रजनीकांतला भिकारी समजून एका मुलगीने दिली भिख, त्यानंतर जे घडले ते पाहून थक्कच व्हाल तुम्ही… 0

काही दिवसांपूर्वी रजनीकांत चेन्नईतील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर मंदिराजवळच विश्रांती घेण्यासाठी ते बसले होते. त्यादरम्यान, एक तरुणी तेथून जात असताना तिने रजनीकांत यांना भिकारी समजून 10 रुपयांची नोट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रजनीकांत यांनी एकही शब्द न बोलता हसतमुखाने ती नोट स्विकारली.
नोट घेतल्यानंतर रजनीकांत आपल्या गाडीकडे गेले असता, तरुणीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिच्या लक्षात आले की, ही व्यक्ती कोणी भिकारी नसून सुपरस्टार रजनीकांत आहेत. तरुणीने थेट गाडीकडे धाव घेत रजनीकांत यांची माफी मागितली.

रजनीकांत यांनी दिलेले उत्तर ऐकल्यावर हा माणूस एवढा मोठा सुपरस्टार का आहे हे कळते. “जे काही झाले चांगलेच झाले. कारण, देव मला आपल्याकडून वेळोवेळी हेच सांगत आहे की, आपले पाय नेहमीच जमिनीवर असले पाहिजेत. माझी खरी ओळख ही सुपस्टार नाही, तर सामान्य माणसासारखीच आहे”, असे उत्तर देऊन रजनीकांत निघून गेले. ही माहिती खुद्द त्या तरुणीने दिली असून तिचे नाव डॉ. गायत्री आहे. तिने लिहिलेल्या द नेम इज रजनीकांत या पुस्तकात या संदर्भाचा उल्लेख केला आहे.

Comments

comments

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या 12 देशांशी तुलना केल्यानंतर तुम्हाला नाही वाटणार भारतीय रुपयाची किंमत कमी. 0

Nepal Currency

बरेच वेळा लोकं तक्रार करतात की, परदेशात जाणे फार महाग आहे. एक तर दुसऱ्या देशातील तिकिटाचे दर आणि दुसऱ्या देशांचे चलन हे भारतीय रुपयांपेक्षा बरेच महाग आहेत. पण आपण आता जाणून घेणार आहोत काही अशा देशांबद्दल जिथे भारतीय रुपयाची किंमत खूप जास्त आहे. या देताहेत गेल्यानंतर खिशात थोडे पैसे असले तरी तुम्हाला श्रीमंत असल्याचा फील येईल.

1. पाकिस्तान-

Pakistan

पाकिस्तानी रुपया हे पाकिस्तान चे अधिकृत चलन आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान पाकिस्तानी रुपया वर नियंत्रण ठेवते. भारतीय 1 रुपयाची किंमत पाकिस्तानी रुपयाच्या 1.58 रुपयाच्या बरोबर आहे.

2. नेपाळ-

Nepal currency

नेपाळचे चलन नेपाळीज रुपया या नावाने ओळखले जाते. नेपाळ राष्ट्र बँक नेपाळच्या चलनावर नियंत्रण ठेवते. नेपाळीज रुपया 1932 साली मार्केटमध्ये आला. त्या अगोदर नेपाळीज मोहर हे नेपाळ देशाचे चलन होते. 1.66 नेपाळीज रुपया ची किंमत भारताच्या 1 रुपयाच्या बरोबर आहे.

3 श्रीलंका-

Shri lanka currency

सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका श्रीलंकन चलनावर नियंत्रण ठेवते. भारतीय रुपयाला श्रीलंकेत दुप्पट किंमत आहे. तुम्ही श्रीलंकेत 10000 रुपये घेऊन गेलात तर त्याची किंमत श्रीलंकेत 20160 रुपये आहे. म्हणजेच भारतीय 1 रुपयाची किंमत श्रीलंकेच्या 2.08 रुपये इतकी आहे.

4. आईसलँड-

iceland currency

आईसलँडचे चलन आईसलँडिक कोरोना म्हणून ओळखले जाते. स्वतःचे चलन आणि नियंत्रण पॉलीसी असणारा आईसलँड हा सर्वात छोटा देश आहे. भारतीय 1 रुपयाचे मूल्य आईसलँड मध्ये 2.13 आईसलँडिक कोरोना आहे.

5. हंगेरी-

hungarian-forints

हंगेरीचे चलन हंगेरीअन फॉरींट या नावाने ओळखले जाते. हंगेरीचे चलन 100 फिलर मध्ये डिव्हाईड केलेले आहे. भारतीय 1 रुपयाचे हंगेरीअन मूल्य 4.22 फॉरींट आहे.

6. कॉस्टारिका-

costa-rican-colon

कॉस्टारिकन कोलोन कॉस्टारिका चे चलन आहे. कॉस्टारिका मध्ये यूएस डॉलर ला ही चलन म्हणून वापरण्यास परवानगी आहे.
कॉस्टारिका मध्ये एका भारतीय रुपयाची किंमत 8.15 कोलोन आहे.

7.मंगोलिया-

Togrog

मंगोलियाचे चलन टग्रीक किंवा टग्रोग या नावाने ओळखले जाते. भारतीय रुपयाचे मूल्य मंगोलिया मध्ये 29.83 टग्रीक आहे.

8. कंबोडिया-

Riel-Cambodia

कंबोडियाचे चलन कंबोडिअन रिल या नावाने ओळखले जाते. कंबोडियामध्ये भारतीय रुपयाला 63.93 रिल एव्हडी किंमत आहे. कंबोडियामध्ये रिल2 प्रकारच्या आहेत, एक 1953 ते 1975 च्या दरम्यान जारी करण्यात आली तर दुसरी 1975 ते 1980 च्या दरम्यान जारी करण्यात आली.

9. पैरग्वे-

guaranis-

पैरग्वेच्या चलनाला पैरेग्वेअन गुआराणी या नावाने ओळखले जाते. गुआराणी ला 100 सेन्टीमोज मध्ये विभागण्यात येते. सध्या पैरग्वे मध्ये सेन्टीमोज वापरात नाहीयेत. भारतीय 1 रुपयाची किंमत 74.26 गुआराणी आहे.

10. इंडोनेशिया-

Indonesia currency

रुपीआह हे इंडोनेशियाचे अधिकृत चलन आहे. रुपीआहला बँक ऑफ इंडोनेशिया जरी करते व त्यावर नियंत्रण ठेवते. 1 भारतीय रुपयाची किंमत इंडोनेशियाच्या 204.763 रुपीआह इतकी आहे.

11. बेलारूस-

Belarus

बेलारूसचे चलन रुबल या नावाने ओळखले जाते. बेलारूस मध्ये भारतीय रुपयाची किंमत 216 रुबल आहे.

12. व्हिएतनाम-

vietnam-currency

व्हिएतनामी डाँग हे व्हिएतनाम चे अधिकृत चलन आहे. डाँग हे 3 मे 1978 पासून व्हिएतनामचे चलन आहे.
भारतीय रुपयाचे व्हिएतनाम मधील मूल्य 338 डाँग आहे.

या देशांमध्ये तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला आपण खूप श्रीमंत असल्याचा अनुभव नक्कीच येईल.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

जाणून घ्या प्रवासाकरिता जगातील सर्वात स्वस्त देश ७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल

जगातील सर्वात महागडी दारु व त्यांच्या किमती तुम्हाला माहिती आहेत का?

Comments

comments

जाणून घ्या रेखा आणि अमिताभ यांच्या वायरल फोटो मागील सत्य.. 0

Amitabh Rekha

रेखा आणि अमिताभ बच्चन या दोघांनी पहिल्यांदा ‘दो अनजाने’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगला चालला होता. या चित्रपटात रेखा आणि अमिताभ यांनी पती पत्नीची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीचे नाव जगभरात जोडीच्या यादीमध्ये अग्रगण्य आहे आणि ते खूप चर्चेत राहिले होते. या दोघांनी सोबत शेवटी यश चोप्रा यांच्या सिलसिला या रोमँटिक चित्रपटात काम केले होते. अमिताभ यांची साथ मिळताच रेखा यांच्या फिल्मी करिअरने एकदम उडान घेतली होती, जसे की अमिताभ हे रेखा यांच्या करिअरसाठी लॉटरी चं तिकिटच बनून आले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या मूकद्दर का सिकंदर या चित्रपटात या जोडीने सोबत काम केले होते. या चित्रपटाने त्यांच्या करिअर ने आकाशाला गवसणी घातली व त्यांचे नाव इतिहासात कोरले गेले.

Amit_and_Rekha

हिंदी चित्रपटाद्वारे दाखवलेल्या प्रेमकथा या कलाकारांच्या निजी आयुष्यात ही घडतात. असेच काही अमिताभ आणि रेखा यांच्या बाबतीत घडले. जसे जसे यांचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपरहिट हात गेले तसं तसं यांच्या दोघांमधील प्रेम वाढत गेले. दोघांनी सुहाग, मि. नटवरलाल, गंगा की सौगंध, खून पसीना या सुपरहिट झालेल्या चित्रपटामध्ये सोबत काम केले आहे. अमिताभ यांच्यावर आपल्या प्रेमाचा जादूचालवण्यासाठी रेखाने स्वतःला पुर्णपणे बदलेले होते. आपला पहिला चित्रपट सावन भादो मध्ये जाड दिसणारी रेखा अमिताभ यांच्या प्रेमानंतर खूप बोल्ड आणि मनमोहक दिसायला लागली होती. दोघांचे चाहते आजही सिलसिला या चित्रपटात दाखवलेल्या त्यांच्या प्रेमकहाणी ची आठवण काढतात. कुली चित्रपटाच्या वेळी घडलेल्या एका दुर्घटनेमुळे दोघांची लव्हस्टोरी संपली. अजूनही हे एक राजच आहे की असे काय घडले होते कुली चित्रपटाच्या घटनेनंतर ज्यामुळे दोघांची प्रेमकथा संपुष्टात आली.

amitabh-bachchan rekha

काय आहे फोटो मागील सत्य ?

सध्या रेखा आणि अमिताभ या दोघांचे प्रेमप्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या चर्चेला सुरुवात झाली ती अनिस आझमींच्या वेलकम बॅक या चित्रपटामुळे. बी टाऊन मध्ये चर्चा होती की अनिस हे बॉलीवूड च्या टॉप च्या जोड्यांना घेऊन वेलकम बॅक करणार आहेत. या जोडीमध्ये नाव होते रेखा आणि अमिताभ यांचे. या चर्चेनंतर सध्या एक फोटो इंटरनेटवर प्रचंड वायरल झाला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे एका विमानात बसलेले आहेत. त्यांनी पायलट सोबत एक फोटो काढला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या पाठीमागच्या सीटवर रेखा बसलेल्या आहेत. हा फोटो इंटरनेटवर प्रचंड वायरल झाला असून त्यासोबत एक मजेशीर गोष्ट म्हणजे अमिताभ आणि रेखा हे वेलकम बॅक या चित्रपटात सोबत काम करणार असल्याची स्टोरी ही फिरत आहे. पण ही मोठी जोडी सोबत स्क्रीनवर एकत्र येणार ही बातमी पूर्णपणे खोटी व निराधार आहे.

amitabh-bachchan rekha

अमिताभ बच्चन यांच्या एका जवळच्या व्यक्तीने या फोटो विषयी माहिती देताना सांगितले की ‘अमिताभ हे भारतीय चित्रपटाला 100 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करण्यासाठी चेन्नई का जात होते. त्यांच्या सोबत त्या विमानात बॉलीवूड चे अनेक प्रसिद्ध कलाकार ही याच विमानात प्रवास करत होते. अमिताभ यांना बिल्कुलच कल्पना नव्हती की त्या विमानात त्यांचे सहप्रवासी कोण आहेत. कोणाला माहिती आहे की त्यांनी अमिताभ यांच्यामागे सीट घेताना काय विचार केला असेल?’

आणि विशेष म्हणजे हा फोटो ३ वर्ष जुना आहे. २०१३मध्ये हा फोटो वायरल झाला होता आता परत तोच फोटो सर्वत्र बघायला मिळत आहे.

या फोटोने एक जुना किस्सा आठवतो, अमिताभ यांच्या 60 व्या वाढदिवशी ठेवण्यात आलेल्या पार्टीला रेखा या निमंत्रण नसताना आल्या होत्या व त्या हॉटेलच्या बाहेरूनच परतल्या होत्या. यावरून रेखा आणि अमिताभ यांचा एकत्र विमान हा एक योगायोग असू शकतो. पण चेन्नईला जाण्यापूर्वी किंवा पोहचल्यावर ते एकमेकांना भेटले नव्हते. दोघं चित्रपटात एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. पण अमिताभ यांच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार अमिताभ हे या चित्रपटात काम करत नाहीयेत. त्यांना हे ही माहिती नाही की या चित्रपटात कोण कलाकार आहेत.

amitabh-bachchan-and-rekha

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

जाणून घ्या बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चनविषयी काही अपरिचीत गोष्टी

Comments

comments

भारतातील ६ आगळेवेगळे मंदिर, बुलेट बाबा, व्हिस्की देवी नक्की वाचा 0

Bullet Temple

भारतामध्ये अगोदरच 330 दशलक्ष पेक्षा जास्त देव आहेत. भारतामध्ये थोड्या थोड्या अंतरावर मंदिर बघायला मिळतात. बरेच अनपेक्षित स्थळी आणि वेगवेगळ्या आकाराचे मंदिर असतात. मंदिराच्या स्थळाला सहसा काही तरी दंतकथा किंवा काही तरी गूढ असते. आज आपण जाणून घेणार आहोत काही आगळ्यावेगळ्या मंदिराबाबत, जे की इतर मंदिरांपेक्षा वेगळे व असामान्य आहेत. काही ठिकाणी माणूस, उंदीर ते सायकल मोटरसायकल ची पूजा केली जाते व मंदिरही आहेत.

1. बुलेट बाबा मंदिर-

Bullet Temple

राजस्थान मधील जोधपूर मध्ये बुलेट बाबा हे मंदिर आहे. या मंदिरात 350 cc च्या बुलेटची पूजा केली जाते. ओम बन्ना नावाच्या एका व्यक्तीचा 20 वर्षापूर्वी बुलेट वर अपघाती मृत्यू झाला होता. येथे पूजा करायला येणारे लोकं सांगतात की, जेव्हा ओम यांचा अपघात झाला होता त्यानंतर जेव्हा पोलिसांनी ओम यांची बुलेट पोलीस स्टेशनला नेली, पण ती बुलेट प्रत्येक वेळेस दुसऱ्या ठिकाणी मिळायची. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आता ती बुलेट एका मंदिरात ठेवण्यात आली असून तिची लोकं रोज पूजा करायला येतात. लोकांचं म्हणणं आहे की पाली-जोधपूर हायवे ने तुम्ही जात असाल तर बुलेट बाबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही हा रस्ता सुरक्षित पणे पार नाही करू शकत. या रस्त्यावरील लोक बुलेट बाबांचे दर्शन घेण्यासाठी थांबतही आहेत.

2. मोदी मंदिर-

Modi temple

गुजरातमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर बांधण्यास दोन वर्षे लागली. या मंदिराच्या ठिकाणी अगोदर मोदी यांचे छायाचित्रे ठेवण्यात आलेले होते. लोकांच्या मते या मंदिरात सकाळी एकदा, दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी एकदा प्रार्थना केली जाते. या मंदिरात फक्त गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील लोकं ही येतात.

3. सोनिया गांधी मंदिर-

Soniya gandhi temple

तेलंगणातील मेहबूबनगर येथे काँग्रेस नेते शंकर राव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे मंदिर बांधलेले आहे. त्यांच्या मते लोकं सोनिया गांधींची रोज प्रार्थना करू शकतील म्हणून त्यांनी हे मंदिर बांधले आहे. शंकर राव यांनी या मंदिरात सोनियांचा संगमरवरीचा पुतळा उभारला आहे. मंदिरात भिंतीवर इंदिरा गांधी, राजीव गांधी राहुल गांधी यांची चित्रे लावण्यात आलेली आहेत.

4. विमान गुरुद्वारा-

Gurudwara

तुम्ही जर परदेशात जाण्यासाठी उत्सुक आहात पण व्हिसा मिळण्यासाठी अडचणी येत असतील तर तुम्ही शहिद बाबा निहाल सिंग गुरुद्वारा मध्ये एकवेळ प्रार्थना करायला हवी. हवाईजहाज (विमान) गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात आपली परदेशात जाण्याची इच्छा असल्यास आपण एक खेळण्यातील छोटे विमान घेऊन एक वेळ प्रार्थना केली की तुमची प्रार्थना लवकरच सार्थ होऊ शकते.

5. उंदिरांचे मंदिर- करणी माता मंदिर राजस्थान

Karni Mata

राजस्थान मध्ये असलेल्या करणी माता या मंदिरात खूप उंदीर आहेत. पण भक्तांना हे उंदीरापासून काही अडचणी नाहीयेत. करण करणी माता मंदिरातील उंदीर हे पवित्र आणि सुरक्षित मानले जातात. जर तुम्ही या मंदिरातील एखादा उंदीर मारला किंवा चुकून मेला तर तुम्हाला तो सोन्याचा बनवून मंदिरात द्यावा लागतो. मंदिरात काळे आणि तपकिरी उंदीर बघायला मिळतात. भक्तांच्या मते पांढरे उंदीर दिसणे हे शुभ असते.

6. व्हिस्की देवी मंदिर- कालभैरव मंदिर उज्जेन

kal-bahairv temple

उज्जेनच्या कालभैरव मंदिरात दारूचे दारूच्या बाटल्या घेऊन येणारे भक्त पाहून तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता, तुम्हाला डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण या मंदिरात पूजेसाठी दारुच वापरली जाते व भक्तांना प्रसाद म्हणूनही दारुच दिली जाते. पौराणिक कथेनुसार कालभैरव ला तुम्ही हिंदू साठी अयोग्य असलेला आहार पूजेसाठी देऊ शकता. कालभैरव मंदिराच्या बाहेर पूजा चे साहित्य विकणारे लोकं तुम्हाला भेटतील. 40 रुपये च्या या बास्केटमध्ये नारळ, फुलं आणि 140 मिलि दारूची बाटली जी की राज्य सरकार पुरवते. भक्त ही बाटली2 मिनिटात पितात. त्यांना या दारूच्या ब्रँडविषयी जाणून घेने ही आवश्यक वाटत नाही.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

जाणून घ्या आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती ?

वाचा कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

Comments

comments

%d bloggers like this: