वयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया उर्फ तुफान सिंघ यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का ? 0

भदरी रियासतचे राजकुमार रघुराज प्रताप सिंह “राजा भैया” यांना तुफान सिंह या नावाने सुध्दा ओळखल्या जाते. ३१ मे रोजी त्यांच्या जन्म प्रतापगढ येथील कुंडा येथे झाला. सध्या ते कुंडा येथून आमदार आहेत. मागे २०१२ मध्ये राजा भैया यांनी निवडणुकीच्या अर्जात स्वतःचे वय ३८ वर्ष लिहिले होते. त्यानुसार राजा भैया पहिल्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांचे वय फक्त १९ वर्ष होते या वरून बराच वाद उठला होता. गरीबांचा रॉबिनहूड म्हणून राजा भैयांना ओळखल्या जाते आज खासरेवर बघूया राजा भैया विषयी काही खासरे माहिती…

२० वर्षा अगोदर उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापगाढ येथील कुंडा येथे जाहीर सभेत घोषणा केली होती कि, गुंडा विहीन कुंडा करौं, ध्वज उठाय दोउ हाथ. कल्याण सिंहाचे राजकारण या घोषणेनंतर धक्के खात राहिले परंतु १९९६ साली ज्या आमदारास कल्याणसिंह यांना संपविण्याची प्रतिज्ञा केली तो आजही लोकात पहिल्या सारखाच लोकप्रिय आहे. आज पर्यंत ५ वेळेस अपक्ष निवडून आलेले आमदार राजाभैया आहेत. राजा भैया यांच्या सुरवातीच्या राजकीय जीवनात त्यांना भेटायचे असेल तर सर्वाना कुंडा येथे जावे लागत होते. त्यांच्या राजवाडा हजारो एक्कर मध्ये बांधलेला आहे आणि त्यामध्ये हत्ती घोडे त्या राजवाड्याची आजही शान वाढवतात. राजा भैया यांचे आजोबा राजा बजरंग बहादुर सिंह हे स्वतंत्र सेनानी होते. पंतनगर कृषि विश्वविद्यालयचे वाईस चान्सलर आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असे अनेक पद त्यांनी उपभोगिले आहे.

राजा भैया महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत. सोबतच त्यांना मातीच्या चुलीवर बनलेला स्वयंपाक रोज द्यावा लागतो. आजही त्यांच्या राजवाड्यात मातीच्या चुलीवर व मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्या जातो. नॉन वेजचे शौकीन आहे राजा भैया जे मातीच्या भांड्यात बनविलेले हवे. राजा भैयाने वयाच्या ६ व्या वर्षी घोडस्वारीस सुरवात केली होती. आजही घोड्यावर ते रोज रपेट मारतात. त्यांच्या २ फासोळ्या घोड्यावरून पडल्यामुळे मोडलेल्या आहेत. राजा भैयाच्या वडिलाने आजपर्यंत एकदाही मतदान केले नाही आहे किंवा राजा भैयाला मतदान करा अशी विनंती देखील केली नाही आहे. तरी देखील राजा भैया स्पष्ट बहुमताने निवडून येतात. राजा भैयांना बुलेट गाडीचा भारी शौक आहे.

वयाच्या १२व्या वर्षी त्यांना त्यांची पहिले बुलेट मिळाली होती. आणि फिएट गाडी वर ते पहिल्या वेळेस चारचाकी गाडी चालविणे शिकले होते. त्यांच्या राजवाड्यात लैंड रोवर, लैंड क्रूजर, बीएमडब्ल्यू सारख्या अनेख महागड्या गाड्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या बनावटीचे पिस्तुल जमा करण्याचा देखील छंद आहे. राजा भैयांना दोन मुले आणि दोन मुली आहेत जी सध्या शिक्षण घेत आहेत. त्यांच्या राजवाड्या मागे ६०० एकर मोठे असलेल तलाव आहेत. ज्यामध्ये अनेक मगर त्यांनी पोसलेले आहेत. असे सांगण्यात येते कि त्यांच्या विरोधकांना मारून ते या तलावात फेकून देतात.

आजही राजा भैयाच्या राजवाड्यासमोर दरबार भरतो जिथे ते न्यायदान करतात. रोज सकाळी अनेक महिला पुरुष त्यांच्या राजवाड्या समोर एका लाईनमध्ये उभे असतात राजाभैया त्यांचे भांडण तंटे सोडविण्याचे काम करतात. मागील २० वर्षाच्या काळात राजा भैया आणी त्यांचे वडील उदय प्रताप सिंह यांच्यावर अनेक फसवणुकीचे गुन्हे सोबत गंभीर खुनाचे गुन्हे सुध्दा आहेत. त्यांच्या वडील विषयी पोलीस रेकॉर्ड मध्ये नोंद आहे कि ते २० लोकांची टोळी चालवत असे उत्तर प्रदेशला अलग देश घोषित करण्या करिता हि टोळी काम करते असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. उदय प्रताप सिंह यांना भेटायचे असल्यास त्यांच्या राजवाड्यापासून दूरवरच गाडी बंद करावी लागते कारण ते पर्यावरण प्रेमी आहेत त्यांना गाडीच्या इंजिनचा आवाज त्यांच्या राजवाड्यात सहन होत नाही. स्वतः राजा भैया सुध्दा हा नियम पाळतात आणि स्वतःची गाडी ढकलत राजवाड्यापर्यंत नेतात.

उदय प्रताप सिंह

उदय प्रताप सिंह यांचे शिक्षण ड्युन स्कूल मध्ये झाले आहे जिथे भारतातील राजघराण्यातील लोक मुले शिकतात. त्यांनी राजा भैयाच्या शिक्षणास विरोध केला त्यांच्या मते शिक्षणामुळे मुले भित्रे होतात. परंतु राजा भैयाच्या आईने त्यांना घरीच शिक्षण देण्याची व्यवस्था केली. ज्या कल्याणसिंहाने राजा भैयांना विरोध केला त्यांच्या मंत्री मंडळात राजा भैयांना स्थान द्यावे लागले. राजा भैया अपक्ष आमदार आहेत. मायावती शासन काळात त्यांच्यावर पोटा कायद्या अंतर्गत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. ज्या काळात ते जेलमध्ये होते त्या काळात एक डझन पेक्षा अधिक अधिकाऱ्याच्या बदल्या या जेलमध्ये करण्यात आल्या परंतु कोणीही ड्युटीवर जॉईन होत नव्हते. समाजवादी पक्षाच्या काळात परत ते मंत्री बनून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाले.

आजही राजाभैयांना त्यांच्या क्षेत्रातील लोक रॉबिनहूड समजतात त्याची पूजा करतात. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

Comments

comments

Previous ArticleNext Article

Travelholic Farmer From Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA.. 0

महाराज !!!
उदयन महाराज !!!
बस्स! नाम ही काफी है !!!
मला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…

गोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..

उदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality!! वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..

सातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..

 

 

आजच्या युगात कसले महाराज नि कसले काय? असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का? पण का?
माझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात?

रात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..

अपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .
अजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..

असंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..

त्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…

महाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…

प्राजक्त झावरे पाटील

Comments

comments

जि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0

जि. प. शाळा ते IRS अधिकारी
श्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)

सहायक आयकर आयुक्त,
भारतीय महसूल सेवा, नागपूर.

“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे? हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे? एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.

साधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर?

ह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी? ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत? असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं? मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब?”
नानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.

त्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो? नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.
आई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.
.
.
“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.

Comments

comments

तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ? 14

१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.

२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.

३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.

४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.

५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.

६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.

७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.

८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.

९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.

१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.

११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.

१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.

१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.

१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.

१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.

१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.

१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.

१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.

१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.

२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.

२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.

असा आमदार महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य असेच आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल…

Comments

comments