वर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल 0

युट्युबवर सध्या हा विडीओ धुमाकूळ घालत आहे.

आपल्या येथे टॅलेंटची कमी नाही, पण योग्य ती संधी आणि व्यासपीठ उपलब्ध नसल्याने अशा लोकांना कधीच प्रसिद्धी अनुभवता येत नाही. पण सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडियाचा प्रभाव आणि व्याप्ती एवढी आहे, त्यामुळे सामान्यांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आता या व्हिडिओमधल्या दोन विद्यार्थ्यांचंच घ्या ना! वर्गात दोघंही नृत्याचा सराव करत आहेत. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ काढून कोणीतरी तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असला तरी पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या नृत्यशैलीचं खूप कौतुक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. युट्युबवर आतापर्यंत ५२ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Comments

comments

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

भारतातून कोणी पाठविल्या ट्रम्प तात्यांना रक्षाबंधनाला राख्या… 0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाला राखी हा शब्द माहित असेल का ? हे नक्की सांगता येणार नाही. परंतु मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भारतातील गावाला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एका सेवाभावी संस्थेकडून देण्यात आले आहे व आता त्याच गावातून हिंदू मुस्लीम महिला,मुली डोनाल्ड ट्रम्प यांना १००१ राख्या पाठविणार आहेत. भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक घट्ट व्हावे या करिता हे पाउल उचललेले आहेत.

www.thodkyaat.com

मेवात भागातील मरोरा या गावातील हि घटना. भारत आणि अमेरिका संबंध अधिक चागले व्हावे याकरिता आम्ही हे पाउल उचलले असे सेवाभावी संस्थे कडून सांगण्यात आले.

सुलभ अंतरराष्ट्रीय सामजिक सेवा संस्था (SISSO) यांचे प्रमुख बिंदेश्वर पाठक यांनी या गावाचे नामकरण Trump Village (ट्रम्पवाडी) केले तेव्हापासून हे गाव अधिक चर्चेत आले.

(Photo credit MONEY SHARMA/AFP/Getty Images) www.thodkyaat.com

दिल्ली पासून १०० किलोमीटर अंतरावर मारोरा हे गाव आहे. गावाचे नामकरण झाल्यानंतर प्रशासनास गडबडून जाग आली व जिल्हा प्रशासनाने हे अनअधिकृत ठरवून गावातील काही बोर्ड काढण्यात आले.

मरोरा गाव गुरगाव पासून ६०किमी अंतरावर पूर्णा तहसील मध्ये आहे. जवळपास १८०० लोकसंख्येचे गाव..

स्त्री सबलीकरणाकरिता आम्ही अनेक कार्यक्रम या गावात राबवत आहोत, या संस्थेच्या उपाध्यक्ष मोनिका जैन यांनी सांगितले.

नरेंद्र मोदि व डोनाल्ड ट्रम्पला गावातील सर्व स्त्रिया मोठा भाऊ मानतात म्हणूनच १००१ राख्या डोनाल्डला व ५०१ राख्या मोदीना त्यांनी पाठविल्या.
७ ऑगस्टला ह्या राख्या अमेरिकेला व्हाईट हाउस मध्ये पोहचतील त्यासोबत मोदी व ट्रम्प या दोघांना गावात येण्याचे आमंत्रण हि देण्यात आलेले आहे.

चला आता बघूया या दोन भावाकडून त्यांच्या बहिणींना रक्षाबंधना निमित्त काय भेट मिळेल…

मल्हार टाकळे

Comments

comments

सनी लिओनि नायक नाही खलनायक हु मै वर नाचली आणि कहर झाला… 0

सनी लीयोनीच्या वैयक्तित आयुष्या विषयी लोकांना पाहण्यात किंवा वाचण्यात फार उस्तुकता असते तिचे व्यक्तिमत्व आहेच तसे. काही दिवसा अगोदर तिने स्टेजच्य मागे डान्स केला आणि झाला कि धूर…

असाच तिच्या या रोमांचकारी आयुष्यातला एक क्षण आपल्याला दाखवायला आणला आहे आम्ही..

१९९० च्या दशकातील संजय दत्त यांनी हिट केलेले खलनायक चित्रपटातील गीत आता आपल्या समोर घेऊन येत आहे सनी खासरे वर…
देसी तडका देणाऱ्या या बेबी डॉल चा हा विडीओ बघा आणि मन प्रसन्न करून घ्या..

संजू बाबा हे गाणे बघल्यावर या बेबी डॉल मी सोने दि ला काय प्रतिक्रिया देणार का ?

Comments

comments

शेतिचा Blue Whale Challenge गेम कसा असतो नक्की वाचा… 1

शेतीचा ब्ल्यू व्हेल गेम

जगातील सर्वात मोठा जुगार शेतकरी खेळतो. जर ही शेती ब्लु व्हेल मधे असतीलतर कसे राहीले असते टास्क नक्की वाचा व विचार करा…

५ एकर शेती कसायची ?

१ली Task नांगरणी

२ री Task मोगडणी

३ री Task वेचणी

५ वी Task कोळपणी

७ वी Task पेरणी साठी पैसे मागायला सावकाराची उंबरठे झिजवणे

१० वी Task पेरणी करिता खत बियाणे घेण्यासाठी दोन दिवस लाईन मध्ये राहणे

१२ वी Task पावसाची दिवसेंदिवस वाट बघत बसणे

१५ वी Task एका बैलावर पेरणी करणे

१६ वी Task घरातल्या बायका पोरांना दोनचार महीने फुकट राबविणे

१७ वी Task परत पावसाची वाट बघत बसणे

१८ वी Task पिक विमा भरण्यासाठी उपाशी पोटी दिवस दिवस लाईन मध्ये उभे राहणे

१९ वी Task रात्री अपरात्री पिकाला पाणी देणे

२० वी Task रानटी डुकरांचा सामना करणे

२१ वी Task हाती आलेल्या पिकाची पावसाने केलेली नासधूस बघत बसणे

२२ वी Task पिक काढणी साठी मजूर शोधने

२३ वी Task शेतमाल ठेवण्यासाठी बारदाना घेणे

२४ वी Task शेतमाल बाजारात नेहूण कवडीमोल भावात विकणे

२५ वी Task बाजारातून हात हालवत परत येणे

२६ वी Task मुलीच्या लग्नासाठी बैल शेती विकणे

२७ वी Task मुलांची शिक्षणं बंद करणे

२८ वी Task सावकारी कर्जासाठी नको ती बोलणी खाणे

२९ वी Task दिवस दिवस उपाशी राहणे

३० वी Task आपल्याच शेतात विष पिणे , झाडाला फाशी घेणे

तेव्हा ही गेम जिंकतो …

जिंकणार् याला १ लाख रुपये बक्षिस
तर मग कोण कोण खेळणार ही गेम
WhatsApp update विचार करायला लावणारी पोस्ट

Comments

comments

%d bloggers like this: