विक्सच्या जाहिराती मधील तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना…. 15

समाजाने तिला सांगितले कि ती स्त्री नाही ; परंतु ती एक आई बनली. त्यांनी तिला सांगितले कि तिच्याकडे अधिकार नाही तिला सांभाळायचा तसा कुठलाही कायदा तिच्या बाजुने नाही तरीही तिने त्या अनाथ मुलीचे आनंदी बालपण दिले, कारण एका मुलीची तस्करी करून तिचे बालपण तिला संपवू दयायचे नव्हते.
मानवी गुणधर्मा नुसार गौरी सावंत एक आदर्श दमदार स्त्री आहे. तो गुणधर्म तिच्या या कॉटनच्या साडीत नाही किंवा तिच्या मोठ्या बिंदी मध्ये नाही तो गुणधर्म सर्व महिलांना स्पष्टपणे आव्हान करते तो गुणधर्म म्हणजे तिचे डोळ्यात हि नाही जेव्हा ती तुमच्याकडे बघून आनंदाने व आत्म्विशासाने बोलते.

या ठिकाणी पोहचण्याकरिता तिला आयुष्यात कठोर निर्णय घेतले. त्या निर्णयाचे परिणामही तिला माहिती होते. एक जैविक दृष्ट्या माणूस परंतु तिच्या मध्ये असलेली स्त्रीची भावना लपून ठेवणे हे तिला पटत नव्हते. गणेश म्हणून ती जन्माला आली. स्वतःची ओळख तिने स्वतंत्र निर्माण केली. तिने ठरविली जो प्रसंग तिच्यावर आला तो कोणावरही येऊ नये. म्हणून ती सर्व सुखसोयी पासून दूर गेली आणि या विरोधी प्रवाहात तिने धैर्य दाखवत स्वतःचा रस्ता निवडला.

विक्स कंपनीच्या जाहिरातीने तिला एक नवीन ओळख दिली. पारिवारिक सुख हे जात धर्म व लिंग याला कुठलीही बंधने येत नाही हे त्या जाहिराती मध्ये दाखविले. जवळपास १ करोड ३० लाख लोकांनी तिची हि कहानी बघितली आणि अजूनही बघत आहेत,

एक नारी सबपे भारी
जेव्हा मी गौरीला तिच्या बालपणातील सर्वात प्रभावी प्रेरणा देणाऱ्या प्रसंगाबाबत विचारतो, तेव्हा ती लगेच मला ताकीत देते की तिचे बालपण एक आनंददायी नव्हते, जिथे एका आईने तिची नेहमी चिंता केली आणि एका बापाने तिच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टीची स्वप्न पहिले. एक गोंधळलेले बालपण तिच्या समोर होते म्हणून तिला प्रेरणा किंवा आनंद देणारे प्रसंग कमीच आले होते.

पुण्यातील भवानीपेठेमध्ये जन्मलेल्या गणेश सावंत, सरकारी शाळेत असताना, सामान्यत: त्यापेक्षा अधिक वेगळ्या वातावरणात तो वाढला. तिच्या आईला १० वर्षाच्या फरकाने झालेला गणेश तिच्या आईला गौरी नको होती, तरीही तिचे वडील दुसर्या मुलाला जन्म घेण्यासाठी तयार होते. “तीला मला या जगात येऊ द्यायची इच्छा नव्हती आणि सातव्या महिन्यामध्ये गर्भपात करण्याचा प्रयत्नही तिने केला. पण डॉक्टरांनी तिला सांगितले की ही बाळाची वाढ पूर्णपणे झालेली आहे. आणि बाळ एवढे मजबूत आहे की ती एखाद्या भिंतीवर मारली गेली तरी त्याला काही होणार नाही. अशा हो नाही परिस्थिती मध्ये मी जन्मलो, म्हणून मीही तितकीच गोंधळलेली कि स्वतःचे लिंग ओळखु शकले नाही ” अशी ती सांगते..

लहानपणी गौरीला काही वेगळं वाटत नव्हतं कारण ती दुसऱ्या माणसासारखीच होती. पण जसजसी ती मोठी झाली आणि लोक तिला एक माणसा सारखा कठोर बनविण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करीत असतं, तेव्हा तिच्या स्त्रीचा स्वभाव तिला जाणवत असे, तेव्हापासून ती इतरांसारखी नव्हती हे समजून घेण्यास सुरुवात तिने केली.

“मी हिजडा किंवा मुलीसारखा वाटत नव्हती, पण मला माहित होते की माझ्यात काहीतरी असामान्य गुण होते. मी नेहमीच मुलींशी मैत्री करत आणि मुलांबरोबर खेळत नसे. मला मुलीबरोबर घरघर खेळवणे आवडत होते , झाडांची पाने काढून आणि बाटलीच्या झाकणाने ते अंगठ्याने दाबून त्याच्या पोळ्या बनविणे आणि शेंगदाणे गोळा करुन त्यांना कुकरमध्ये उकळवून देणे. यात खूप आनंद भेट होता ! मी घरी याबद्दल शिव्या खात घरचे चिडायचे सुध्दा पण मी कधीच बदलली नाही, ” अशी ती सांगते.

आणखी एक आठवण ती सांगते, १० वर्षाची असताना एका लग्नाच्या वेळी आजीने तिला विचारले ” की मी मोठी झाल्यावर काय होणार ? तर मी सांगितले ,’मला आई व्हायचे आहे” मी लहान आहे म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केले आणि ‘ प्रत्येकाने मला सांगितले, तू आई होऊ शकत नाही. वडील होऊ शकते, आणि मोठे झाल्यावर तिने पोलीस अधिकारी व्हायला पाहिजे”

गौरी पाच वर्षांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला, आणि तिच्या पाठीमागे कोणीहि आई म्हणून आधार द्यायला नव्हते, तसेच तिच्या वडिलांनी तिचा बाप म्हणून कोणतेही कर्तव्ये पुढे पार पाडले नाही. “मला शाळेतून उशीर झाला किंवा मी गृहपाठ करत नसत या सर्व गोष्टीविषयी काळजी करण्यासारखं कोणीच नव्हतं. कारण माझे वडील, एक पोलीस अधिकारी जे खूप मर्दानि व्यवसायात होते, मी त्यांच्या करिता शरमेची गोष्ट होते आणि मला खात्री होती की मी कधीतरी कौटुंबिक नावही खराब करेल. तेव्हापासून त्यांनी माझ्या पासून अंतर ठेवले, आणि माझ्यावर प्रेम कधीच केले नाही.”

शब्दशः दुखावणारे शब्द
तिचे वडीलांची बदली झाली आणि ते मुंबईला आले. तिच्या नवीन शाळेचे मुख्याध्यापक एकदा तिच्या वडिलांना बोलावून म्हणतात की, गौरीने मुली सारखी वागते तक्रार नाही पण तुम्हाला माहिती असाव म्हणून. त्याने ते मनावर घेतले आणि तिच्याकडे पाहणे सुध्दा थांबविले आणि अखेरीस तिच्याशी पूर्णपणे बोलणे बंद केले.

“जेव्हा ते घरी येतील, तेव्हा मी लगेचच बेडरूमकडे धावून जात. ते माझा चेहरा पाहत नसे. तो त्याच्या दोष नव्हता माझे वर्तन इतके मुलीचे होते की प्रत्येकजण माझी मजा घेत, मला नावं ठेवत. कामावर बंदुकीच्या गोळ्या मारणारा माणूस आणि त्याचा मुलगा असा याची त्यांना लाज वाटत असावी.
ते नेहमीच असं नव्हते. जेव्हा मी लहान होते, तेव्हा प्रत्येक वडिलांप्रमाणे, ते मला बाईकच्या सवारीवर घेऊन जाई आणि मलाही तितकेच इतराप्रमाणे प्रेम करायचे. परंतु माझ्या कुटुबांत जेव्हा माझ्या लैंगिकता, लिंग इत्यादी बद्दल गोष्टी झाल्या तेव्हा सगळ बदलल. एकदा, माझ्या वडिलांनी मला सांगितलं, ‘तू रस्त्यावर टाळ्या मारत फिरणार’ त्या वेळी मला खूप त्रास झाला , जेव्हा मी त्याला काही कामासाठी बोलायचे किंवा फोनवर ‘हॅलो’ म्हणायचे, तेव्हा ते मला म्हणत ‘काय हिजड्या सारखा बोलतो’ तर नंतर मी त्यांचा फोन आल्यास उचलणे बंद केले.
तिने तिचा मार्ग निवडला ती सांगते माझ्या मधील स्त्री कधीच मेली नाही जेवढा दाबायचा प्रयत्न केला तेवढाच ती स्प्रिंग प्रमाणे उसळून बाहेर आली.

खिशात ६० रुपये घेऊन ती बाहेर पडली
एक दिवस, ती १७ वर्षाची असताना झोपेतून उठली व ठरविले कि घर सोडायचे. आणि भिंतीवर पत्र लिहून चालली गेली मला लोक सांगतात कि तिचे वडील तीन दिवस ती भिंत बघत बसून होते.
गौरी तिचे घर, तिचे कुटुंब आणि तिचे शहर सोडून गेली. “माझ्याजवळ 60 रुपये होते आणि मला ठाऊक होतं की चिंचवाडहून पुण्याहून जाने आणि मुंबईतल्या दादरला जाणारी गाडी. मी मंगळवारी सिद्धिविनायकांकडे गेले , आणि दोन लाडू जेवन्यासाठी प्रसाद म्हणून घेतले होते आणि संध्याकाळी मला दादर स्टेशनवर रगडा पेटीस खाल्ला. मी ते खाऊ शकत नव्हते, आणि पाणी देणारा मुलगा पाण्यात बोट बुडवून पाणी देत होता आणि नळावर पूर्ण भात अडकून होता.”

तिचा एक मित्र होता, जो समलिंगी होता व त्याने लिंग बदलविले होते नंतर तो सेक्स वर्कर झाला, जो तिला तिला तीन चार दिवस ठेवण्याकरिता तयार झाला. तिने मला जेवन दिले आणि माझी काळजी घेतली, आणि नंतर, मला हमसफर ट्रस्ट (भारतातील सर्वात जुनी एलजीबीटीक्यू संघटनांपैकी एक) मध्ये ओळख करून दिली. गौरी म्हणते, “देवाची कृपा असल्याने मला कधीच भिक मागायची वेळ आली नाही”

तिने दरमहा 1,500 रुपये कमावले. तिचे संभाषण कौशल्य चांगले होते. ती तिच्या शब्दाने बुद्धि, विनोद आणि श्ब्द्शैलीने अधिकार्यासह बोलत, म्हणूनच तिला संपर्क करायचे काम दिले. लोकांना प्रेरित करण्यास आणि त्यांना सल्ला देण्यासाठी काम मला होते.

औपचारिकरित्या तिच्या बायोलॉजिकल सेक्सला नकार दिला, तिने ‘हिज्रा’ मध्ये रूपांतर करण्याचे निवडले जे भारतीय सुप्रीमकोर्टच्या ऐतिहासिक निर्णयाच्या रूपात आहे, आता त्याला आधिकारिक तिसरे लिंग म्हणून ओळखले गेले आहे. जैविक दृष्ट्या, ते नर किंवा मादी नसतात. ती म्हणते, “मला सत्य माहीत होतं, मी एक स्त्री बनू इच्छित नव्हती- लोक मला आणि माझ्या शरीरात असं वाटत होतं की मी स्त्रीला त्रासदायक पध्दती पूर्ण केली तरीसुद्धा.”
औपचारिकरित्या तिने सेक्सला नकार दिला, तिने ‘हिजडा’ मध्ये रूपांतरीत होण्याचे ठरविले जे भारतीय सुप्रीम कोर्टच्या ऐतिहासिक निर्णयाच्या रूपात आले आहे, आता त्याला तिसरे लिंग म्हणून ओळखले जात आहे. जैविक दृष्ट्या, ते नर किंवा मादी नसतात. ती म्हणते, “मला सत्य माहीत होतं, मी एक स्त्री बनू इच्छित नव्हती. स्त्री होण्याची त्रासदायक पद्धत मला निवडायची नव्हती ”

ती बर्याच लोकांबरोबर काम करायची आणि एसटीडी बद्दल जनजागृती करण्यासाठी चाचणीसाठी किंवा व्येश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना जनजागृती करण्याचे काम ती करायची. तिथे तिला तिची मुलगी गायत्री भेटली. गायत्रीची आई एचआयव्ही पॉझिटिव्ह सेक्स वर्कर होती.

गायत्रीला कधीही स्तनपान दिले नाही आणि गायत्री पाच वर्षांची असतना एड्स रोगाने अखेरीस तिच्या आईचा मृत्यू झाला . गायत्रीला सोनगावला विकायचं तिथल्या लोकांनी ठरविले. “मी त्या विरुद्ध जोरदार लढाई दिली. त्या वेळी, मला कळत नव्हते की मी आई होईल, मी तिला वाढवेल आणि एक दिवस लोक माझी कथा सांगणे. मला फक्त हे माहित होते की या असुरक्षित बाळाला संरक्षण आणि काळजीची आवश्यकता होती”

एक आई ती बनत गेली. गौरी तिला खाऊ घालत, तिला शाळेत पाठवायची, आणि तिच्या अभ्यासाची काळजी घेत असे. आणि नैसर्गिकरित्या दोघामध्ये एक विशेष बंध निर्माण झाला. एक आई आणि तिच्या मुलीचा जगाच्या विरुद्ध दोघी !

गौरी यांनी तृतीयपंथी समुदायासाठी मूलभूत अधिकारांची मागणी करण्याकरिता एक याचिका दाखल केली होती, आणि NALSA खंडपीठाने तिच्या बाजूने निकाल दिला तिसरा लिंग आधार कार्डासाठी निश्चित करण्यात आला. या विजयानंतर गौरीने गायत्रीसोबत औपचारिकपणे आई होण्याकरिता अपील करून त्यांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार तृतीयपंथी समुदायाच्या एकट्या सदस्याला मुलाची संगोपनाची परवानगी दिली नाही.

विक्सची जाहिरात करण्या अगोदर तिला अनेक जाहिरात कंपनी भेटल्या. पण तिने नकार दिला त्यानंतर सहा महिन्याने तिने होकार दिला व रातोरात गौरी व गायत्री संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाल्या.

या दोघी मायलेकीच्या प्रवासास व भविष्याकरिता खासरे तर्फे शुभेच्छा आणि सलाम….
वाचा खरा हिजडा कोण?

Comments

comments

Previous ArticleNext Article

15 Comments

  1. गौरी सावंत ताईआणि त्यांची मुलगी गायत्री यांच्या बद्दल वाचून व्यक्ती खूपच भानावर येत असतो .
    त्याच्या या अस्तित्व करिता केलेल्या संघर्ष्याला कोटी कोटी सलाम

  2. Khar ahe he, karn mazya sobat mi school madhe astanna tanaji mhanun ak trutiypanthi mulga hota,khup unsafe feel karayacha to ,aatta vagane badaley mulisarkha rahniman zalay pan utkrushta nachkam karun paise kamvato,ani ajun ak satish mhanun ahe jo 2 vyakti kartil itake kam karun ghardar sambhalato mala tar tyanchyabaddal proud feel hot karn ti lok kadhich kunala trasss det nait ani kadhi kunasobat swatala compose karat nait…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण… 0

२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत.

भारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.

१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का ?
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.

जम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.

काश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील ! त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते.

सात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे? पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.
कारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.

कॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली.

जखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.
कारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन !

Comments

comments

उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA.. 0

महाराज !!!
उदयन महाराज !!!
बस्स! नाम ही काफी है !!!
मला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…

गोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..

उदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality!! वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..

सातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..

 

 

आजच्या युगात कसले महाराज नि कसले काय? असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का? पण का?
माझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात?

रात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..

अपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज .
अजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..

असंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..

त्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…

महाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…

प्राजक्त झावरे पाटील

Comments

comments

जि. प. शाळा ते IRS अधिकारी… 0

जि. प. शाळा ते IRS अधिकारी
श्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS)

सहायक आयकर आयुक्त,
भारतीय महसूल सेवा, नागपूर.

“तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे? हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण काम नाही. ही कामं वाण्याबामनाची. आपली पोरं हि अशीच वाळलेल्या लाकडामागे बैलांची शेपटं मोडीत फिरणार. त्यांना औत कसे हाकायचे? एवढेच कळणार. धर, हि तंबाखू खा, आणि शांत बस बरं जरा उन्हाच्या पारी.” जवळ बसलेला गडी वैतागून नानाला म्हणायचा.

साधारणतः १९८७ साली आमच्या कुंभारवाडीच्या (ता. पारनेर, जि. अहमदनगर) परिसरात दुष्काळामुळे पाझर तलावाचे काम चालू होते, त्यावेळची हि गोष्ट आहे. उन्हात दिवसभर उन्हात काम चालू असायचे. नानाला नीट दिसायचे नाही. काठ फाटलेल्या घमेल्याने त्यांचा पाय नढघीवर चांगला सोलून निघायचा. पायाला फडके बांधून त्यांचे काम तसेच चालू असायचे. पण त्या दिवशी आधीच्या जखमेवर पुन्हा घमेले लागून पायाला चांगली वीतभर जखम झाली होती. पाय चांगला सोलून निघाला होता. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुट्टीत, सर्व मजूर लोक जवळपासच्या एखाद्या झाडाच्या सावलीत बसलेले असायचे. आम्ही पोरं पण शाळा सुटली कि तिथे नाना, बाई बरोबर जेवण करायला यायचो. जेवलो कि तिथेच लोकांच्या गप्पा ऐकत बसायचो. एके दिवशी जेवण झाल्यावर सोबत असलेल्या गड्याला बोलता बोलता नाना म्हणाले, “काय रं चंदर?

ह्ये एवढे मोठं काम चाललंय, किती पैसा लागत असंल त्यासाठी? ह्या सगळ्यावर लक्ष ठेवणारे, पैसा आणून देणारे साह्यब किती मोठी मानसं ह्येत? असा साह्यब व्हायला काय शिक्शन घ्यावा लागतं? मपलं पोरगं नाय होनार का आसं साह्यब?”
नानाचे हे बोलणे ऐकून तो शेजारचा माणूस खळखळून हसायचा. हरिभाऊने उन्हाच्या पारी आता जेवण झालंय तर गप बसावं, असं त्याला वाटायचं. पण पायाची जखम आणि त्याचे ओघळणारे रक्त पुसताना नाना जणू काही आपल्या नशिबाची आणि काळजाच्या वेदनेची ठसठस पुसत होते. त्यांना आतल्या आत खूप भरून आल्यासारखे वाटत असणार. आपल्या अंधत्वाशी लढता लढता खडका-मातीशी तुफानी झुंज घेणारा माझा बाप त्या दिवशी मात्र या वेदना सहन करताना आतून बाहेरून ढवळून निघाला होता. अशाच तिरीमिरीत दुपारी जेवण झाल्यावर नानानी माझ्या हाताला धरलं आणि “त्ये साह्यब लोकं बसलेत ना, त्या शेडमधी मला घेवून चल,” असं ते मला म्हणाले. मी नानाला हाताला धरून तिथे घेवून गेलो. कामावर देखरेख करणारी मुकादम, कंत्राटदार मंडळी, इतर साहेब लोक यांना बसण्याची सोय एका झाडाच्या सावलीत बांबूच्या चटया बांधून केलेली होती. ऊन खूप तापलेले होते. पायात चप्पल नाही. उन्हामुळे सगळे भेटेल तिथल्या सावलीत तोंड दडवून बसलेले असायचे. कुणी झोपलेले असायचे. आम्ही दोघे तिथे शेडपाशी गेलो. तिथली मंडळी कुणी झोपली होती तर कुणी हळू आवाजात गप्पा मारत बसली होती. शेडच्या दाराशी आम्ही दोघे उभे राहिलो. आतली हवा अगदी मस्त थंडगार वाटायची. इथून हलूच नये, असे वाटत होतं.

त्या साहेब लोकांकडे बोट दाखवून नाना मला म्हणाले, “ह्ये बग, इथं समदे साह्यब लोक बसतात, सगळ्यांना एकदा बघून घे. शाळा शिकलं म्हंजी मानूस आसं साह्यब व्हतं आन त्याला आसं सावलीत बसायला भेटतं, नाहीतर ह्ये माज्या पायाकडं बग आसं व्हतं.” नानानी त्यांच्या पायावरचे बांधलेले कापड मला काढून दाखवले. नानाच्या पायावर चांगल्या मोठ्या रक्ताळलेल्या जखमा होत्या. त्या जखमा पाहून माझ्या काळजात चर्र झाले. दिसत नसल्याने नानाला किती त्रास होतो? नानाच्या डोळ्यांत अखंड वेदनेचा सागर उचंबळत होता आणि मूकपणे मला, “पोरा तू काहीतरी करून दाखव,” असे सांगत होता. मी काही बोलू शकलो नाही. थोडा वेळ थांबून आम्ही दोघे परत मागे फिरलो. गप्प गप्प आम्ही दोघे चालत होतो. पण दोन्ही ह्रद्यांची भाषा मात्र एकमेकांना कळली होती. नानाने इतक्या सहजपणे त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा माझ्या मनात भरवली होती.
आई बापाने जर मोठे ध्येय उरात बाळगले तर ते पोरांमध्ये उतरते. नानाच्या उरात असलेले ते ध्येय हळूहळू मेहनत घेत प्रथम शिक्षक, नंतर एमपीएससी व आता शेवटी यूपीएससी पास होवून एकदाचे पूर्ण झाले. धन्य आहे त्या नानाची आणि बाईची. त्यांचे आपल्या पोराला मोठा साहेब करण्याचे ध्येय पूर्ण करण्याची आणि त्यांचा अनुभवलेला जीवनसंघर्ष मला “नाना मी साह्यब झालो,” या मी लिहिलेल्या आणि युनिक अॅकॅडमी, पुणे यांचेकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकातून आपणापुढे मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य मानतो.
.
.
“नाना मी साह्यब झालो.” हे पुस्तक युनिक अॅकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये, सर्व जिल्ह्यांच्या मुख्य पुस्तक दुकानात आणि ऑनलाईन बुकगंगावर उपलब्ध आहे.

Comments

comments

%d bloggers like this: