बघा राज ठाकरे आणि शरद पवार यांची मुलाखत.. 0

राजकारण असो, समाजकारण असो की चित्रपट क्षेत्र असो.. या क्षेत्रांमधील दिग्गजांच्या प्रकट मुलाखती एक वेगळाच आनंद देणाऱ्या असतात. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत येत्या २१ फेब्रुवरी रोजी पुणे येथे होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पवारांना ‘बोलते’ करणार आहेत. ही मुलाखत ‘मॅचफिक्सिंग’ असणार नाही, तर कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘ठाकरी भाषेत’ राज हे प्रश्नांची चौफेर गोलंदाजी करणार आहेत. चला तर हि मुलाखत बघूया खासरे वर

शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. विख्यात हास्यकवी रामदास फुटाणे यांनी या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले असून ‘तेल लावलेले पेहेलवान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांना प्रश्नांच्या कैचीत राज कसे पकडणार याची एक वेगळीच उत्सुकता असेल. खरे तर शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीच्या पाश्र्वभूमीवर अनेक मुलाखती झाल्या. तथापि या मुलाखतींमध्ये रंगतदार असे फारसे काही नव्हते. त्यामुळे चौकटीबाहेर जाऊन महाराष्ट्राला पुढील ५० वर्षे लक्षात राहील अशी मुलाखत कोण घेऊ शकेल याचा शोध शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी सुरू केला. अनेक नावांवर चर्चा झाली. दोन अडीच महिन्यांपासून हा शोध सुरू होता. ‘जागतिक मराठी अकादमी’चे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांचे नाव सुचवले. त्यानंतर शरद पवार यांची प्रकृती तसेच राज ठाकरे यांची संमती झाली.

Comments

comments

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA.. 0

महाराज !!!
उदयन महाराज !!!
बस्स! नाम ही काफी है !!!
मला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…

गोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..

उदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality!! वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..

सातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..

 

 

आजच्या युगात कसले महाराज नि कसले काय? असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का? पण का?
माझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात?

रात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..

अपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .
अजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..

असंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..

त्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…

महाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…

प्राजक्त झावरे पाटील

Comments

comments

तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ? 14

१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.

२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.

३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.

४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.

५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.

६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.

७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.

८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.

९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.

१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.

११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.

१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.

१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.

१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.

१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.

१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.

१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.

१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.

१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.

२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.

२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.

असा आमदार महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य असेच आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल…

Comments

comments

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदि यांच्या बद्दल काही खासरे गोष्टी… 2

तुम्ही या व्यक्तिमत्वाचा राग करा अथवा प्रेम करा परंतु तुम्ही नरेंद्र दामोदरदास मोदी भारताचे प्रधानमंत्री यांना दुर्लक्ष करुच शकत नाही. जगाच्या राजकारणात मोदींनी चांगले स्थान मिळवले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानंतर जगातील सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स असणारा हा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. २०१४ च्या निवडणुकीतील विजयानंतर सर्व अधिकार स्वतःकडे ठेवणारे मोदीजी चांगलेच पॉवरफुल झाले आहेत. जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोणातुन नरेंद्र मोदी यांनी अनेक बलाढ्य देशासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.

मोदी हे पहिले असे भारतीय प्रधानमंत्री असतील ज्यांनी निवडणूक प्रचाराकरीता सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर केला. त्याची टैगलाईन ‘अच्छे दिन’ व हॅशटैग #Namo सगळीकडे धुमाकुळ घालताना दिसला व सर्वांनी बघितला. नरेंद्र मोदींची कार्यपध्दती, त्यांचे नियोजन, राहणीमान हे सर्वांना माहिती आहे. परंतु आज आपण त्यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या, वाचलेल्या काही गोष्टी KhaasRe पाहणार आहोत.

अपरिचित नरेंद्र मोदि

 

१) कणखर व्यक्तिमत्व व करारी भाषण शैलीच्यामागे एक कवी लपलेला आहे. त्यांच्या तरुणपणाच्या काळात नरेंद्र मोदींनी गुजराती ह्या त्यांच्या मातृभाषेत अनेक कवीता लिहील्या आहेत. ह्यातील काही १९ कवीता “साक्षी भाव” ह्या पुस्तकात प्रकाशित झालेल्या आहेत. कोणी विचार करेल का हा कणखर राजकारणी प्रेमकविता ललितकाव्य लिहणारा कवी असेल म्हणुन ?

२) यावर्षी सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींना रियाध येथे स्थानिक महिलांनी आयटी कार्यालयात थांबवुन चर्चा करण्यास बोलविले. मोदी हे पहिले राजकारणी असतील ज्यांनी सौदी सारख्या परंपरावादी, रुढीवादी देशातील महिला सोबत संभाषण केले.

३) २०१४ साली झालेल्या भारतातील मोदींच्या शपथविधी सोहळ्यास SAARC परीषदेतील सर्व नेत्यांना आमंत्रण देण्यात आले व संपुर्ण देशातील प्रतिनिधी उपस्थित राहीले. पाकीस्तानचे नवाज शरीफ व श्रिलंकेच्या राजपक्षे यांच्यावर त्यांच्या देशात या सोहळ्याला हजर राहील्यामुळे जुने तणावपुर्ण संबंध लक्षात घेता टीकाही झाली.

४) लहान असताना त्यांना राजकारणात फारसा गोडवा नव्हता. काहीतरी धार्मिक काम करायचा त्यांचा विचार होता. याकरीता बराच काळ मोदींनी रामकृष्ण मिशनच्या राजकोट व बेलुर मठात घालविला होता.

५) एवढया धकाधकीच्या आयुष्यात मोदी त्यांची आई हिराबेन यांच्याकरीता वेळ काढतात व प्रत्येक वाढदिवसाला भेटायला जातात. त्यांना चार भाऊ, बहिण व पत्नी आहे. परंतु पत्नी जशोदाबेन सोबत त्यांचे संबंध नाहीत.

६) गुजरात मधील गांधीनगर आशिया खंडातील “सर्वात जास्त हिरवळ असलेले शहर” म्हणून मोदींच्या काळातच घोषित झाले.

७) मोदी राजकारणात सरदार वल्लभभाई पटेलांचा आदर्श घेतात असे सांगतात आणि अध्यात्माकरीता विवेकानंद यांना आदर्श मानतात.

८) नरेंद्र मोदी त्यांच्या पेहरावाकरीता प्रसिध्द आहेत. बराक ओबामाच्या भेटीकरीता त्यांनी स्वतःचे नाव लिहलेला २५ लक्ष किमतीचे वस्त्र परीधान केले होते. JADE BLUE ही अहमदाबाद येथील कंपनी त्यांचे कपडे डिझाईन करतात.

९) शाळेत नरेंद्र मोदी यांनी अनेक नाटकात काम केलेले आहे.

१०) अमेरीकेने एकेकाळी गुजरात दंगलीमुळे मोदींना व्हिसा देण्यास नकार दिला होता. भारताचे प्रधानमंत्री झाल्यावर त्यांना तो व्हिसा मिळाला.

११) प्रेमतिर्थ, संघर्षमा गुजरात, सेतुबंध, ज्योतीपुंज, आख आ धन्य छे, केलवे के केलवाणी, पत्ररुप गुरुजी (गोळवलकर), श्री गुरुजी एक स्वयंसेवक, Journey अशी पुस्तके नरेंद्र मोदींनी लिहली आहेत. प्रेम विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत. तसेच त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे. याचे प्रदर्शन सुध्दा मोदींनी भरविले होते.

१२) चहाचे नरेंद्र मोदी भयंकर चाहते आहेत. मोदी शाकाहारी आहेत. खिचडी त्यांचा आवडता खाद्यपदार्थ आहे.

१३) नरेद्र मोदी यांचा आवडता चित्रपट “गाईड” हा आहे व आवडते गाणे एस.एन.त्रिपाठींचे “तेरे कंधो पे आज भार हे मेवाड का, करना पडेगा तुझे सामना पहाड का… हल्दीघाटी नही है काम कोई खिलवाड का, देना जवाब वहा शेरो के दहाड का…”

१४) नरेंद्र मोदी यांनी अमेरीके मध्ये व्यक्तिमत्व विकासाकरीता व इंग्रजी करीता दोन महिन्याचा कोर्स सुध्दा केला आहे.

१५) महागडे पेन, घड्याळ व पादत्राणे याचे मोदी शौकीण आहेत.

All Rights Reserved.
© 2017 KhaasRe.Com

Comments

comments

%d bloggers like this: