मराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो… 2

मुलगा काय करतो ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांच्या घरचे अभिमानाने सांगतात फेसबुकवर काड्या करतो. नाहीका भन्नाट काम? फेसबुकवर त्यांनी काही वर्षा अगोदर छंद म्हणू पेज काढले आणि आज त्याच छंदाचे व्यवसायात रुपांतर झालेले आहे. काही मराठी फेसबुक स्टारची माहिती आपण आज खासरे वर बघूया…

राहुल रंजन आरेकर वय २६ वर्ष माहीम, मुंबई

मोठे फेसबुक पेज:- आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात Latest Marathi Jokes

राहुलची एकंदर स्टोरी सिनेमा सारखी आहे एक मुलीच्या आठवणीत त्याने हे फेसबुक पेज २०१० साली सुरु केले. कधी त्याने हा विचार सुध्दा केला नव्हता कि एक दिवस हेच पेज त्याचे करीयर घडवेल. परंतु हे त्याचे आज करीयर झाले आहे तो म्हणतो कि लोक आपल्या आयुष्यावर नकळत उपकार करून जातात आणि झालेही तसे.

तिच्या आठवणीत तो चारोळ्या, कविता या पेज वर शेअर करत असे लोकांना सुध्दा हे आवडत होत त्या सोबत त्याने इतर पेजहि फेसबुकवर सुरु केले. फेसबुकवर एकूण ५० पेज राहुल कडे आहे. एवढेच काय तर मराठी अभिनेत्री प्रिया बापट, अमृता खानविलकर, केतकी माटेगावकर यांचे फॅन पेज राहुलने सुरु केले होते आज हे पेज त्यांच्या अधिकृत फेसबुक खात्या सोबत जुळलेले आहे. केतकी माटेगावकरला तिच्या वाढदिवसानिमित्त राहुलने तिला पेज गिफ्ट केले आहे.

नाहीका खासरे , आज राहुल कडे फेसबुकवर विविध प्रमोशन मधून चांगला पैसा येतो. त्याने Paying Ghost या चित्रपटाचे प्रमोशन हि केले आहे. ४ मोबाईल्स, २ लॅपटॉप्स, १ DSLR हे सर्व काही राहुलने फेसबुक पेजच्या कमाईवर मिळविले आहे. लवकरच तो मुंबईला स्वतःचे घर घेणार आहे या करिता बऱ्याच दिवसापासून तो बचत करत होता. तो आनंदी आहे कि त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार.

भविष्यात राहुलला युट्युब वर पॉप्युलर मराठी चॅनेल बनवायचं आहे. ज्यामध्ये शॉर्ट मुव्हीज, pranks, webseries सर्व काही असेल. आणि मुंबईला एक स्वतःचे हॉटेल टाकायचे त्याचे स्वप्न आहे. लवकरच ते पूर्ण होवो ह्या खासरे कडून शुभेच्छा…

महेश VipMarathi वय २५ मराठी VipMarathi.Com सध्या vipmarathi.in या नावाने सुरु आहे.
फेसबुक पेज VipMarathi

मराठवाड्यातील एक सामान्य युवक घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षण जेमतेम ९ व्या वर्गा पर्यंत झाले होते. मित्राच्या इंटरनेट कॅफेवर जाणे येणे चालत होते त्यामुळे इंटरनेट वगैरे विषयी त्याला बरीच माहिती होती. २०१० साली महेश नाईट ड्युटी करिता एका दुकानात काम करत होता. तेव्हा त्याच्याकडे होता चायनाचा मोबाईल इंटरनेट विषयी माहिती असल्यामुळे त्याने या मोबाईलवर नेट सुरु केले.

Wapka, Pepornity या सारख्या अनेक वेबसाईट वर त्याने असच काही तरी म्हणून वेबसाईट बनवत असे. त्यावरच त्याला कल्पना सुचली पहिली मराठी गाण्याची वेबसाईट VipMarathi.Com काम सोपे नव्हते परंतु या क्षेत्रातील त्याला माहिती होती आणि अनेक जाणकार ऑनलाईन मित्र जुळले होते. तो सांगतो एक एक रुपया उधार घेऊन त्याने ६००० जमविले आणि त्यानंतर २०११ साली त्याची वेबसाईट VipMarathi सुरु झाली आणि दिवसागणिक या वेबसाईटची लोकप्रियता वाढत गेली. मराठी गाण्याकरिता हि एकमेव वेबसाईट होती.

महेश सांगतो कि तो तालुक्याच्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्याला नेट वगैरे इत्यादी मिळवायला त्रास होत असे. मित्राकडून सीडी उधार आणणे आणि गाणे अपलोड करणे यात दिवस जात होता. त्याकाळात 2G नेटचा स्पीडहि भयंकर कमी होता. २०१३ पर्यंत यात कुठलाही त्याला फायदा नव्हता परंतु या गोष्टीची त्याला आवड होती. फेसबुक पेजहि झपाट्याने वाढत होते त्यानंतर वेबसाईटवर इतर कंपनीच्या जाहिराती त्याने देणे सुरु केल्या आणि उत्पन्नाचे स्त्रोत सुरु झाला.

आज महेश स्वतःच्या कारने फिरतो, घर घेतले, स्वतःचे ऑफिस आहे हे सर्व काही झाल छंदातून भविष्यात महेशला स्वतःचे न्यूज पोर्टल सुरु करायचे आहे आणि हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खासरे कडून महेशला शुभेच्छा… (महेशला त्याचे पूर्ण नाव जाहीर करायचे नसल्यामुळे बाकी वैयक्तिक माहिती आम्ही देऊ शकत नाही)

मोहित मोहन कोलंगडे वय २६ वर्ष रा. कळंब जिल्हा. उस्मानाबाद https://12chyabhaavaat.com
फेसबुक पेज- आईच्या गावात बाराच्या भावात, इंजिनियरिंग फंडा

या नावाने मोहितला कोणी ओळखणार नाही. परंतु आईच्या गावात अन बाराच्या भावात, इंजिनियरिंग फंडा हे फेसबुक पेज नाव आज मराठीत प्रसिद्ध आहे. १० वर्षा अगोदर इंजिनियरिंगला असलेल्या मोहितने आईच्या गावात हे फेसबुक पेज सुरु केले. उद्देश होता फक्त मनोरंजनाचा त्या व्यतिरिक्त त्याने हा व्यवसाय होईल याचा विचार देखील केला नाही. हळू हळू त्याचे पेज लोकाच्या पसंदीला उतरू लागले आज मोहितच्या दोनीही पेजला दहा लाखाच्या घरात लाईक आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल फेसबुक पेजवरून कमाइ कशी सुरु केली मोहितने ? तर तो करतो मुव्ही प्रमोशन, Android Application प्रमोशन आणि आता वेबसाईट प्रमोशन सुरु केले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही मोहितने याच फेसबुक पेजच्या जोरावर स्वतःचे घर बांधले. याच महिन्यात १० तारखीला त्याच्या या फेसबुक घराचा गृहप्रवेश आहे.

तो सांगतो पेजवर त्याची पहिली कमाई आहे त्याने घेतलेली स्वतःची बाईक आणि आता हा प्रवास पुढे सुरु आहे. मोहित आता स्वतःची वेबसाईट https://12chyabhaavaat.com चालवतो. भविष्यात त्याला हि कंपनी मोठी करायची आहे . आज मोहित घरबसल्या वर्षाला लाखो कमावतो.

श्रीकांत अभिमान जाधव वय २५ वर्ष रा.बीड फेसबुक पेज फेसबुक तडका अंग अंग भडका

श्रीकांत हा सामान्य कुटुंबातील युवक घरी टेक्निकल ज्ञान देणारे कोणी नाही. २०१० साली तो फेसबुकवर आला आणि हा पेज जगताचा त्याचा प्रवास सुरु झाला. श्रीकांतचे B.Com झाले आहे आणि सध्या तो फुलटाईम फेसबुकला वेळ देतो.

एक वेळ असाही होता जेव्हा २०११ साली श्रीकांतने फेसबुक पेज सुरु केल आणि इंटरनेट वापरायला तासन तास नेट कॅफे मध्ये बसून राहायचा. कॉलेजला दांडी मारून तो फेसबुक वापरत होता. मित्र त्याला फेस्बुक्या म्हणून चिडवत होते. परंतु त्याने हे काम सुरु ठेवले आणि २०१३ पहिले सिनेमा प्रमोशनचे काम त्याला मिळाले. सिनेमाचे नाव होते सत ना गत त्यानंतर त्याने सयाजी शिंदे यांचा पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या सिनेमाचे प्रमोशन केले आणि त्याची फेसबुकची गाडी रुळाला लागली.

२०१३ साली नवीन android आल्याने app प्रमोशनच काम त्याला मिळू लागल त्यामधून पहिली कमाइ म्हणून श्रीकांतनि १ लाख रुपयाची गाडी घेतली. स्वतःचा लॅपटॉप हि आला. फेसबुक दुनियेतील अविस्मरणीय आठवण तो सांगतो कि नाना पाटेकर याचे पहिले फेसबुक पेज त्याने सुरु केले त्यानंतर त्याचा संपर्क नानाचा मुलगा मल्हार सोबत झाला. आणि नानांनी स्वतः त्याला पुण्यातील घरी बोलवले नाना उत्तम जेवण बनवतात हे सर्वांना माहितीच आहे याची आठवण सांगताना त्याने सांगितलेली कि नानाच्या घरी भेटल्यावर नानांच्या पाककलेचा आस्वाद घ्यायचा योग त्याला मिळाला. सयाजी शिंदे यांचे फेसबुक पेजहि श्रीकांतनि सुरु केले होते.

आज श्रीकांत फुलटाईम फेसबुक व वेबसाईट चालवितो. जमा झालेल्या पैश्यात लवकरच तो शॉपिंग कॉम्प्लेक्सच काम त्याचा गावला सुरु करणार आहे. त्याच्या उज्वल भविष्याकरिता त्याला खासरेच्या शुभेच्छा…

हे आहेत काही खासरे मराठी फेसबुक उद्योजक ज्यांनी प्रतिकूल परीस्थित हे सर्व साम्राज्य निर्माण केले. विशेष म्हणजे हे सर्व वन मॅन आर्मी सर्व स्वतःच बघतात. असेच काही फेसबुकचे उद्योजक तुमच्या समोर अजून आणणार आहोत फक्त खासरेवर…

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका… आपल्याकडे काही भन्नाट कथा किंवा आयडिया असेल तर संपर्क करा info@khaasre.com

टीप- खासरेच्या पूर्वपरवानगी शिवाय लेख कॉपी करू नये…

वाचा फेसबुक मध्ये काम करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला…

Comments

comments

Previous ArticleNext Article
Travelholic Farmer From Maharashtra.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुम्हाला माहितेय? पहिला ईमेल, ट्विट, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब व्हीडीओ ! 1

आता इंटरनेट शिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाही करणंही अशक्यच, हो ना! ईमेल, ट्विटर, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब आणि स्काईपचा आपला अतिशय जिव्हाळ्याचा संबंध. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का? पहिला ईमेल कुणी केला असेल, पहिलं ट्विट काय होतं?, युट्यूबवर अपलोड झालेलं पहिलं व्हिडिओ कोणतं होतं?, पहिली वेबसाईट कोणती होती?, पहिलं फेसबुक अकौंट कुणाचं होतं? आज या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात….

पहिला ईमेल

जगातला पहिला ईमेल 1971 मध्ये रे टॉमलिन्सन यांनी स्वतःलाच पाठवला होता. तो टेक्स्ट मेसेज त्यांनी QWERTYIOP असा काहीतरी टाईप करून पाठवलेला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ईमेलमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काहीही विशेष नव्हते.

पहिली वेबसाईट

टिम बर्नर्स ली हे वर्ल्ड वाईड वेब (WWW) चे जनक आहेत. जगातली पहिली वेबसाईट त्यांनी 1991 मध्ये बनवली होती. त्या वेबसाईटचा अॅड्रेस http://info.cern.ch/hypertext/WWW/TheProject.html असा होता. ली यांनी ही वेबसाईट बनवून त्यावर लोकांसाठी WWW बद्दलची सविस्तर माहिती दिली होती. तसेच जगातला पहिला ब्राऊजरही World Wide Web त्यांनीच बनवला होता.

पहिलं फेसबुक अकाउंट

सर्वात अगोदर फेसबुकवर 3 अकौंट तयार करण्यात आली. मात्र ती फक्त टेस्टींगसाठी वापरली गेली होती. ती तेव्हाच डिलीट करण्यात आली. त्यानंतरचे चौथं अकौंट हे खुद्द मार्क झुकरबर्ग यांचे आहे, ज्याला आपण पहिले-वहिले फेसबुक अकौंट म्हणू शकतो. त्यावेळी प्रत्येक अकौंटला आयडी कोड देण्यात आला होता. झुकरबर्ग यांचे अकौंट चौथं असल्याने आजही त्याच्या अकाउंट URL मध्ये 4 हा अंक आहे. त्यानंतर 5 व 6 नंबरचे अकाउंट हे झुकेरबर्ग यांचे रुममेट्स आणि फेसबुकच्या सहसंस्थापकांचे आहेत. यानंतर 7 नंबरचे अकौंट हे Arie Hasit यांनी बनवले आहे आणि ते फेसबुकच्या टीम बाहेरील फेसबुक अकौंट उघडणारी पहिली व्यक्ती आहेत.

पहिला युट्यूब व्हीडीओ

युट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी जगातला पहिला युट्यूब व्हीडीओ अपलोड केला होता. “मी अॅट द झू” असं नाव असलेला हा 19 सेकंदांचा व्हीडीओ 24 एप्रिल 2005 रोजी अपलोड करण्यात आलाय. आजपर्यंत या व्हीडीओला 4 करोडपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय.

पहिलं ट्विट

ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी 21 मार्च 2006 रोजी जगातला पहिला ट्विट केला होता. “just setting up my twttr” असे ते ट्विट होते.

पहिलं डोमेन नेम

जगातलं पहिलं डोमेन नेम Symbolics.com असून ते 15 मार्च 1985 रोजी रजिस्टर करण्यात आले होते. हे डोमेन नेम Symbolics Inc. नावाच्या कॉम्प्युटर सिस्टम कंपनीकडून नोंदवले गेले होते.

स्काईपवरचं पहिलं वाक्य

एप्रिल 2003 मध्ये स्काईपवर इस्टोनीयन भाषेत पहिल्यांदा काही शब्द बोलले गेले होते. स्काईपच्या डेव्हलपमेंट टीमच्या एका सदस्याने उच्चारलेले “हॅलो, तुम्ही मला ऐकू शकता का?” असे ते वाक्य होते.

चला पटापट शेअर करा ह्या खासरे माहितीला

Comments

comments

मृत्युनंतर पतीप्रमाणेच तिने वाचविले अनेकाचे जिव… 2

कविता करकरे ATS प्रमुख शहिद हेमंत करकरे यांची पत्नी. हेमंत करकरेंना मुंबई दहशतवादी हल्यात अनेक निष्पापांचे जिव वाचविताना विरमरण आले. २९ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांची पत्नि कविता यांचा ब्रेन हैमरेजनी मृत्यु झाला परंतु त्यांनी मृत्युसमयी सुध्दा तिन लोकांना जिवनदान दिले.

कविता करकरे ह्या टारिडो कॅालेजला प्राध्यापिका होत्या , अचानक बिमार पडल्याने त्यांना हिंदुजा हॅास्पीटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे त्यांचा ब्रेन डेड आहे हे समजले. मेंदुत अती रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा वाचण्याची अपेक्षाच नव्हती. त्यांना हा आजार बरेच दिवसापासुन होता व याची कल्पना त्यांना होती.
मुलगी परदेशात असल्यामुळे त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. कविता करकरे यांनी मृत्युपुर्विच त्याचे देहदान करायचा संकल्प केला होता. त्यानुसार त्याची किडनी हि एका ४८ वर्षिय व्यक्तिस देण्यात आली व त्याचा जिव वाचला.

दुसरी किडनी ही ५९ वर्षिय व्यक्तिस जसलोक हॅास्पीटल येथे देण्यात आली हा रुग्ण किडनी प्रत्यारोपणाकरीता ७ वर्षापासुन वाट बघत होता व त्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक होते.
कोकीलाबेन हॅास्पीटल येथील ४९ वर्षिय रुग्णाला सुध्दा त्यांनी नवजिवन दिले त्याचे लिवर त्या रुग्णास देण्यात आले.

तिनीही शस्त्रक्रिया ह्या यशस्वीरित्या पुर्ण झाल्या व त्याचे डोळे हे हाजी बाचुअली आय बैंक,परेल यांना दान देण्यात आले.

हिंदुजा हॅास्पीटल येथे कवितांची मुले आकाश,सायली व जुई यांनी हा कठिण निर्णय घेतला व ३ रुग्णांना नवजिवन दिले.

हेमंत करकरे हे सुध्दा आयपीएस होण्या अगोदर प्राध्यापक होते त्याच काळात कविता व हेमंत सरांची भेट झाली. २६ नोव्हेंबर २००८ ला दहशतवादी हल्याच्या दिवशी हेमंत करकरे व कविता सोबत जेवन करत होते व अचानक त्यांना फोन आला व ते चालले गेले की परत आलेच नाही.
दुस-यांचे आयुष्य वाचविणे हे दोघांनिही मृत्युपश्चात करुन दाखविले…..

Comments

comments

अबब या राजाच्या फिरायचा खर्च ६५० करोड रुपये… 0

सौदी अरबचा राजा सलमान याच्या सुट्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कारण हि तसेच आहे त्याच्या सुट्याचा खर्च हजार लाखात नाही तर करोडोत आहे. जवळपास १०० मिलियन डॉलर म्हणजेच ६४१ करोड रुपये त्याने खर्च केले.

मोरोक्को येथे त्याने निवांत काल घालविला राजा येणार म्हणून स्वतः मोरोक्कोचे प्रधानमंत्री त्याच्या स्वागतास विमान तळावर आले. ७४ एकर परिसरात असलेला समर पैलेस त्याने बुक करून ठेवला होता. या वर्षीच्या सुट्ट्या त्याने मोरोक्कोत घालविल्या.

स्थानिक बातम्या नुसार राजा सलमान हा दरवर्षी सुट्ट्या करिता नवनवीन ठिकाणी जातो. त्याच्या सोबत जवळपास १०० लोक राहतात. यामध्ये मंत्री,सल्लागार आणि नातेवाईक सहभागी असतात. मोरोक्को मधील सर्व अलिशान हॉटेल या करिता बुक करण्यात आले होते.

एका स्पैनिश दैनिकानुसार राजा येणार आहे म्हण्य्न ७४ एकरात असलेल्या समर पैलेसची डागडूजी २०१६ पासून करत होते. या इमारतीत नवीन हेलीपैड बनविण्यात आले. मोरोक्को देशाच्या कमाईचा एकूण १.५ वा हिस्सा या राजाच्या सुट्ट्यामुळे मिळाला आहे.

न्यू यॉर्क टाईम नुसार या वर्षी उन्हाळ्यात राजाने मोरोक्को मध्ये फिरायला १००च्या वर मर्सडिज व रेंज रोवर गाड्या बुक करण्यात आल्या होत्या. इथे हॉटेल सोबत दवाखान्याची व्यवस्था करण्यात हि आली होती. राजा सलमानची संपत्ती हि पूर्ण जगात आहे. पैरीसमधील त्याचे घर आणि फ्रांस मधील महाल हा पाहण्यासारखा आहे.

असा राजा येत राहो असा मोरोक्को देश परत परत म्हणत असेल…

Comments

comments