अरबी समुद्रात होणार भुकंप; भारतासह 11 देशांना बसणार फटका 1

आशिया खंडातील जवळपास 11 देशांसह आखाती देशांना सीशम वादळासह त्सुनामीचा फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2017 पुर्वी अरबी समुद्रात भुकंप होवून ताशी 120 ते 180 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सीशमचे वादळ धडकण्याची शक्‍यता आहे. हा अंदाज तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ए. एस. पीचे संचालक बाबू कालयील यांनी वर्तविला आहे. बाबू कालयील यांनी यासंबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असून पुढील संशाधनासाठी मदतीची मागणी केली आहे. या भूकंपाचा धक्का जगातील 11 देशांना बसणार आहे. यामध्ये भारत, चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांचा समावेश आहे. त्याचबरोबर या समुद्रातील भूकंपाची झळ आखाती देशांना बसेल, अशी शक्‍यताही या रिसर्च सेंटरने वर्तविली आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून रिसर्च सेंटरचे संचालक बाबू कालयील यांनी संभाव्य धोका कळविला आहे. अद्याप या पत्राला पंतप्रधानांकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे संचालक बाबू कालयील यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या नावगाव, आवास, सासवणे या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात समुद्रातील मासे कमी पाण्यात आश्रय घेण्यासाठी आढळून आले. समुद्रातील मासे 30 सप्टेंबर रोजी किनारा गाठत असल्याने रायगड जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. लोकज्योतिर्विद असणारे कोळी बांधवांच्या माहितीनुसार असा प्रकार 46 वर्षांपूर्वी घडला होता. असे असताना जाणकार कोळी बांधवांनी हा समुद्री भूकंपाचा इशारा असल्याचे सांगितले आहे. भविष्यात समुद्रात भूकंप होण्याची चिन्हे आहेत, हा कोळी बांधवांचा कयास असला, तरी त्याला तामिळनाडू येथील भूगर्भीय आणि खगोल शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने पुष्टी दिली आहे. मात्र, प्रशासन अद्याप असे घडले कसे याचाच अंदाज बांधत आहे. भविष्यात समुद्रात भूकंप होणार असल्याचे तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर इ. एस. पी. या रिसर्च सेंटरने 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे ही माहिती कळवत पुढील संशोधनासाठी मदतीची मागणी केली आहे.

अरबी समुद्राअंतर्गत सुरू असलेल्या हालचालींचा अभ्यास करणारी केरळ येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर इ.एस.पी. संस्था असून या संस्थेचे रिसर्च सेंटर तामिळनाडू येथे आहे. अरबी समुद्रातील हालचालींचा अभ्यास करताना समुद्रात भूकंपाच्या हालचाली होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निरिक्षणात आले आहे. या हालचालींचा उद्रेक 31 डिसेंबर 2017 पूर्वी केंव्हाही होऊ शकतो, असे या रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नेमका भूकंप कधी होईल हे सांगण्याकरता अधिक शोध आणि अभ्यास करण्याची गरज आहे. यासाठी सरकारच्या मदतीची आवश्‍यकता असल्याचे रिसर्च सेंटरचे संचालक बाबू कालयील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.आशिया खंडातील जवळपास 11 देशांसह आखाती देशांना सीशम वादळासह त्सुनामीचा फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2017 पुर्वी अरबी समुद्रात भुकंप होवून ताशी 120 ते 180 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सीशमचे वादळ धडकण्याची शक्‍यता आहे. हा अंदाज तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ए. एस. पीचे संचालक बाबू कालयील यांनी वर्तविला आहे. बाबू कालयील यांनी यासंबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असून पुढील संशाधनासाठी मदतीची मागणी केली आहे. या भूकंपाचा धक्का जगातील 11 देशांना बसणार आहे. यामध्ये भारत, चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांचा समावेश आहे. त्याचबरोबर या समुद्रातील भूकंपाची झळ आखाती देशांना बसेल, अशी शक्‍यताही या रिसर्च सेंटरने वर्तविली आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून रिसर्च सेंटरचे संचालक बाबू कालयील यांनी संभाव्य धोका कळविला आहे. अद्याप या पत्राला पंतप्रधानांकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे संचालक बाबू कालयील यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या नावगाव, आवास, सासवणे या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात समुद्रातील मासे कमी पाण्यात आश्रय घेण्यासाठी आढळून आले. समुद्रातील मासे 30 सप्टेंबर रोजी किनारा गाठत असल्याने रायगड जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. लोकज्योतिर्विद असणारे कोळी बांधवांच्या माहितीनुसार असा प्रकार 46 वर्षांपूर्वी घडला होता. असे असताना जाणकार कोळी बांधवांनी हा समुद्री भूकंपाचा इशारा असल्याचे सांगितले आहे. भविष्यात समुद्रात भूकंप होण्याची चिन्हे आहेत, हा कोळी बांधवांचा कयास असला, तरी त्याला तामिळनाडू येथील भूगर्भीय आणि खगोल शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने पुष्टी दिली आहे. मात्र, प्रशासन अद्याप असे घडले कसे याचाच अंदाज बांधत आहे. भविष्यात समुद्रात भूकंप होणार असल्याचे तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर इ. एस. पी. या रिसर्च सेंटरने 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे ही माहिती कळवत पुढील संशोधनासाठी मदतीची मागणी केली आहे.

अरबी समुद्राअंतर्गत सुरू असलेल्या हालचालींचा अभ्यास करणारी केरळ येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर इ.एस.पी. संस्था असून या संस्थेचे रिसर्च सेंटर तामिळनाडू येथे आहे. अरबी समुद्रातील हालचालींचा अभ्यास करताना समुद्रात भूकंपाच्या हालचाली होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निरिक्षणात आले आहे. या हालचालींचा उद्रेक 31 डिसेंबर 2017 पूर्वी केंव्हाही होऊ शकतो, असे या रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नेमका भूकंप कधी होईल हे सांगण्याकरता अधिक शोध आणि अभ्यास करण्याची गरज आहे. यासाठी सरकारच्या मदतीची आवश्‍यकता असल्याचे रिसर्च सेंटरचे संचालक बाबू कालयील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.

Comments

comments

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पॅरा कमांडो म्हणजे काय ? 11

सर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरळ चालता येत नाही. त्याभागात अमावस्ये च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली..

पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे.

बटालियन नाव – 5 पॅराशूट कमांडो रेजिमेंट

संक्षिप्त नाव – पॅरा कमांडो फ़ोर्स

बटालियन टाइप – इंडियन स्पेशल फ़ोर्स

ब्रिदवाक्य – बलिदान (अंदर घुसो, नेस्तनाबुत करो और कुत्तो को मार डालो)

युद्धघोषणा – हर हर महादेव, मुश्किल वक्त कमांडो सख्त

ओळख – injured Tiger

मुख्यालय – बेंगलोर व पुंछ सेक्टर (जम्मू व कश्मीर)

कर्नल ऑफ़ द रेजिमेंट – ले. जनरल पी.वी.एम बक्शी

पात्रता – NDA मधून सायन्स पदवी उत्तीर्ण, आर्मी मधे 4 वर्ष्याचा अनुभव

ट्रेनिंग कालावधी – 2.5 वर्ष फिजिकल व 1 वर्ष मेंटली

सहभाग – 1961. 1977, 1999 चे कारगिल युद्ध, ऑपरेशन ब्लैक टोरनेडो(मुम्बई 26/11), ऑपरेशन इसराइल, ऑपरेशन वोल्केनो, ऑपरेशन श्री लंका, ओपेराशन चिता, ऑपरेशन ध्रुव, ऑपरेशन फ़ोर्स, ऑपरेशन सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन वेंगा, ऑपरेशन जैश मोहम्मद, ऑपरेशन Z, ऑपरेशन ब्लैक कैट, ऑपरेशन NSG, ऑपरेशन म्यानमार, ऑपरेशन किलिंग ड्रैगन अदि 200+ ऑपरेशन केले आहेत.

दरवर्षी 10000 जण सहभागी होतात त्यातून फक्त 1 जणाची निवड पॅरा मधे केली जाते. काही ट्रेनिंग सोडून पळून जातात तर काही नापास होतात.२५% कमांङो होतात.

अस मानल जात की एक पॅरा कमांडो दर दिवशी 150 किमी रनिंग करतो.

जवळ जवळ 50 किलो वजन, 1 एके 47, 2 पिस्तौल, 8 हंडग्रनेड, 5 किलो बुलेट प्रूफ जैकेट घेऊन 50 किलोमीटर ची चढाई करतो व् तेवढी खाली उतरतो.
ईथे आम्हाला स्कूल बैग घेऊन नीट चालता येत नाही

पॅरा कमांडो वर कोणती परीस्थिती केव्हा येईल सांगता येत नाही त्यामुळे त्याला दररोज वेगवेगळ ट्रेनिंग दिल जात त्यामधे
-20 तापमानाच्या पाण्या मधे 10 min राहतो.

कंबरे एवढ्या चिखलामधे रांगत जातो.

दररोज 150 किलोमीटर पळतो.

8 दिवस झोपु दिल जात नाही. 3 दिवस पाणी दिल जात नाही. 6 दिवस अन्न दिल जात नाही

जेव्हा एक कमांडो 150 किलोमीटर पळून येतो. तेव्हा त्याला साप, बेड़की, विंचु, कोणत्याही जनवराचे माँस खायला दिल जात तेही कच्चे !

जेव्हा त्यांना 8 दिवस झोपु दिल जात नाही. तेव्हा त्याना H.D Firing ला सामोर जाव लागत H.D fire म्हणजे 8 दिवस झोपलेले नसताना. आपल्याच साथीदाराला समोर ठेवल जात व त्याच्या साइड ला टारगेट ठेवल जात त्यावर फायरिंग करायची असते.त्यावेळी खरी बन्दूक व खऱ्या बुलेट वापरल्या जातात. तोहि समोरून फायरिंग करत असतो.

यामागेही विषि्ष्ट कारण आहे. कोणत्याही युद्धजन्य परीस्थिती मधे समोरासमोर येऊन फायरिंग करायची वेळ जर आली तर आपल्या साथीदारला नुकसान न होता मिशन पूर्ण व्हावे म्हणून ही पध्दत वापरली जाते

आजपर्यन्त चा इतिहास आहे. ज्या मोहिमेमधे पॅरा कमांडो सहभागी आहेत ती मोहीम भारताने केव्हाच हरली नाही.

पॅरा कमांडो 2.5 वर्ष ट्रेनिंग असत. व 1 वर्ष मेंटली..मेंटली ट्रेनिंग म्हणजे त्याला पूर्णपणे feeling less केल जात. तो काहीच बर-वाइट समजत नाही. समोर येईल त्याला मारायच ,तो कोणीही असो.

त्यांच महत्वाच काम म्हणजे विमानामधुन पैराशूट परिधान करुण उडी मारणे व् पैराशूट मधून जेव्हा ख़ाली उतरत असतो. तेव्हा खाली फायरिंग करत येणे. ह्यमुळेच आपण 1961 1977. व् 1999 चे कारगिल युद्ध जिंकले आहे. आणि सर्वात विशेष अमेरीकेने सुद्धा या कमांङोचे प्रशिक्षण पाहून तोंडात बोट घातल होते.

गर्व पाहीजे..प्रत्येक भारतीयाला.

Comments

comments

मोदि सरकारच्या काळात गोमांस निर्यातीत भारत नंबर एक… 1

बीफ म्हणजेच गोमास या विषयावर सत्ताधार्यांनी बराच गदारोळ केला परंतु हे खर आहे कि मोदी सरकार केंद्रात आल्या नंतर गोमासची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन कत्तलखाने उघडायला केंद्र सरकार १५ करोड अनुदान देत आहेत. हिंदू संघटना याचा धार्मिक कारणामुळे विरोध करतात परंतु सत्य हे आहे कि गोमास निर्यात करणारे भारतातील सर्वात मोठे व्यापारी हिंदू आहे.

महाराष्ट्र सरकारने गोवंश बंदी केली त्यामुळे आत्ताही मोठा गदारोळ होत असतो. तसेच उत्तर प्रदेश मधील गोमासाच्या संशयावरून एका परिवारावर झालेला हल्ला आणि त्यामध्ये एका सदस्याचा मृत्यू यामुळे देशातील वातावरण तापले होते. बिहार मध्ये २०१४ च्या प्रचार सभेत मोदीने कॉंग्रेस सरकार वर गोमासा वरून भरपूर टीका केली. परंतु आता काय ?

 

 

मनमोहन सिंघवर निशाणा साधत मोदि (मोदि विषयी विशेष गोष्टी क्लिक करा) म्हणाले होते कि सरकार हरित क्रांती एवजी गुलाबी क्रांती (गोमास विक्री ) यावर जास्त जोर देत आहे. त्यांना अनुदान देत आहे परंतु मोदि सरकार सत्तेत येताच बोलण्याच्या उलट केले. त्यांनी कत्तलखाने आधुनिकीकरणा करिता १५ करोड अनुदान देणे सुरु केले. याचा परिणाम असा झाला कि बासमती तांदूळ पेक्षाही गोमासाचे उत्पादन वाढले मागील वर्षी भारताला गोमासा मधून प्रदेशातून ४.८ अफ्ज डॉलर रुपये मिळाले.

 

 

आपल्याला हे वाटते कि गोमासाचा व्यापार फक्त मुस्लीम करतात परंतु देशातील सर्वात मोठे गोमासाचे व्यापारी हिंदू आहे कंपनी नावासहित तुम्हाला त्याची माहिती देत आहोत.
अल कबीर एक्स्पोर्ट – सतीश व अतुल सभरवाल
अरबिअन एक्स्पोर्ट – सुनील करण
एमकेआर फ्रोजन फूड- मदन एबट
पीएमएल इंडस्ट्री – ए एस बिंद्रा

गुजरात मध्ये मोडी यांची सत्ता येण्या अगोदर मास निर्यात २००१ – २००२ या वर्षात १०६०० टन परंतु एका वर्षात २०१० ते २२०११ मध्ये २२,००० टन झाला.

 

देशात आसाम , तामिळनाडू,पश्चिम बंगाल येथील सरकार कडून परवानगीने व अरुणाचल प्रदेश,केरळ,मणिपूर,मेघालय,मिझोराम,सिक्कीम व त्रिपुरा येथे विना परवानगीने गाय कापता येतात. अट फक्त एकच गायीचे वय १० वर्षापेक्षा जास्त असावे.

 

वर्ष २०१५-१६ मध्ये भारत २४ लाख टन गोमास निर्यात करायचा हा एकूण जगातील मास निर्यातीचा ५८.७ % वा हिस्सा आहे. जगात ६५ देशात भारत गोमास निर्यात करतो त्यापैकी ८०% देश आशियात व राहिलेले आफ्रिकेला पाठविले जाते. वियतनाम त्याच्या एकूण मास आयताच्या ४५% भाग भारताकडून मागवितात. दुसरा नंबर गोमास निर्यात मध्ये ब्राझील देशाचा आहे २० लाख तन आणि तिसरा नंबर ऑस्ट्रेलिया या देशाचा १५ लाख टन मास निर्यात करतो.

 

 

भारत यात एक नंबरला आहे याचे मुख्य कारण आपण भाकड जनावरांना कापतो. परंतु ब्राझील व दुसर्या देशात जनावरे हि कापासाठीच वाढवली जातात. त्यामध्ये खर्च जास्त येतो. म्हणून भारताचे मास स्वस्त आहे व मागणी जास्त असते.

जेथे भारतात या गोष्टीवर वातावरण तापून असते तिकडे सरकार यापासून अफ्जो रुपये कमवत आहे. एक विशेष मुस्लीम बहुल असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये गोमासावर बंदि फार आधीपासून आहे.

राजकारण व धनकारण या वादात आपले विनाकारण जीव जातंय हे नक्की…

Comments

comments

गोरखपूर येथील बाल मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही कम्पनीचा दावा… 0

ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दगावलेल्या संख्या ६३ वर पोहोचली आहे. यात ३०हून अधिक मुलांचा समावेश आहे. आज, शनिवारी सकाळी एका अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूज्वर झाल्याने मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूंमुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यातच मृत्यू झालेल्या मुलांपैकी ३४ नवजात बालकांना नामकरणाआधीच मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे धक्कादाय वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मुलांच्या जन्माचा आनंद साजरा करण्याआधीच त्यांच्या मृत्यूचे शोक करण्याची वेळ त्यांच्या आईवडलांवर आली आहे.

सरकारतर्फे सुरवातीला या घटनेचा नकार दिल्या नंतर मृताच आकडा ३० वर पोहचला त्या नंतर,
गोरखपूरचे जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी या दुर्घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, बीआरडी हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्याने ऑक्सिजन अभावी मुलांचा मृत्यू झाला आहे.

हॉस्पिटलने ६९ लाख रुपये न भरले गेल्याने ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या एका कंपनीने हॉस्पिटलचा पुरवठा बंद केला होता. या कंपनीने गुरुवारी सायंकाळीच पुरवठा बंद केला होता. बीआरडी हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट बसवण्यात आला होता. याद्वारे एन्सेफलायटिस वॉर्डसह शेकडो रुग्णांना ऑक्सिजन दिला जात होता.

परंतु ऑक्सिजन पुरवठा करणारी कंपनी पुष्पा गैस एजन्सीने या गोष्टीचा साफ इंकार केला आहे. कंपनीच्या एच आर मिनू वालिया “मुलांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला नाही, आम्हाला याचे गंभीर परिणाम समजतात कोणीही असा पुरवठा अचानक बंद करणार नाही ”

प्रशासनास थकीत रक्कमे बद्दल अनेक वेळा संपर्क करून हि त्यांच्या कडून कुठलीही प्रतिक्रिया आम्हाला मिळाली नाही. असे मिनू वालिया कडून सांगण्यात आले.

मीनु वालीयाच्या या व्यक्तावयामुळे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित राहत आहे. योगी सरकारचा कारभारावर अनेक लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. कंपनी सोबत झालेल्या करारामध्ये नमूद केलेले आहे कि दहा लाखाच्या वर थकीत रक्कम कधीही राहणार नाही मग ती ६९ लाख रुपयावर कशी पोहचली ?

 

गोरखपूरच्या सरकारी बाबा राघवदास मेडिकल कॉलेज -हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांत ३0 नव्हे, तर पाच दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

मिनू वालीयाची मुलाखत आपण बघू शकता…

 

Comments

comments