Mg id top
Loading...

टिकटॉकवर होते १२ लाख फॉलोअर, व्हिडीओ मधून महिन्याला कमवायची १.५० लाख पण..

टिकटॉक स्टार असलेल्या सिया कक्करने या जगाचा अचानक निरोप घेतल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या चाहत्यांनी अत्यंत भावूक होऊन सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रत्येक वयोगटात तिचे चाहते होते. तिने खूप कमी वयात टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्धीचे टोक गाठले होते.

सियाला टिकटॉकवर ११ लाख तर जवळपास १ लाख लोक इंस्टाग्रामवर फॉलो करायचे. अवघ्या १६ वर्षाच्या सियाने आपल्या पूर्व दिल्लीतल्या गीता कॉलनीतल्या घरी आपले जीवन संपवले. १६ वर्षाची सिया टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली होती. लोकप्रियतेच्या बाबतीत तिने अनेक जणींना अल्पावधीतीच मग टाकले होते.

Loading...

सोशल मीडियावर लाखो चाहते असलेली सिया महिन्याला दीड लाख रुपये कमवायची. एवढ्या कमी वयात टिकटॉक सारख्या माध्यमाचा वापर करून एवढी मोठं रक्कम कमावणे सोपी गोष्ट नाहीये. यावरून कळते कि तिने सोशल मीडियावर कशाप्रकारे आपले स्थान निर्माण केले होते.

सियाच्या व्हिडिओला असायचा प्रचंड प्रतिसाद-

सियाच्या कक्करचे चाहते तिच्या नवीन व्हिडिओची आतुरतेने वाट बघायचे. एवढी प्रसिद्धी मिळाली असताना एवढ्या कमी वयात सियाने आ त्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

१२ विच्या वर्गात घेत होती शिक्षण-

सिया कक्कर १२ वीचे शिक्षण घेत होती. तिच्या मित्रपरिवारात देखील ती खूप आवडती होती. शाळेत देखील तिला प्रत्येक जण ओळखायचा. सिया कक्करच्या मॅनेजर अर्जुन सरनच्या मते सियाच काम खूप चांगल्या प्रकारे चालू होतं. त्यामुळे तिने उचललेले पाऊल हे एखाद्या वयक्तिक गोष्टीमुळे असू शकते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *