागा कॉंग्रेस ला मिळाल्या होत्या.

खालील प्रमाणे निवडणुकीचे निकाल लागले होते. कॉंग्रेस ८० जागा, शिवसेना ७३ जागा, बीजेपी ६५ जागा, जनता दल ११ जागा, शेकाप ६ जागा, माकप ३ , समाजवादी पार्टी ३ जागा, विदर्भ आंदोलन समिती १ जागा,महाराष्ट्र विकास कॉंग्रेस १ जागा आणि अपक्ष ४५ आमदार या निवडणुकीत निवडून आले होते.

या निवडणुकीत काँग्रेस हा ८० जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष होता. पण भाजप सेना एकत्र लढल्यामुळे सेनेला ७३ आणि भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांची संख्या १३८ होती. त्यांना काही अपक्षांनी पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद, भाजपला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद देण्यात आले होते.

Loading...

हर्षवर्धन पाटील १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या गणपतराव पाटील यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवून पहिल्यांदा आमदार म्हणुन निवडून आले. त्यावेळी १७ अपक्ष आमदारांची मोट बांधुन त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला. मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्य ते कृषी, जलसंधारण व फलोत्पादन राज्यमंत्री झाले होते.

या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तर भाजपाच्या वतीने उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन आदी दिग्गज नेते उतरले होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *